×

अर्थव्यवस्थेच्या चक्राने घेतला वेग

Published On :    3 Jul 2020
साझा करें:

कोरोना व्हायरसचा फैलाव आणि तो रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थव्यवस्थेच्या चक्राने आता जून महिन्यात चांगलाच वेग पकडला आहे. अनलॉक १ चा टप्पा एक जूनपासून सुरू झाला होता. त्यामुळे त्यानंतर विकासाचे निदर्शक असलेल्या सर्वच घटकांमध्ये सकारात्मक वाढ दिसून आल्याने अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा वेगाने फिरू लागल्याचे समोर आले आहे.



नवी दिल्ल: कोरोना व्हायरसचा फैलाव आणि तो रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थव्यवस्थेच्या चक्राने आता जून महिन्यात चांगलाच वेग पकडला आहे. अनलॉक १ चा टप्पा एक जूनपासून सुरू झाला होता. त्यामुळे त्यानंतर विकासाचे निदर्शक असलेल्या सर्वच घटकांमध्ये सकारात्मक वाढ दिसून आल्याने अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा वेगाने फिरू लागल्याचे समोर आले आहे.


केंद्र सरकारने अनलॉक १ ची घोषणा केल्यानंतर अनेक  निर्बंध शिथिल केले. त्यामुळे मालवाहतुकीचा वेग वाढून तो लॉकडाऊनच्या पूर्वी असलेल्या पातळीवर आला, ई बिलात वाढ झाली. तसेच, मे महिन्यातील जीएसटी महसुलात वेगाने वाढ झाली आहे. जूनमध्ये ९०९१७ कोटी रुपये जीएसटीतून मिळाले, मे मध्ये ही रक्कम ६२००९ कोटी आणि एप्रिलमध्ये ३२२९४ कोटी इतकी होती. अर्थात, पहिल्या तिमाहीतील एकूण जीएसटी महसूल हा ४१ टक्के कमीच आहे.  वीज वापरात वाढ झाली आहे.


हे सर्व अर्थव्यवस्थेला पूरक असे बदल जूनमध्ये घडून आले आहेत. शिवाय राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) रोजगार मागणी कमी झाल्याने उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाले. बँकांच्या क्रेडिटमध्ये पंधरवड्यात ३२ हजार ०२२ कोटींची वाढ झाली. या सर्वांचा सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणार्‍या घटकांवर झाला आहे. आरटीओ ट्रॅन्झॅक्शन्स, टोल संकलन, वीज वापर, रेल्वे मालवाहतूक यातही चांगलीच वाढ दिसून आली आहे.



‘कंपन्यांनी पुन्हा उत्पादनास प्रारंभ केला आहे. विविध क्षेत्रांना वेग आल्याचे दिसून येत आहे. काही कंपन्यांनी ६० टक्के उत्पादनांपर्यंत झेप घेतली आहे. मनुष्यबळ कमतरतेमुळे काही कंपन्या ३० टक्के उत्पादनापर्यंत राहिल्या आहेत. सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, वाहनउद्योग या क्षेत्रांना गती मिळाल्यास एकूण अर्थव्यवस्थेत आणखी वाढ दिसून येईल.’

- संगीता रेड्डी, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मेक इन इंडियाची व्याख्याच बदलावी लागेल
वैदिक धर्म मानणारे अन्य धर्मांवर करतायेत अतिक्रमण
संशोधन, रिसर्च,आणि मूलभूत शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओ
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांचं जगणं मुश्कील
सरन्यायाधीशांवरची टीका ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान क
मराठा आरक्षणाकडे महाआघाडी सरकारचे दुर्लक्ष, संघटनांचा
विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतरही काश्मीरातील परिस्थ
मुंबईतील उद्योग लवकरच सुरू करणार
‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा
बोगस धान व्यापार्‍यांची चौकशी करून शेतकर्‍यांची लूटमार
चिनी घुसखोरीची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर
धर्म आणि मंदिरं टीकवण्यासाठी हिंदूंकडे सत्ता असणे गरजे
फडणवीस सरकारची बळीराजा चेतना योजना ठाकरे सरकारने केली र
नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी मिळताचा शिक्षणाच्या ब्राह्म
विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब, सर्वोच्च न्याय
कॉंग्रेसद्वारा राम मंदिर उभारणीचे जाहीरपणे समर्थन
प्रशांत भूषण यांनी माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे
भाजप आमदाराचा सुटला तोल, मतदाराशी बोलताना केली शिविगाळ
दहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच, विद्या
एकनाथ खडसेंनाही महावितरणच्या वीज बिलांचा शॉक
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper