×

राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून तीन टप्प्यात देशव्यापी आंदोलनाची घोषणा

Published On :    13 Aug 2020
साझा करें:

१६ ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यात देशभरात आंदोलन-रामसुरेश वर्मा यांचे प्रतिपादन



नवी दिल्ली: शेतकर्‍यांना मजबूत बनवण्याच्या नावाखाली केंद्रातील भाजपा सरकारने ५ जून २०२० रोजी तीन अध्यादेश पारित केले.  परंतु हे तीन कृषी अध्यादेश शेतकर्‍यांच्या हिताचे नसून पुंजीपतींच्या हिताचे आहेत. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून १६ ऑगस्ट २०२० पासून तीन टप्प्यात देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष रामसुरेश वर्मा यांनी केली.


राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसुरेश वर्मा म्हणाले, ‘यह आझादी झुठी है, देश की जनता भुखी है’ असा नारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी दिला होता. आजही देशात हीच स्थिती आहे. देशातील शेतकरी अन्न निर्माण करूनही तो भुखी आहे. त्याला भुखेवाचून मरावे लागत आहे. शेतकरी करोडो लोकांचे पोट भरत आहे. परंतु शेतकरी दाणा-दाणा करत आहे. आज शेतकर्‍याची अशी परिस्थिती आहे की, तो त्याच्या कुटुंबासह आत्महत्या करत आहे. असे असूनही सरकार त्याच्या मालाला हमीभाव देत नाही. त्यातच त्याच्यावर कर्जाचा बोजा आहे. कर्जाच्या भरपाईसाठी सरकार आणि बँकांकडून तगादा लावला जात आहे. त्यामुळे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. अशाप्रकारे शेतकर्‍यांचे सामुहिक नरसंहार सुरू आहे.


वर्मा म्हणाले, सरकारने शेतकर्‍यांच्याविरोधात तीन अध्यादेश पारित केले. त्यामध्ये ‘फार्मर्स एम्पावरमेंट ऍन्ड प्रोटेक्शन ऍग्रीमेंट इन्शुरन्स ऍन्ड फार्म सर्व्हीसेस आर र्डिनेश (एफएपीएफएस २०२०), दुसरे ‘द फार्मर्स प्रोड्युस ट्रेड ऍन्ड कॉमर्स प्रमोशन ऍन्ड फेशिलिएशन (एफपीटीसी २०२०), तिसरा १९५५ मध्ये अधिनियम संशोधन करण्यात आले आहे. परंतु हे अध्यादेश शेतकर्‍यांच्याविरोधात आहेत. त्यामुळे याविरोधात राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून तीन टप्प्यात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा १६ ऑगस्ट २०२० पासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात ५५० जिल्ह्यात राष्ट्रपतींना अध्यादेश परत घेण्यासाठी निवेदन दिले जाणार आहे.


दुसर्‍या टप्प्यात ३१ ऑगस्टला जिल्हा मुख्यालय व तहसील कार्यालय आवारात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ५४३ खासदारांच्या प्रतिमेचे दहन केले जाणार आहे. कारण शेतकर्‍यांची मते घेऊन खासदार बनतात परंतु पुंजीपतींच्या हितासाठी निर्णय घेतले जात आहेत. शेतकर्‍यांच्याविरोधात कायदे पारित केले जात आहेत.तिसर्‍या टप्प्यात १४ सप्टेंबर जिल्हा व तहसील मुख्यालयात रॅली प्रदर्शन व त्या क्षेत्रातील आमदारांच्या प्रतिमेचे दहन केले जाणार आहे. तेदेखील शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेत नाहीत असे वर्मा म्हणाले.


वर्मा म्हणाले, देशातील साखर कारखानदारांनी शेतकर्‍यांच्या ऊसाचे पैसे दिले नाहीत, त्याला चार वर्षे लोटली आहेत. उत्तर प्रदेशातील सहकारी संस्थांमधील २००९-२०१० या वर्षात आंबेडकरनगरमधील अनेक शेतकर्‍यांच्या धान्य खरेदीचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. याचा अर्थ सर्व खासदार, आमदार, राजकीय पक्ष पुंजीपतींचे गुलाम आहेत. त्यामुळे अशावेळी शेतकर्‍यांच्या हक्क व अधिकारासाठी देशव्यापी आंदोलन करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे वर्मा यांनी सांगितले.


शेतकरी आंदोलनाला बहुजन क्रांती मोर्चाचे जाहीर समर्थन

राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या देशव्यापी आंदोलनाला संघटन शक्तीसह समर्थन करत आहोत.  सार्‍या देशभरात भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चासहित सर्व ऑफशुट विंगच्या कार्यकर्त्यांना आवाहन करत आहोत की, शेतकर्‍यांच्या या आंदोलनात सर्व शक्ती पणाला लावून शेतकर्‍यांना सहकार्य करा.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
भारतात घोटाळे, अफरातफर, करचोरीमधून दोन लाख कोटींचा भ्रष्
सरकारी बँकांमध्ये १९ हजार ९६४ कोटींच्या फसवणुकीची २ हजा
डॉ. कफील खान यांनी योगी सरकारला खेचले संयुक्त राष्ट्र सं
सोलापुरात ‘एक मराठा...लाख मराठा’चा जयघोष
राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणारे आठ खासदार
राज्यात अतिवृष्टीमुळे १ लाख ६२ हजार ४७७ हेक्टर क्षेत्र ब
गेल्या १० वर्षात गटार आणि टाक्यांची सफाई करताना ६३१ लोका
बीएसएनएलने एससी, एसटीची पदोन्नती रोखली
मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करा
सरकार झोपा काढतेय, वादळग्रस्तांना सोडले वार्‍यावर
कामगारांना काढणे आता सोपे, संप करणेही मुश्कील
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प
मुंबईतील १८ ठिकाणी ठिय्या आंदोलन
मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीची तक
केंद्रातील भाजपा सरकारने देशाला नेले दिवाळखोरीकडे
भाजप सत्तेत आल्यापासून सर्वोच्च न्यायालयाचे अध:पतन!
सुविधांच्या नावाखाली रेल्वेने प्रवाशांचा खिसा कापला
युती केली हेच चुकले, नाहीतर १५० जागा जिंकल्या असत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper