×

सायबर गुन्हे वाढले; सायबर भामट्यांची कोरोनात चंगळ, मायक्रोसॉफ्ट तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने केले सावध

Published On :    29 May 2020
साझा करें:

कोव्हिड १९ (करोना) संसर्गाशी संपूर्ण जग झुंजत असताना या संसर्गाने सायबर भामट्यांना पुरेपूर साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनामुळे जगभरात निर्माण झालेल्या गोंधळाच्या वातावरणाचा फशयदा हे भामटे घेत आहेत.



 मुंबई: कोव्हिड १९ (करोना) संसर्गाशी संपूर्ण जग झुंजत असताना या संसर्गाने सायबर भामट्यांना पुरेपूर साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनामुळे जगभरात निर्माण झालेल्या गोंधळाच्या वातावरणाचा फशयदा हे भामटे घेत आहेत. याविषयी गुगल, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेनेही लोकांना सावध केले आहे.


एकट्या अमेरिकेत २०१८मध्ये तेथील नागरिकांनी ४२७.७१ अब्ज डॉलर इतकी रक्कम समाजासाठी दिली होती. लोकांमध्ये असलेली दानत पाहून सायबर चोरांच्या तोंडाला सध्या पाणी सुटले आहे. आर्थिक मदतीचे आवाहन करणारी संस्था प्रत्येक देशाच्या किंवा राज्याच्या प्रशासनाकडे नोंदणीकृत आहे का हे पाहावे, असे आवाहन नॉर्टन संस्थेने केले आहे.


गुगलनेही केले सावध

गुगलने एप्रिल महिन्यात एकूण १,७५५ वॉर्निंग आपल्या वापरकर्त्यांना पाठवल्या होत्या. यामध्ये काही हॅकर्स सरकारच्या पाठिंब्यावर हॅकिंग करत होते असेही उघड झाले. गुगलच्या थ्रेट ऍनालिसिस ग्रुपला अनेक हॅकर्स भारतातून कार्यरत असल्याचेही लक्षात आले आहे. या हॅकरकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने अनेक ई-मेल तयार केले जात आहेत. या ई-मेलद्वारे अमेरिका, स्लोव्हेनिया, कॅनडा, भारत, बहारिन, सायप्रस आणि ब्रिटन येथील वित्तसंस्था तसेच आरोग्यनिगा संस्थांना लक्ष्य केले जातआहे. ही माहिती गुगलच्या एका ब्लॉगवर दिली गेल्याचे एका इंग्रजी माध्यमाने म्हटले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करोना संसर्गाशी लढताना निधी उभारणीसाठी पीएम केअर्स फंडाची घोषणा केल्यानंतर लगेचच डझनावारी बनावट वेबसाइट तयार झाल्या. या वेबसाइटच्या साह्याने पीएम केअर्स फंडाला देणगी देण्याचे व त्यासाठी वैयक्तिक माहिती देण्याचे आवाहनही केले गेले. केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अशा वेबसाइटनी फसवल्याच्या आठ हजार तक्रारी आल्या आहेत. फसवल्या गेलेल्या नागरिकांमध्ये देशातील तसेच विदेशातील नागरिकांचा समावेश आहे.

मायक्रोसॉफ्टनेही दिला इशारा

कोव्हिड १९ या शब्दाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर फिशिंग मेल पाठवले जात असल्याबद्दल मायक्रोसॉफ्ट कंपनीनेही लोकांना सावध केले आहे. अशा फिशिंग मेलमध्ये नेटसपोर्ट मॅनेजर नावाची प्रणाली डाउनलोड करण्यास सांगितले जात असून ही प्रणाली डाउनलोड केल्यास ती तुमच्या कम्प्युटरचा ताबा घेऊन सर्व माहिती चोरते याकडेही मायक्रोसॉफ्टने लक्ष वेधले आहे. भारताला अशा सायबर चोरांपासून वाढता धोका असल्याचे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘र
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात,
..तरीही भाजपाकडून अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे ध
जीव्हिके अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीक
मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्म
राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही
राजगृहाच्या तोडफोडप्रकरणी वामन मेश्राम यांनी केला निषे
निजामुद्दीन मरकझ: दिल्ली कोर्टाकडून १२२ मलेशियन नागरिक
सरकारी शाळांमधील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या शर्यती
बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालक
‘लॉकडाऊन’चे चटके; अर्थव्यवस्थेचे ३४ हजार कोटींचे नुकसा
पतंजलीने दोन लायसन्स कसे मिळवले खुलासा करावा, संभ्रम कर
शहीद जवानांकडे शस्त्रे नव्हती
१२ टक्के उद्योगांचे शटर डाऊन, देशातील ७० टक्के स्टार्ट अ
महाविकासआघाडीतला आणखी एक गोंधळ उघड, रोजगार नोंदणीसाठी व
‘महाजॉब्स’वर बेरोजगारांची झुंबड, ४ तासात १३ हजारांपेक्
मराठा आरक्षण प्रकरणी १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय देण
रेल्वे खासगीकरणामुळे ३ लाख सरकारी नोकर्‍यांवर कुर्‍हाड
रेल्वेचेे २४ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान, आधी प्रवाशा
भाजपा आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते, संजय र
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper