×

शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना काढून टाकू, इंग्रजी माध्यमाच्या शाळांची धमकी

Published On :    4 Jul 2020
साझा करें:

शुल्कवसुलीला मनाई करणार्‍या शासन आदेशाला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर त्याचा लाभ उठवत शाळांनी शुल्क भरण्यासाठी पालकांवर दडपण आणण्यास सुरूवात केली आहे. शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याच्या धमक्या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांनी दिल्या आहेत.



मुंबई: शुल्कवसुलीला मनाई करणार्‍या शासन आदेशाला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर त्याचा लाभ उठवत शाळांनी शुल्क भरण्यासाठी पालकांवर दडपण आणण्यास सुरूवात केली आहे. शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याच्या धमक्या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांनी दिल्या आहेत.


टाळेबंदीच्या काळात शुल्क घेण्यास आणि यंदा शुल्कवाढ करण्यास शासनाने मनाई केली. त्यानंतर काही काळ शाळांच्या शुल्कवसुलीला चाप बसला. मात्र, शासनाच्या आदेशाला शिक्षणसंस्थांनी न्यायालयात आव्हान दिले. त्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने शासनाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. त्याचा फायदा उठवत आता शाळांनी पालकांमागे शुल्कासाठी तगादा लावला आहे.


हे पण वाचा: ओबीसींच्या वैद्यकीय आरक्षणाबाबत कॉंग्रेसचा आव



देशभर शाखा असलेल्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेने दहा दिवसांत शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली आहे. राज्यातील सर्व शाखांतील पालकांना याबाबतचे पत्र शाळेने पाठवले आहे. ‘या शैक्षणिक वर्षांसाठी शुल्क न भरलेल्या पालकांना आमच्या शाळेत पाल्यांना शिक्षण देण्यात रस नाही असे समजण्यात येईल. त्यानुसार १३ जुलैपासून आपल्या पाल्याच्या जागी नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. आपण अजूनही आपल्या मुलांना आमच्या शाळेत ठेवू इच्छित असाल तर ताबडतोब शुल्क भरण्यात यावे,’ अशा आशयाचे पत्र शाळेने दिले आहे.

ऑनलाइन वर्गात बसण्यासही मनाई..
शुल्क भरले नसल्याने नवी मुंबईतील एका शाळेने विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाना बसण्यास मनाई केली. विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात समाविष्ट न करणे, सहभागी करून घेतल्यास त्यांचा अपमान करणे, त्यांना वर्गातून काढून टाकणे असे प्रकार शाळेकडून सुरू असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मेक इन इंडियाची व्याख्याच बदलावी लागेल
वैदिक धर्म मानणारे अन्य धर्मांवर करतायेत अतिक्रमण
संशोधन, रिसर्च,आणि मूलभूत शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओ
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांचं जगणं मुश्कील
सरन्यायाधीशांवरची टीका ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान क
मराठा आरक्षणाकडे महाआघाडी सरकारचे दुर्लक्ष, संघटनांचा
विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतरही काश्मीरातील परिस्थ
मुंबईतील उद्योग लवकरच सुरू करणार
‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा
बोगस धान व्यापार्‍यांची चौकशी करून शेतकर्‍यांची लूटमार
चिनी घुसखोरीची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर
धर्म आणि मंदिरं टीकवण्यासाठी हिंदूंकडे सत्ता असणे गरजे
फडणवीस सरकारची बळीराजा चेतना योजना ठाकरे सरकारने केली र
नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी मिळताचा शिक्षणाच्या ब्राह्म
विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब, सर्वोच्च न्याय
कॉंग्रेसद्वारा राम मंदिर उभारणीचे जाहीरपणे समर्थन
प्रशांत भूषण यांनी माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे
भाजप आमदाराचा सुटला तोल, मतदाराशी बोलताना केली शिविगाळ
दहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच, विद्या
एकनाथ खडसेंनाही महावितरणच्या वीज बिलांचा शॉक
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper