×

मुंबईतील उद्योग लवकरच सुरू करणार

Published On :    7 Aug 2020
साझा करें:

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची स्पष्टक्ती



मुंबई : कोरोना वायरसच्या महामारीने संपूर्ण जगाला वेढा घातला आहे. यातून भारतातील राज्येही सुटलेली नाहीत. या महामारीचा सर्वाधिका फटका हा प्रवासी मजूरांना बसला असून या महामारीचा प्रसार होऊ नये म्हणून उद्योगधंदे ही बंद आहेत. अशातच उद्योगधंदयांमध्ये काम करणार्‍या नौकरदारांना विशेषकरुन मुंबईतील दिलासा देणारी बातमी आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईतील उद्योगधंदे लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.


कोरोनाचे संकट कायम असले तरी उद्योगचक्र बंद ठेवणे अर्थकारणासाठी परवडणारे नाही, त्यामुळे मुंबई महानगर व इतर महापालिका क्षेत्रांतील अत्यावश्यक सेवांसह इतर उद्योग सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय लवकरच घेईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी सांगितले. उद्योजक संघटनांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श कार्यप्रणालीचे पालन करण्याची हमी देणारे प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे देसाई यांनी उद्योजक संघटकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या वेबिनारमध्ये स्पष्ट केले.


विशेषत: मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली व इतर कंटेनमेंट झोन परिसरातील उद्योग मागील चार महिन्यांपासून ठप्प आहेत. त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाल्याचे उद्योजकांनी सांगितले. दरम्यान, उद्योग सुरू करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्योगविश्व पूर्ववत करण्याबाबत सकारात्मक आहेत, ही बाब उद्योगक्षेत्रासाठी दिलासादायक आहे. 


परंतु त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे देसाई म्हणाले. नागपूर, औरंगाबाद व इतर ठिकाणी वाहतुकीची समस्या असल्याचे काही उद्योजकांनी सांगितल्यानंतर त्या सोडविण्याचे आश्‍वासन एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
भारतात घोटाळे, अफरातफर, करचोरीमधून दोन लाख कोटींचा भ्रष्
सरकारी बँकांमध्ये १९ हजार ९६४ कोटींच्या फसवणुकीची २ हजा
डॉ. कफील खान यांनी योगी सरकारला खेचले संयुक्त राष्ट्र सं
सोलापुरात ‘एक मराठा...लाख मराठा’चा जयघोष
राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणारे आठ खासदार
राज्यात अतिवृष्टीमुळे १ लाख ६२ हजार ४७७ हेक्टर क्षेत्र ब
गेल्या १० वर्षात गटार आणि टाक्यांची सफाई करताना ६३१ लोका
बीएसएनएलने एससी, एसटीची पदोन्नती रोखली
मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करा
सरकार झोपा काढतेय, वादळग्रस्तांना सोडले वार्‍यावर
कामगारांना काढणे आता सोपे, संप करणेही मुश्कील
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प
मुंबईतील १८ ठिकाणी ठिय्या आंदोलन
मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीची तक
केंद्रातील भाजपा सरकारने देशाला नेले दिवाळखोरीकडे
भाजप सत्तेत आल्यापासून सर्वोच्च न्यायालयाचे अध:पतन!
सुविधांच्या नावाखाली रेल्वेने प्रवाशांचा खिसा कापला
युती केली हेच चुकले, नाहीतर १५० जागा जिंकल्या असत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper