×

मुंबईत स्थलांतरीत मजुरांची दुरावस्था, श्रमिक ट्रेनमध्ये प्रवेश मिळेल या आशेवर फुटपाथवर ठाण मांडून बसले मजूर

Published On :    28 May 2020
साझा करें:

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर बुधवारीही स्थलांतरित मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सीएसएमटीहून परराज्यांसाठी सुटणार्‍या विशेष श्रमिक गाड्यांचा सिलसिला बुधवारी कायम होता. बेस्ट, एसटी, खाजगी बसेसमध्ये भरून राज्यातील परराज्यात जाणार्‍या मजुरांना रेल्वे स्टेशनपर्यंत आणण्यात येत आहे. सीएसएमटी जंक्शनहून ईस्टर्न एक्स्प्रेसवेकडे जाणारा रस्ता यासाठी पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद करून टाकला आहे.



मुबंई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर बुधवारीही स्थलांतरित मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सीएसएमटीहून परराज्यांसाठी सुटणार्‍या विशेष श्रमिक गाड्यांचा सिलसिला बुधवारी कायम होता. बेस्ट, एसटी, खाजगी बसेसमध्ये भरून राज्यातील परराज्यात जाणार्‍या मजुरांना रेल्वे स्टेशनपर्यंत आणण्यात येत आहे. सीएसएमटी जंक्शनहून ईस्टर्न एक्स्प्रेसवेकडे जाणारा रस्ता यासाठी पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद करून टाकला आहे.


ज्यांची नावं यादीत आहेत त्यांना पार्किंगच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटाईज करून स्टेशनच्या आवारात प्रवेश दिला जात आहे. मात्र असे शकडो लोक स्टेशनबाहेरच्या फूटपाथवर ठाण मांडून बसले आहेत, ज्यांना इथवर आणण्यात आलं खरं मात्र काही कारणाने त्यांना स्टेशनमध्ये प्रवेशच मिळू शकला नाही. यातील बरेचसे लोक मंगळपासून इथेच थांबून आहेत. यांना तुमची गाडी रद्द झालीय, ती आज येणार नाही तेव्हा तुम्ही नंतर या अशी कारण दिली गेली आहेत.


पोलीस कर्मचारी यांना पुन्हा घरी परतण्याची सूचना देत आहेत. पण दोन अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आपल्या मूळगावी, आपल्या घरी आपण परतणार या आशेनं यातील बरेचसे लोक आपला सारा गोतावळा गुंडाळून आलेत. आता इतक्यात परत मुंबईत परतायचं नाही, या उद्देशानं आपली भाड्याची खोली, झोपडी खाली करून हे लोकं स्टेशनवर दाखल झालेत. त्यामुळे आता ते मागे परतू शकत नाहीत. केवळ घराकडे जाणार्‍या गाडीत बसणं किंवा आहेत त्या फुटपाथवर आपल्या कुटुंबासह बसून वाट पाहात बसणं, एवढंच त्यांच्या हातात आहे. त्यांच्यासमोर इतर पर्यायच शिल्लक नाहीत.


कोलकाता, पश्चिम बंगाल इथं जाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या यापैकी काही मजुरांनी महाराष्ट्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साकडं घालत मदतीची याचना केली आहे. तेव्हा यांच्यासारख्या अशा असंख्य मजुरांना त्यांच्या राज्यात, त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवणं ही महाराष्ट्र सरकार आणि इतर राज्य सरकारांसह केंद्र सरकारचीही तितकीच जबाबदारी आहे, अशी भावना या मजुरांनी बोलून दाखवली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘र
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात,
..तरीही भाजपाकडून अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे ध
जीव्हिके अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीक
मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्म
राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही
राजगृहाच्या तोडफोडप्रकरणी वामन मेश्राम यांनी केला निषे
निजामुद्दीन मरकझ: दिल्ली कोर्टाकडून १२२ मलेशियन नागरिक
सरकारी शाळांमधील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या शर्यती
बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालक
‘लॉकडाऊन’चे चटके; अर्थव्यवस्थेचे ३४ हजार कोटींचे नुकसा
पतंजलीने दोन लायसन्स कसे मिळवले खुलासा करावा, संभ्रम कर
शहीद जवानांकडे शस्त्रे नव्हती
१२ टक्के उद्योगांचे शटर डाऊन, देशातील ७० टक्के स्टार्ट अ
महाविकासआघाडीतला आणखी एक गोंधळ उघड, रोजगार नोंदणीसाठी व
‘महाजॉब्स’वर बेरोजगारांची झुंबड, ४ तासात १३ हजारांपेक्
मराठा आरक्षण प्रकरणी १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय देण
रेल्वे खासगीकरणामुळे ३ लाख सरकारी नोकर्‍यांवर कुर्‍हाड
रेल्वेचेे २४ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान, आधी प्रवाशा
भाजपा आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते, संजय र
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper