×

रेशन कार्डासाठी आंदोलन करणार्‍या २५० आदिवासींविरूद्ध गुन्हे दाखल, पालघरमधील प्रकार, प्रशासनाच्या तुघलकी कारभाराविरोधात संताप

Published On :    29 May 2020
साझा करें:

लॉकडाऊन दरम्यान पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी रेशनकार्ड न मिळाल्याबद्दल आंदोलन करणार्‍या सुमारे २५० आदिवासींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या तुघलकी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यत केला जात आहे.



पालघर: लॉकडाऊन दरम्यान पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी रेशनकार्ड न मिळाल्याबद्दल आंदोलन करणार्‍या सुमारे २५० आदिवासींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या तुघलकी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यत केला जात आहे.


पालघरचे पोलिस प्रवक्ते सचिन नवाडकर म्हणाले की, आदिवासी गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील मोखाडा, वसई, डहाणू येथील तहसील कार्यालयांच्या बाहेर निदर्शने करीत आहेत. या निदर्शकांमध्ये अनेक महिलांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. ते ईजीएस (रोजगार हमी योजना) अंतर्गत काम करण्याची मागणी करत होते.  निदर्शकांवर मोखाडा, वसई, डहाणू व इतर काही पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर, शहापूर आणि मुरबाड या तहसील कार्यालय परिसरातही असेच निषेध करण्यात आले. विविध ठिकाणी आंदोलन करणार्‍या किमान दीडशे आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, आदिवासींना नेहमीच दुजाभावाची वागणूक दिली जाते. हे आजचेच नाही तर पूर्वापार चालत आले आहे. आदिवासींना संविधानात विशेषाधिकार देऊनही त्याची शासक वर्गाकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे कधी नॅशनल कॉरिडारच्या अथवा व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली त्यांच्या जमीनी हडपल्या जात आहेत. 


त्यांना अद्यापि ५ व ६ वी अनुसूची लागू केलेली नाही. आदिवासींना न्यायालय अथवा संसदेचेही कायदे लागू नाहीत. त्यांची स्वतंत्र पंचायत असेल. त्या पंचायतीचा निर्णय बदलण्याचा अधिकार संसदेलाही नाही. त्यांच्या जमीनी बिगर आदिवासी खरेदी करू शकत नाही. असे असतानाही त्यांच्याच जागांवर शासक वर्गाकडून आक्रमण केले जात आहे. जो शासक वर्ग जमीनी हडपत आहे तो शासक आदिवासींना रेशन कार्ड देईल का? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाचे मूळ हे ब्राम्हणी व्यवस्थेत दडलेले आहे हे लक्षात येत असल्याची प्रतिक्रिया लोकमानसामधून व्यक्त होत आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘र
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात,
..तरीही भाजपाकडून अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे ध
जीव्हिके अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीक
मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्म
राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही
राजगृहाच्या तोडफोडप्रकरणी वामन मेश्राम यांनी केला निषे
निजामुद्दीन मरकझ: दिल्ली कोर्टाकडून १२२ मलेशियन नागरिक
सरकारी शाळांमधील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या शर्यती
बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालक
‘लॉकडाऊन’चे चटके; अर्थव्यवस्थेचे ३४ हजार कोटींचे नुकसा
पतंजलीने दोन लायसन्स कसे मिळवले खुलासा करावा, संभ्रम कर
शहीद जवानांकडे शस्त्रे नव्हती
१२ टक्के उद्योगांचे शटर डाऊन, देशातील ७० टक्के स्टार्ट अ
महाविकासआघाडीतला आणखी एक गोंधळ उघड, रोजगार नोंदणीसाठी व
‘महाजॉब्स’वर बेरोजगारांची झुंबड, ४ तासात १३ हजारांपेक्
मराठा आरक्षण प्रकरणी १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय देण
रेल्वे खासगीकरणामुळे ३ लाख सरकारी नोकर्‍यांवर कुर्‍हाड
रेल्वेचेे २४ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान, आधी प्रवाशा
भाजपा आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते, संजय र
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper