×

रामदासी बैठकीतील २०० गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

Published On :    12 Aug 2020
साझा करें:

कांदिवली समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट



मुंबई: फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणार्‍या एका सामाजिक कार्यकर्त्यावर रामदासी बैठकीतील सुमारे २०० गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला.  याबाबत कांदिवली समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. हल्ला होऊन १ महिना १७ दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याने पोलीसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.


सचिन गणपत रामाणे (रा.कांदिवली पूर्व) असे हल्ला झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे.  लॉकडाऊन असतानाही २०० जणांचा जमाव रामाणे यांच्या घरावर चाल करून आला होता. रामाणे हे गेली अनेक वर्षे समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून लेखन, व्हिडीओ बनवून ते प्रसारित करतात. गोरगरीबांची होणारी आर्थिक पिळवणूक संविधानिक मार्गाने ते मांडत असतात. याचाच राग येऊन रामदासी बैठकीतील २०० दासांनी २५ जूनला रामाणे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 


माझ्या घराचा पत्ता कुणी दिला अशी विचारणा रामाणे यांनी त्या लोकांना केली, यावर त्यांची बोलती बंद झाली होती. यातील काही लोक आक्रमकपणे रामाणे व त्यांच्या बहिणीच्या अंगावर धावून जात होते. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर याला ठोकून काढा अशा प्रकारे दमदाटीची भाषा ते वापरत होते. तेवढ्यात रामाणे यांच्या पत्नीने त्यांच्या ऑफीसमधून १०० नंबरवर कॉल केला. समतानगर पोलीस ठाण्यात जाऊनही आल्या. परंतु कोविडचे कारण पुढे करत पोलीस उशिराने आले. जवळजवळ दोन तास या लोकांचा धिंगाणा सुरू होता. रामाणे यांच्या लिखाणात कोणतेही आक्षेपार्ह नाही तर त्यांनी जी पोस्ट फॉरवर्ड केली त्याबाबत त्यांचा राग असल्याचे या जमावाने सांगितले.


या हल्ल्याचे खरे सूत्रधार प्रदीप केदारी, सचिन केदारी, विक्की ठसाले, सुशांत बंदरकर, राजू कांबळे असल्याचे रामाणे यांनी २९ जूनला पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्याची पहिली तक्रार रामाणे यांची पत्नी रूपाली यांनी केली आहे. अद्यापही या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. रूपाली यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रदीप केदारी व सचिन केदारी हे दोघे बंधू आम्हांला बैठकीत बसण्यासाठी जोरजबरदस्ती करत होते. परंतु आम्ही त्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर केदारी यांनी २ वर्षापूर्वी त्यांना भररस्त्यात अडवून बैठकीबाबत विचारले होेते. २५ जूनचा हल्ला घडला तेव्हा त्यांच्या घरी दोन नणंदा, सासू, सासरे व पती होते. प्रदीप केदारी व अन्य लोक माझ्या नणंदेच्या अंगावर धावून येत होते. आम्ही कोण आहोत हे तुम्हांला माहित आहे का? असा धमकीवजा इशारा ते लोक देत होते. यांच्यापासून आम्हांला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


दरम्यान या हल्ल्याची दखल बामसेफ पुरस्कृत राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीने घेतली. यासंदर्भात नफने समतानगर पोलीस ठाण्याला पत्रही दिले आहे. रामाणे हे नफचे कार्यकर्ते आहेत. ते फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेचा प्रचार करतात. ते मूळचे कोकणातील असल्याने तेथील धार्मिक कर्मकांड व अंधश्रध्देबाबत त्यांना माहिती आहे. म्हणून ते सातत्याने याविरोधात प्रहार करतात. घडलेला घटनाक्रम पाहता हा पूर्वनियोजित कट होता. जमा झालेले २०० लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत. या जमावावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नफचे मुंबई अध्यक्ष सुधीर बामणे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच कुणबी समाजोन्नती संघ मुंबई पुरस्कृत कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे, सचिव सुनील गावडे व संभाजी ब्रिगेडचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष सागर पगारे, कार्याध्यक्ष सुरज दिघे, ईशान्य मुंबई कार्याध्यक्ष नितीन बारस्कर यांनीही अशा प्रकारे हल्ला करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
भारतात घोटाळे, अफरातफर, करचोरीमधून दोन लाख कोटींचा भ्रष्
सरकारी बँकांमध्ये १९ हजार ९६४ कोटींच्या फसवणुकीची २ हजा
डॉ. कफील खान यांनी योगी सरकारला खेचले संयुक्त राष्ट्र सं
सोलापुरात ‘एक मराठा...लाख मराठा’चा जयघोष
राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणारे आठ खासदार
राज्यात अतिवृष्टीमुळे १ लाख ६२ हजार ४७७ हेक्टर क्षेत्र ब
गेल्या १० वर्षात गटार आणि टाक्यांची सफाई करताना ६३१ लोका
बीएसएनएलने एससी, एसटीची पदोन्नती रोखली
मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करा
सरकार झोपा काढतेय, वादळग्रस्तांना सोडले वार्‍यावर
कामगारांना काढणे आता सोपे, संप करणेही मुश्कील
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प
मुंबईतील १८ ठिकाणी ठिय्या आंदोलन
मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीची तक
केंद्रातील भाजपा सरकारने देशाला नेले दिवाळखोरीकडे
भाजप सत्तेत आल्यापासून सर्वोच्च न्यायालयाचे अध:पतन!
सुविधांच्या नावाखाली रेल्वेने प्रवाशांचा खिसा कापला
युती केली हेच चुकले, नाहीतर १५० जागा जिंकल्या असत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper