×

चिनी घुसखोरीची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरुन गायब

Published On :    7 Aug 2020
साझा करें:

पूर्व लडाखमधील गलवान घाटीत झालेल्या हिसंक झडपमध्ये भारताचे २० जवान शहीद झाल्यापासून भारत आणि चीन दरम्यान तनावाचे संबंध आहेत.



नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान घाटीत झालेल्या हिसंक झडपमध्ये भारताचे २० जवान शहीद झाल्यापासून भारत आणि चीन दरम्यान तनावाचे संबंध आहेत. गलवान घाटीत झालेल्या हिंसक झडपनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते की ना कोणी आमच्या सीमेत घुसखोरी केलेली आहे व ना कोणतीही भारताची पोस्ट चीनच्या कब्ज्यात आहे.


यानंतर भारतीय हद्दीत चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे कागदपत्रांच्या माध्यमातून संरक्षण मंत्रालयाने मान्य केले होते. मात्र आता संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर चिनी घुसखोरीची माहिती देणारी कागदपत्र गायब करण्यात आले आहे.  मंगळवारपासून ही माहिती दिसत होती. पण आता संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरुन हे पेज गायब आहे.


नियंत्रण रेषेजवळ चीनची आक्रमकता वाढत चाललीय. खासकरुन पाच मे २०२० पासून गलवान खोर्‍याजवळ चिनी सैनिकांची आक्रमकता वाढत चाललीय. कुंगरांग नाला, गोग्रा आणि पँगॉंग टीएसओच्या उत्तरेला १७-१८ मे ला चिनी सैन्याने अतिक्रमण केलेयं असे संरक्षण मंत्रालयाच्या कागदपत्रात म्हटले होते. हा मजकूर वेबसाइटवरील न्यूज सेक्शनमध्ये उपलब्ध होता. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशाच्या सैनिक अधिकार्‍यांमध्ये झालेल्या चर्चेचा उल्लेखही होता. पण आताही माहिती हटवण्यात आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.



हे पण वाचा : ‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा



सहा जूनला दोन्ही देशाच्या वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांमध्ये कॉर्प्स कमांडर्स स्तराची चर्चा झाली. त्यानंतर १५ जूनला गलवान खोर्‍यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. रविवारी भारतीय आणि चिनी सैन्य अधिकार्‍यांमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरची चर्चा झाली. पण अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. चीन पँगॉंग टीएसओमधून मागे हटायला तयार नाहीय. त्यामुळे तणावाची स्थिती कायम आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
भारतात घोटाळे, अफरातफर, करचोरीमधून दोन लाख कोटींचा भ्रष्
सरकारी बँकांमध्ये १९ हजार ९६४ कोटींच्या फसवणुकीची २ हजा
डॉ. कफील खान यांनी योगी सरकारला खेचले संयुक्त राष्ट्र सं
सोलापुरात ‘एक मराठा...लाख मराठा’चा जयघोष
राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणारे आठ खासदार
राज्यात अतिवृष्टीमुळे १ लाख ६२ हजार ४७७ हेक्टर क्षेत्र ब
गेल्या १० वर्षात गटार आणि टाक्यांची सफाई करताना ६३१ लोका
बीएसएनएलने एससी, एसटीची पदोन्नती रोखली
मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करा
सरकार झोपा काढतेय, वादळग्रस्तांना सोडले वार्‍यावर
कामगारांना काढणे आता सोपे, संप करणेही मुश्कील
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प
मुंबईतील १८ ठिकाणी ठिय्या आंदोलन
मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीची तक
केंद्रातील भाजपा सरकारने देशाला नेले दिवाळखोरीकडे
भाजप सत्तेत आल्यापासून सर्वोच्च न्यायालयाचे अध:पतन!
सुविधांच्या नावाखाली रेल्वेने प्रवाशांचा खिसा कापला
युती केली हेच चुकले, नाहीतर १५० जागा जिंकल्या असत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper