×

अद्याप १० कोटी श्रमिक रोजगाराविना, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीची माहिती

Published On :    28 May 2020
साझा करें:

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर देशातील बहुंतांश उद्योगधंदे बंद झाले होते. त्यामुळे सुमारे १२ कोटी कर्मचार्‍यांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता.



नवी दिल्ली: कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर देशातील बहुंतांश उद्योगधंदे बंद झाले होते. त्यामुळे सुमारे १२ कोटी कर्मचार्‍यांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. 


दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीपासून लॉकडाऊनमध्ये अंशता सवलत मिळण्यास सुरुवात झाल्यापासून सुमारे दोन कोटी मजूर कामावर परतले आहेत. त्यामुळे देशातील रोजगाराचा दर २ टक्क्यांनी वाढून २९ टक्के झाला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात हाच दर २७ टक्के होता. मात्र अद्याप १० कोटी कर्मचारी, कामगारांना अद्याप रोजगार पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. ही माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या ताजा अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.


या अहवातून देण्यात आलेल्या माहितीनुसार २५ मार्च रोजी सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे १२.२० कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला होता. यामधील सुमारे दोन कोटी कामगार पुन्हा कामावर आले आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा रोजगार मिळाला आहे.


मात्र लॉकडाऊनमुळे नोकरी गमवावी लागलेल्या १० कोटी कामगार, कर्मचार्‍यांना अद्याप पुन्हा रोजगार  मिळालेला नाही. या लोकांना पुन्हा कामावर आणून रोजगार मिळवून देणे आव्हानात्मक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ज्यावेळी मागणी आणि उत्पादन वाढू लागेल, त्यावेळीच या कामगारांना परत कामावर आणणे शक्य होईल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


cimeच्या अहवालानुसार मे महिन्यात(कामगार सहभाग दर) एलपीआर वाढला आहे. १७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात हा दर ३८.८ टक्के झाला होता. मार्च महिन्यात एलपीआर ४१.९ टक्के होता. मात्र एप्रिल महिन्यामध्ये तो घटून ३५.६ टक्के झाला होता. त मे महिन्याच्या सुरुवातील त्यात अजूनच घट झाली होती. सीएमआयईच्या अहवालानुसार मजुरांनी आपल्या इच्छेने स्थलांतर केले होते. मात्र आता ते पुन्हा एकदा कामावर परतत आहेत. तसेच त्यांना रोजगारही मिळत आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘र
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात,
..तरीही भाजपाकडून अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे ध
जीव्हिके अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीक
मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्म
राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही
राजगृहाच्या तोडफोडप्रकरणी वामन मेश्राम यांनी केला निषे
निजामुद्दीन मरकझ: दिल्ली कोर्टाकडून १२२ मलेशियन नागरिक
सरकारी शाळांमधील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या शर्यती
बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालक
‘लॉकडाऊन’चे चटके; अर्थव्यवस्थेचे ३४ हजार कोटींचे नुकसा
पतंजलीने दोन लायसन्स कसे मिळवले खुलासा करावा, संभ्रम कर
शहीद जवानांकडे शस्त्रे नव्हती
१२ टक्के उद्योगांचे शटर डाऊन, देशातील ७० टक्के स्टार्ट अ
महाविकासआघाडीतला आणखी एक गोंधळ उघड, रोजगार नोंदणीसाठी व
‘महाजॉब्स’वर बेरोजगारांची झुंबड, ४ तासात १३ हजारांपेक्
मराठा आरक्षण प्रकरणी १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय देण
रेल्वे खासगीकरणामुळे ३ लाख सरकारी नोकर्‍यांवर कुर्‍हाड
रेल्वेचेे २४ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान, आधी प्रवाशा
भाजपा आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते, संजय र
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper