×

टोळधाड आल्याने शेतकर्‍यांपुढे दुसरे महासंकट, पिके नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल

Published On :    28 May 2020
साझा करें:

कोरोनाच्या संकटात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प असताना ही टोळधाड आल्याने शेतकर्‍यांपुढे हे दुसरे महासंकट उभे राहिले आहे. शेतमालाला काहीच भाव आला नसल्याने, त्यात या टोळधाडीने मोठ्या प्रमाणात पिके नष्ट केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.



नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प असताना ही टोळधाड आल्याने शेतकर्‍यांपुढे हे दुसरे महासंकट उभे राहिले आहे. शेतमालाला काहीच भाव आला नसल्याने, त्यात या टोळधाडीने मोठ्या प्रमाणात पिके नष्ट केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


भारतामध्ये १९९३ साली मोठी टोळधाड आली होती. त्यानंतर आता कोरोना महासंकटाच्या काळात पुन्हा अशीच टोळधाड राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रामधील काही भागावर आली आहे.


गेली दोन दशके राजस्थानवर टोळधाड येत असते पण १९९३मध्ये जेवढा प्रदेश तिने व्याप्त केला होता तेवढी राज्ये या टोळधाडीने यावेळी व्यापली आहेत. १९७३मध्ये महाराष्ट्रावर टोळधाड आली होती. मंगळवारी जयपूर शहरावर ही टोळधाड मोठ्या प्रमाणावर दिसू लागली. कोरोनाच्या संकटात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प असताना ही टोळधाड आल्याने शेतकर्‍यांपुढे हे दुसरे महासंकट उभे राहिले आहे. शेतमालाला काहीच भाव आला नसल्याने, त्यात या टोळधाडीने मोठ्या प्रमाणात पिके नष्ट केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या अन्न व कृषी महासंघटनेच्या मते एक चौरस किमी क्षेत्र आकाराची टोळधाड ३५ हजार मनुष्याचे एकावेळचे अन्न फस्त करते. या एक चौरस किमी क्षेत्रात सुमारे ४ कोटी टोळ असतात. या टोळांची भूक अमर्याद असते. ते आपल्या वजनाएवढे (२ ग्रॅम) अन्न एका दिवशी खाऊ शकतात. टोळांच्या या अमर्याद विध्वंसामुळे शेतीची काय अवस्था होऊ शकते हे लक्षात येते.


टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीत राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आलेली टोळधाड पुढे महाराष्ट्रात विदर्भात आल्याचे म्हटले होते. १९७४ नंतरची ही पहिलीच घटना आहे. ऐंशीच्या घरात असलेले एक शेतकरी सांगतात, त्यांच्या आयुष्यात त्यांनी असे टोळांचे आक्रमण पाहिलेले नव्हते. जे काही ऐकले होते ती सांगोवांगी माहिती होती. पण आता प्रत्यक्ष पाहायला मिळतेय असे ते सांगतात.


या टोळीधाडीसंदर्भात भारतातील लोकूस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनचे म्हणणे आहे की, या वर्षी टोळधाड होईल असे कोणतेही इशारे, चेतावणी मिळाली नव्हती. अशा टोळधाडी अनियमित असतात. यंदा मे महिन्यात ही धाड आली पण ती याच महिन्यात येते असेही नसते. यंदा टोळांना हा प्रजननाचा काळ व प्रदेश वाटला असल्याने ते एवढ्या मोठ्या संख्येने आले असावेत अशी माहिती पिक संरक्षण, विलगीकरण व साठवण संस्थेचे उपसंचालक के. एल. गुर्जर यांनी दिली. 


मान्सूनच्या सुरवातीला टोळ हे शुष्क प्रदेशात येत असतात. ते पाकिस्तानातून भारतात राजस्थानात येतात. पण यंदा ते एप्रिल-मेमध्येच राजस्थान व पंजाबमध्ये आलेले दिसतात. टोळांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतराला भारतात पडलेला मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे कोल यांचे मत आहे. शुष्क प्रदेशात पावसाचे प्रमाण खूप झाल्यास भाजीपाला, पिकांची वाढ वेगाने होते व त्यामुळे टोळ प्रजननासाठी येतात, यंदा भारतातील पिक त्यांना आकर्षित करून घेत असतील, असे त्यांचे मत आहे.


कोरोनाच्या महासंकटात टोळधाडीत अनेक हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट होणे ही अन्नसुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर समस्या होऊ शकते. पण दुसरा एक धोका आहे की, जूनमध्ये प्रौढावस्थेत असलेले टोळ पुन्हा आक्रमण करू शकतात. 


हा धोका भारत व पाकिस्तानला आहे असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. टोळांचे प्रजनन तीन महिन्यात तिप्पट होऊ शकते, त्यामुळे आज बाल्यावस्थेत असलेले व प्रजनन अवस्थेत असलेले टोळ दोन्ही देशांतल्या शेतीचे किती नुकसान करू शकतात याचा अंदाज येऊ शकतो. या टोळधाडीत खरीप पिकांचे नुकसान दिसत आहे. पुढे जून-जुलैतही त्याचा परिणाम लक्षात येऊ शकेल.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘र
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात,
..तरीही भाजपाकडून अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे ध
जीव्हिके अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीक
मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्म
राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही
राजगृहाच्या तोडफोडप्रकरणी वामन मेश्राम यांनी केला निषे
निजामुद्दीन मरकझ: दिल्ली कोर्टाकडून १२२ मलेशियन नागरिक
सरकारी शाळांमधील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या शर्यती
बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालक
‘लॉकडाऊन’चे चटके; अर्थव्यवस्थेचे ३४ हजार कोटींचे नुकसा
पतंजलीने दोन लायसन्स कसे मिळवले खुलासा करावा, संभ्रम कर
शहीद जवानांकडे शस्त्रे नव्हती
१२ टक्के उद्योगांचे शटर डाऊन, देशातील ७० टक्के स्टार्ट अ
महाविकासआघाडीतला आणखी एक गोंधळ उघड, रोजगार नोंदणीसाठी व
‘महाजॉब्स’वर बेरोजगारांची झुंबड, ४ तासात १३ हजारांपेक्
मराठा आरक्षण प्रकरणी १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय देण
रेल्वे खासगीकरणामुळे ३ लाख सरकारी नोकर्‍यांवर कुर्‍हाड
रेल्वेचेे २४ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान, आधी प्रवाशा
भाजपा आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते, संजय र
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper