×

मानसिक गुलामी आणि लाचारी

Published On :    1 Jul 2020
साझा करें:

मानसिक गुलामी व लाचारीचे असंख्य उदाहरणे आपल्या समोर आहेत. सत्य समजून सुद्धा सत्य बोलण्याची हिंमत होत नसेल तर याचा अर्थ त्याच्या मागे वेगळीच शक्ती काम करते आहे. आज तर मानसिक गुलामांच्या आणि लाचारांच्या फौजा च्या फौजा तयार होत आहेत. चुकीचे काम करून जाणारे वेगळे आणि बदनाम होणारे वेगळेच असतात.



मानसिक गुलामी व लाचारीचे असंख्य उदाहरणे आपल्या समोर आहेत. सत्य समजून सुद्धा सत्य बोलण्याची हिंमत होत नसेल तर याचा अर्थ त्याच्या मागे वेगळीच शक्ती काम करते आहे. आज तर मानसिक गुलामांच्या आणि लाचारांच्या फौजा च्या फौजा तयार होत आहेत. चुकीचे काम करून जाणारे वेगळे आणि बदनाम होणारे वेगळेच असतात. पण तो बदनाम होऊनही आवाज उठवत नाही कारण मानसिक गुलामी आहे. 


काही काही लोक एवढे लाचार आहेत की बोलण्याचा अधिकार असूनसुद्धां स्वतःच्या मताने बोलू शकत नाहीत. मानसिक गुलाम आणि लाचार यामध्ये थोडासा फरक आहे तो असा की मानसिक गुलाम असलेल्या व्यक्तीला मालकाने जे सांगितले ते खरेच वाटते आणि लाचार तो व्यक्ती असतो ज्याला सत्य माहिती असते पण तो बोलू शकत नाही. अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत चालली आहे. 


कोणी धर्माच्या नावाने कोणी जातीच्या नावाने गुलामी स्विकारून लाचारी करण्याचे स्विकारलेले आहे. पांढरपेशी दिसणारे, सुटबुट कोटात राहणारे हे मानसिक गुलाम व लाचार देशाला व देशांतर्गत समतावादी व्यवस्थेला घातक असतात याचे लाखो उदाहरणे आपल्या समोर आहेत. कोरोना काळात टाळी, थाळी, मेणबत्ती हे मानसिक गुलाम व लाचारी तपासण्याची परिक्षाच होती. 


कोरोना पातळीवर प्रधानमंत्र्यांनी परिमाण कारण निर्णय घेणे गरजेचे असताना टाळी, थाळी, मेणबत्ती लाऊन काय साध्य केले हे कोणालाच कळाले नाही. परंतु प्रधानमंत्र्यानी सांगितले म्हणून वाजवले. दुसरी गोष्ट कमी रुग्ण असताना लॉकडाऊन केले अनेक लोकांनी समर्थन केले कारण त्यामुळे कोरोना थांबेल अशी अपेक्षा सर्वांची होती. पण कोरोना काही थांबला नाही वाढतच गेला. कोरोनाचा आकडा शेकड्यात होता तेव्हा कडकडीत बंद आणि आज कोरोनाचा आकडा लाखात तर सर्वत्र चालू. यावरून एक गोष्ट तर सिद्ध होईल ती म्हणजे एकतर  कोरोना महामारी नसून फक्त एक भिती आहे, नाहीतर कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा अपयशी प्रयत्न आहे. 


दोन्हीपैकी एक गोष्ट मान्य करणारा तो माणूस. दोन्ही गोष्टी मान्य नसणारा म्हणजे मानसिक गुलाम होय. सत्य बोलल्यानंतर दुसर्‍याला झोंबणारे असेल तर तो मानसिक गुलाम असतो. मानसिक गुलामगिरी खुप घातक असली तरी आजही बहुसंख्य लोक मानसिक गुलाम आहेत. त्यांना त्यामधून बाहेर काढणे हीच आपली संस्कृती आहे. पण काही लोक संस्कृतीच्या नावाखाली विकृती पोसत आहेत ही शोकांतिका आहे.


दोन चार दिवसापूर्वी भारताचे उद्योगपती पंतजली समुहाचे रामकृष्ण यादव यांनी एका भल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये कोरोनावर पंतजलीने औषधी शोधून काढले व याचे परिणाम खात्रीशीर आहेत याचा दावा करून कोरोनील औषध बाजारात आणले. जेव्हा त्या औषधाची तपासणी करण्यात आली तेव्हा दोन गोष्टी समोर आल्या पहिली गोष्ट रामकृष्ण यादव यांनी सांगितले होते की कोरोनाची औषधी पतंजली समुहाने बनवली तर पतंजली समुहाकडे कोरोनावर औषधी बनवण्याचा परवानाच नव्हता. 


खोकल्यावर आयुर्वेदिक औषध निर्माण करण्याचा परवाना घेऊन कोरोनावर औषधी निर्माण केल्याचा दावा रामकृष्ण यादव यांनी केला होता. दुसरी गोष्ट कोरोनील खोकला दूर करू शकते कोरोना नाही म्हणजे रामकृष्ण यादव यांनी सरकारची व देशातील जनतेची दिशाभूल करून देशद्रोहच केला आहे. परवाना नसताना औषधी बनवले आणि बनवलेले औषध कोरोना बरा करू शकत नाही पण या माध्यमातून लोकांना भावनिक बनवून करोडो रुपये लाटण्याचे हे नियोजन होते हे मात्र खरे झाले. 


दोनशेपेक्षा जास्त रुग्णांवर याची चाचणी घेऊन सर्वांचा कोरोना ठिक होण्याचा दावा करणारे पण ते दोनशे रुग्ण कोठून निवडले हे न सांगणार्‍या रामकृष्ण यादव यांच्या कौशल्याला मानायलाच पाहिजे. हा दावा ज्यावेळी ज्या मंचावरून त्यांनी केला त्या वेळी त्या मंचावर  निम्स युनिव्हर्सिटीचे चेअरमन बि. एस. तोमर हे सुद्धा उपस्थित होते. वैद्यकीय शास्त्रात पारंगत एका वैद्यकीय युनिव्हर्सिटीचे चेअरमन तेथे उपस्थित असतात, त्याच कार्यक्रमामध्ये रामकृष्ण यादव रुग्णांचा आकडा सांगुन कोरोनीलमुळे रुग्ण बरे झाल्याचा दावा करतात आणि बि.एस. तोमर एकही प्रश्न करत नाहीत अथवा त्यांचे मत चुकीचे आहे असे सुद्धां बोलत नाहीत याचाच अर्थ त्यांनी सुद्धा कोरोनील हे कोरोनावर खात्रीशीर औषध आहे याला दुजोरा दिला. त्यानंतर रामकृष्ण यादव व पंतजली विरोधात अनेक ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. लोकांना रामकृष्ण यादव यांचे उत्पादन फसवणारे कसे आहे हे सिद्ध करून देशाच्या वेगवेगळ्या भागात गुन्हे दाखल झाले. 


गुन्हे दाखल झाल्यानंतर कोरोनीलवर चर्चा व्हायली लागली आणि याचाच फायदा घेऊन एका राष्ट्रीय चॅनलवाल्यांनी चर्चेसाठी निम्स विद्यापीठाच्या चेअरमनलाच बोलावले व प्रश्न विचारला तुम्ही ज्या मंचावर होते त्याच मंचावरून रामकृष्ण यादव यांनी दावा केला तेव्हा तुम्ही त्यांना काहीच का बोलला नाही तर तोमर यांनी मस्त विनोदी शैलीमध्ये उत्तर दिले त्यामध्ये प्रतिकार शक्तीवर्धक आहेत. एका विद्यापीठाच्या प्रमुखाला तुम्ही बोलले का नाही म्हणले तर तो फायदे सांगतात. 


एवढा मोठा विनोद मानसिक गुलामीचे दृश्य दाखवून जाते. त्या चॅनलचा निवेदन म्हणतोय सर माझ्या सात वरर्षाच्या मुलाला माहिती आहे की अश्वगंधा व तुळसी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पण कोरोनील कोरोना बरा करु शकतो का? हो कि नाही मध्ये उत्तर द्या त्यावर तोमर साहेब फक्त सर सर करून हो किंवा नाही बोलायची हिंमत होत नसेल आणि सात वर्षाच्या मुला सोबत तुलना करूनही सत्य बोलण्याची हिंमत नसेल तर याला मानसिक गुलामी म्हणू नये तर काय म्हणावे.


रामकृष्ण यादव यांनी फसवणूक केली असे तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न विचारल्या नंतर पुन्हा तोमर साहेब लहान लेकराप्रमाणे वागायला लागले, काय बोलावं कळत नाही. रामकृष्ण यादव यांचे नाव सुद्धा घेत नाहीत या मागे काय कारण असु शकते? एका वैद्यकीय विद्यापिठाचा प्रमुख वैद्यशास्त्राचा पुर्ण अभ्यास असलेल्या तज्ञ वैद्यकीय क्षेत्रात अडाणी असलेल्या व्यक्तीने केलेला औषधीचा दावा खरा आहे की खोटा हे बोलण्याची हिम्मत होत नसेल तर याला काय म्हणावं? किती गुलामी आणि किती लाचारी असावी? 


तज्ञ व्यक्ती अडाणी व्यक्तीचे दावे खरे कि खोटे यावर बोलणे टाळतो याचा अर्थ त्याला त्या  क्षेत्राचे ज्ञान नाही असे मुळीच नाही. ज्ञान आहे पण अडाणी माणसासमोर बोलण्याची हिम्मत होत हि गुलामी आहे. आणि अशा गुलामांमुळे संपूर्ण क्षेत्र कलंकित केले जाते. जर शिकलेल्या आणि संबधित क्षेत्राचे ज्ञान असलेल्या लोकांचे हे हाल असतील तर बाकीच्या सर्वसामान्य लोकांची स्थिती कशी असेल याचा अंदाज घेणे सुद्धा मोठ्या जिकरीचे काम आहे. 


मानसिक गुलामी आणि लाचारी सोडायची असेल तर शिक्षणाचा वापर सत्यासाठी करणे खूप गरजेचे आहे. शिक्षीत व तज्ञ लोक अज्ञानापुढे नतमस्तक व दुसर्‍याच्या हातचे हस्तक होत असतील तर देश हा गुलामगिरी कडेच गेल्या शिवाय राहणार नाही. आणि देशामध्ये गुलामांची आणि लाचारांची संख्या कशी वाढेल यावरच व्यवस्था काम करत आहे.

विनोद पंजाबराव सदावर्ते
 मो: ९१३०९७९३००

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
लोकांच्या विरोधानंतरही ‘सीएए’चा नियम करण्याची केंद्र स
राईट ऑफ कर्जांच्या वसुलीची माहिती नाही
श्रीरामाच्या नावाने भाजपने पाणी विकलं, विटा विकल्या, जित
स्वत:ला साधू-संत म्हणवणार्‍या ब्राम्हणांकडून उद्धव ठाक
६ सरकारी बँका खासगीकरणाच्या वरवंट्याखाली भरडणार
कुणी करतोय मजुरी, कुणी सुरू केला हातगाडीवर व्यवसाय
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्र, बिहारमध्ये
राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षम
पालघर जिल्ह्यात आदिवासींच्या उपासमारीने गाठले टोक
एनईपीचा तीन भाषेचा फॉर्म्युला तामिळनाडू सरकारने नाकारल
येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला
विकासाच्या नावाखाली नीतीशकुमारांनी बिहार बनवले भिकारी
अचानक मुले हुशार झाली की गुणांचा फुगवटा
रेशनचा तब्बल ११० टन तांदूळ साठा जप्त
केंद्राने महागाईवर लक्ष केंद्रित करायला हवे
अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे
रोजच्या भाकरीच्या विवंचनेत कुठून देणार ऑनलाईन शिक्षण
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा चेंडू केंद्र सरकारच्या को
पंजाब हादरले; विषारी दारू प्यायल्याने ८६ जणांचा मृत्यू,
मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने पश्‍चिम रेल्वेला २९१ क
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper