×

गडचिंचले हत्याकांड प्रकरणी २८ आरोपींना जामीन, १८ आरोपींच्या पुन्हा अटकेची शक्यता

Published On :    12 Aug 2020
साझा करें:

गडचिंचले येथे भटक्या विमुक्त समाजातील दोन गोसावी व त्यांच्या चालकाच्या हत्याकांड प्रकरणी ९० दिवसांच्या कालावधीत आरोपपत्र दाखल न केल्याने २८ आरोपींना डहाणू न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.



पालघर :  गडचिंचले येथे भटक्या विमुक्त समाजातील दोन गोसावी व त्यांच्या चालकाच्या हत्याकांड प्रकरणी ९० दिवसांच्या कालावधीत आरोपपत्र दाखल न केल्याने २८ आरोपींना डहाणू न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र या प्रकरणात दाखल केलेल्या तिसर्‍या गुन्ह्यामध्ये ४७ आरोपींविरुद्ध नव्याने आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या २८ पैकी १८ जणांचा त्यामध्ये समावेश असल्याने या प्रकरणांमध्ये दहा आरोपी जामिनावर राहणार आहेत.


दोन गोसावी व त्यांच्या वाहन चालकाची हत्या केल्याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या दोन गुन्ह्यात अनुक्रमे १२६ आणि १५४ आरोपींविरोधात चौकशी अधिकार्‍यांनी आरोपपत्र दााखल केले आहेत. तिसर्‍या गुन्ह्यातील आरोपपत्रामध्ये पोलिसांची अडवणूक करणे, दंगल करणे व खुनाचा प्रयत्न करण्याचे आरोप असून त्यामध्ये एकंदर ४७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जामीन मंजूर झालेल्या २८ आरोपींपैकी १८ जणांचा त्यामध्ये समावेश असून उर्वरित दहा लोकांचे जामीन कायम राहण्याची शक्यता आहे. या तीनही प्रकरणात ११ अल्पवयीन आरोपी असून त्यापैकी दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.


गडचिंचले हत्याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यंची नोंद करण्यात आली. सीआयडीने याप्रकरणी आतापर्यंत ८०८ संशयितांची चौकशी केली असून १०८ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. पहिल्या गुन्ह्यात १२६ आरोपींविरोधात चार हजार ९५५ पानांचे आणि दुसर्‍या गुन्ह्यात १२६ आरोपींविरोधात ५ हजार ९२१ पानांचे अशी दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात आली. या हत्या प्रकरणात १६५ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील ११ जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.


याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी व ३ कर्मचार्‍यांचे निलंबन तसेच ३५ कर्मचार्‍यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ७ मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागातमार्फत करण्यात आला.    

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
भारतात घोटाळे, अफरातफर, करचोरीमधून दोन लाख कोटींचा भ्रष्
सरकारी बँकांमध्ये १९ हजार ९६४ कोटींच्या फसवणुकीची २ हजा
डॉ. कफील खान यांनी योगी सरकारला खेचले संयुक्त राष्ट्र सं
सोलापुरात ‘एक मराठा...लाख मराठा’चा जयघोष
राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणारे आठ खासदार
राज्यात अतिवृष्टीमुळे १ लाख ६२ हजार ४७७ हेक्टर क्षेत्र ब
गेल्या १० वर्षात गटार आणि टाक्यांची सफाई करताना ६३१ लोका
बीएसएनएलने एससी, एसटीची पदोन्नती रोखली
मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करा
सरकार झोपा काढतेय, वादळग्रस्तांना सोडले वार्‍यावर
कामगारांना काढणे आता सोपे, संप करणेही मुश्कील
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प
मुंबईतील १८ ठिकाणी ठिय्या आंदोलन
मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीची तक
केंद्रातील भाजपा सरकारने देशाला नेले दिवाळखोरीकडे
भाजप सत्तेत आल्यापासून सर्वोच्च न्यायालयाचे अध:पतन!
सुविधांच्या नावाखाली रेल्वेने प्रवाशांचा खिसा कापला
युती केली हेच चुकले, नाहीतर १५० जागा जिंकल्या असत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper