×

गुजरातमध्ये कोरोना चाचण्यांचा गोंधळ, अहमदाबाद मेडीकल असोसिएशनची कोर्टात धाव

Published On :    29 May 2020
साझा करें:

गुजरातमध्ये अनेक ठिकाणी कोरोनाची लक्षणे असताना रूग्णांची कोरोना चाचणीच होत नाही. कोरोनाची संख्या लपवण्यासाठी हे सुरू आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. याप्रकरणी अहमदाबाद मेडीकल असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.



अहमदाबाद: गुजरातमध्ये अनेक ठिकाणी कोरोनाची लक्षणे असताना रूग्णांची कोरोना चाचणीच होत नाही. कोरोनाची संख्या लपवण्यासाठी हे सुरू आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. याप्रकरणी अहमदाबाद मेडीकल असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


अहमदाबादमध्ये खासगी आणि नॉन कोविड रूग्णालयात अनेक रूग्ण दाखल झाले आहेत. अनेकांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. परंतु त्यांची चाचणी करण्याचे कुठलेच धोरण नसल्याची प्रतिक्रिया धवनी रूग्णालयाचे संचालक डॉ.वंसत पटेल यांनी दिली आहे. कुठल्याही शस्त्रक्रियेपूर्वी कोरोनाची चाचणी गरजेचे आहे अशी आयसीएमआरची नियमावली आहे. परंतु याबाबत गुजरात सरकार असंवेदनशील असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. तसेच डॉक्टर आणि नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे त्यांनी सांगितले.


कोरोनासदृश्य आजाराने मृत्यू, कारण अस्पष्ट

अहमदाबादमध्ये शांताबाई शहा या ९२ वर्षाच्या आजींना कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. २१ मे पासून त्यांना ताप होता आणि श्‍वास घेण्यास त्रास होत होता. २३ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा विजय यांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. विजय यांना आपल्या आईचे अंत्यदर्शनही करता आले नाही. या प्रकरणात दोघांची कोरोना टेस्ट झाली नाही. अहमदाबाद मिररने याबाबत वृत्त दिले आहे. शहा कुटुंबाने याप्रकरणी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. तसेच कमी कोरोना टेस्ट केल्यामुळे आकडाही कमी होईल म्हणून राज्य सरकार टेस्ट करत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शांताबाई शहा यांचा मृत्यू कशामुळे झाला हे आता कळणारच नाही अशी खंत त्यांच्या कुटुंबाने व्यक्त केली.


राज्यातील खासगी प्रयोगशाळांना कोरोना टेस्ट करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. कोरोना टेस्ट करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी गरजेचे आहे. या प्रकरणात एक मुद्दा असा मांडला जात आहे की, जर जास्तीत जास्त केल्या तर राज्यात ७० टक्के कोरोनाचे रूग्ण आढळू शकतात, त्यामुळे राज्यात एकच गोंधळ उडू शकतो. असे असले तरी खासगी प्रयोगशाळांना चाचणी करण्यास बंदी घालणे चुकीचे असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते.


हे पण वाचा: कोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले, नर्सना भेदभावाची वागणूक


कमी टेस्ट, कमी आकडे राज्य सरकारचे धोरण?

कोरोना टेस्ट कमी केल्या तर कोरोनाचे आकडे कमी दाखवता येतील असे राज्य सरकारचे धोरण आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याचे कारण गेल्या काही दिवसात कोरोना टेस्टची आकडेवारी आज तकने दिली आहे. गुजरात सरकारने दिलेल्या आकड्यानुसार १७ ते २४ मे दरम्यान सरासरी ५ हजार कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. परंतु २५ मे रोजी ३ हजार ४९२ तर २६ मे रोजी २ हजार ९५२ टेस्ट करण्यात आल्या होत्या. गुजरात सरकार कोरोना प्रकरणी नागरिकांच्या आयुष्याशी खेळत असल्याची टीका कॉंग्रेसने केली.


खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना टेस्ट होत नसल्याने डॉक्टरांच्याही जीवाला धोका असल्याचे डॉ.भरत गढवी यांनी सांगितले. खासगी प्रयोगशाळेत चाचणी केल्यास त्याचे रिपोर्ट लवकर येतात. त्यामुळे रूग्णाला तसे उपचारही देता येतात. परंतु खासगी प्रयोगशाळेत चाचणी न केल्यास संपूर्ण मेडीकल टीमला नंतर क्वारंटाइन करावे लागते असे डॉ.गढवी म्हणाले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘र
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात,
..तरीही भाजपाकडून अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे ध
जीव्हिके अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीक
मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्म
राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही
राजगृहाच्या तोडफोडप्रकरणी वामन मेश्राम यांनी केला निषे
निजामुद्दीन मरकझ: दिल्ली कोर्टाकडून १२२ मलेशियन नागरिक
सरकारी शाळांमधील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या शर्यती
बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालक
‘लॉकडाऊन’चे चटके; अर्थव्यवस्थेचे ३४ हजार कोटींचे नुकसा
पतंजलीने दोन लायसन्स कसे मिळवले खुलासा करावा, संभ्रम कर
शहीद जवानांकडे शस्त्रे नव्हती
१२ टक्के उद्योगांचे शटर डाऊन, देशातील ७० टक्के स्टार्ट अ
महाविकासआघाडीतला आणखी एक गोंधळ उघड, रोजगार नोंदणीसाठी व
‘महाजॉब्स’वर बेरोजगारांची झुंबड, ४ तासात १३ हजारांपेक्
मराठा आरक्षण प्रकरणी १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय देण
रेल्वे खासगीकरणामुळे ३ लाख सरकारी नोकर्‍यांवर कुर्‍हाड
रेल्वेचेे २४ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान, आधी प्रवाशा
भाजपा आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते, संजय र
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper