×

ओबीसींच्या वैद्यकीय आरक्षणाबाबत कॉंग्रेसचा आव

Published On :    4 Jul 2020
साझा करें:

आरक्षण लागू करा असा कांगावा



नवी दिल्ली: देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू ते सोनीया गांधींपर्यत ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करणार्‍या कॉंग्रेसने आता ओबीसींच्या आरक्षणाबाबत मात्र मोठा आव आणला आहे. आमच्या मनात ओबीसींबाबत पुळका असल्याचे भासवत वैद्यकीय आरक्षण लागू करा असा कांगावा करण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या या दुहेरी भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत.


कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रधानमंत्री मोदी यांना शुक्रवारी पत्र लिहून सर्व राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमधील वैद्यकीय शैक्षणिक संस्थांमध्ये ‘ओबीसी’ आरक्षणाच्या निर्णयाचे पालन होईल, याची काळजी घेतली जावी असे  म्हटले आहे.


समानता व सामाजिक न्यायाच्या हिताच्यादृष्टीने केंद्र सरकारकडे मी आग्रह करते की, राज्य व केंद्र शासित प्रदेशांधील वैद्यकीय संस्थांमध्ये मेडिकल व डेंटलच्या जागांसाठी अखिल भारतीय कोट्याअंतर्गत ओबीसी विद्यार्थांना आरक्षण दिले जावे, असे सोनीया गांधी म्हणाल्या आहेत.


सोनिया गांधी यांनी मोदी यांना या संदर्भात लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशभरातील सर्व राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमधील वैद्यकीय शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचे पालन केले जाईल, याची काळजी घेतली जावी. ‘NEET’ च्या माध्यमातून वैद्यकीय संस्थांमध्ये होणार्‍या प्रवेशासंदर्भात ओबीसी विद्यार्थांना आरक्षणाची सुविधा मिळण्यास अडचणी येत आहेत. अखिल भारतीय कोट्यानुसार सर्व केंद्रीय व प्रादेशिक वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या प्रवर्गांसाठी क्रमशः १५ टक्के, ७.५ टक्के व १० टक्के जागा आरक्षित असतात. तर,अखिल भारतीय कोट्या अंतर्गत ओबीसी विद्यार्थांसाठी आरक्षण केवळ केंद्रीय संस्थांपुरतेच मर्यादित आहे.


तर, कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले की, ‘ऑल इंडिया फेडरेशन फॉर अदर बॅकवर्ड क्लासेस’च्या वतीने एकत्र करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्य व केंद्र शासित प्रदेशातील वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू न झाल्याने २०१७ पासून ओबीसी विद्यार्थांना ११ हजार पेक्षा अधिक जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यांच्या मते राज्यातील वैद्यकीय संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण न दिले जाणे, ९३ व्या घटनात्मक दुरुस्तीचे उल्लंघन आहे व यामुळे पात्र ओबीसी विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यापासून वंचित राहत आहेत.


ओबीसींच्या आरक्षणाबाबत कॉंग्रेस-भाजपाकडून धोकाच

आज वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षण ओबींसींना देण्यात यावे असे कॉंग्रेस म्हणत असली तरी इतिहासाकडे नजर टाकल्यास सर्वप्रथम ओबीसींच्या आरक्षणाला कॉंग्रेसने विरोध केला. पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी ओबीसी आयोग गठीत केला नाही म्हणून विश्‍वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. 


नेहरू यांचा कित्ता इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही गिरवला. कॉंग्रेसच्या सर्व प्रधानमंत्र्यांनी याबाबत चालढकल केली. एवढेच नव्हे तर १६ नोव्हेंबर १९९२ रोजी ओबीसींबाबत चुकीचा निर्णय दिला. ५२ टक्के असलेल्या ओबीसींना केवळ २७ टक्के आरक्षण देऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. तत्कालीन सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांनी ५० टक्क्यांच्यावर आरक्षण देता येत नाही असे सांगत संविधानविरोधी निर्णय दिला. २७ टक्के कागदावरच असून प्रत्यक्ष ओबीसींना आरक्षण आज २.५ टक्के मिळत आहे. 


बाकी सारे ओबीसींचे आरक्षण विदेशी अल्पसंख्य ब्राम्हणच खात आहे. कॉंग्रेसची री भाजपानेही ओढली असून त्यांनी रथयात्रा काढत मंडल कमिशनला विरोध केला. लोकांना कमंडल हाती धरायला लावून मंडल कमिशनवरून लक्ष विचलित करण्यात आले. त्यामुळे कॉंग्रेस व भाजपा या दोन्ही ब्राम्हणांच्या पक्षांनी ओबीसीला फसवले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मेक इन इंडियाची व्याख्याच बदलावी लागेल
वैदिक धर्म मानणारे अन्य धर्मांवर करतायेत अतिक्रमण
संशोधन, रिसर्च,आणि मूलभूत शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओ
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांचं जगणं मुश्कील
सरन्यायाधीशांवरची टीका ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान क
मराठा आरक्षणाकडे महाआघाडी सरकारचे दुर्लक्ष, संघटनांचा
विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतरही काश्मीरातील परिस्थ
मुंबईतील उद्योग लवकरच सुरू करणार
‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा
बोगस धान व्यापार्‍यांची चौकशी करून शेतकर्‍यांची लूटमार
चिनी घुसखोरीची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर
धर्म आणि मंदिरं टीकवण्यासाठी हिंदूंकडे सत्ता असणे गरजे
फडणवीस सरकारची बळीराजा चेतना योजना ठाकरे सरकारने केली र
नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी मिळताचा शिक्षणाच्या ब्राह्म
विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब, सर्वोच्च न्याय
कॉंग्रेसद्वारा राम मंदिर उभारणीचे जाहीरपणे समर्थन
प्रशांत भूषण यांनी माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे
भाजप आमदाराचा सुटला तोल, मतदाराशी बोलताना केली शिविगाळ
दहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच, विद्या
एकनाथ खडसेंनाही महावितरणच्या वीज बिलांचा शॉक
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper