×

नागरिकत्व सिध्द करण्यासाठी आसाममध्ये आता लागणार १९५१ पूर्वीची कागदपत्रे

Published On :    13 Aug 2020
साझा करें:

१९७१ पूर्वीच्या कागदपत्रांनी १९ लाख ४८ हजार तर आता किती लोकांचे नागरिकत्व हिरावून घेणार?



आसाम: प्रतिक हजेला यांनी आसाममधील एनआरसीचा रिपोर्ट ३१ ऑगस्ट २०१९ रोजी जाहीर केला. या एनआरसीमधून १९ लाख ४८ हजार लोकांचे नागरिकत्व काढून घेण्यात आले. म्हणजे एवढ्या लोकांची नावे एनआरसीच्या यादीतून वगळण्यात आली. ही यादी १९७१ पूर्वीच्या कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आली होती. परंतु आता नागरिकत्व सिध्द करण्यासाठी आसाममध्ये आता १९५१ पूर्वीची कागदपत्रे लागणार आहेत. याबाबतचा १४ सदस्यीय समितीचा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला आहे. तर मग आता किती लोकांना बाहेर काढून त्यांचे नागरिकत्व हिरावून घेणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


दरम्यान हा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आल्याने आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ही घटना दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. आसाम अकॉर्ड क्लॉज -६ लागू करण्यासाठी संबंधित रिपोर्ट गृह मंत्रालय समितीने फेब्रुवारी महिन्यात सरकारकडे सोपवले होते. या १४ लोकांच्या उच्चस्तरीय समितीने आसामी लोकांची ओळख आता १९५१ च्या पूर्वीच्या कागदपत्रांद्वारे करायला हवी असे सूचवले आहे. समितीतील चार सदस्यांनी या समितीचा रिपोर्ट प्रकाशित केला. ज्या सदस्यांनी हा रिपोर्ट प्रकाशित केला त्या चारजणांमधील तीनजण ऑल आसाम स्टुंडस युनियनचे कार्यकर्ता आहेत. चौथे सदस्य निलय दत्ता आहेत. ते अरूणाचल प्रदेशाचे ऍडव्होकेट जनरल आहेत. या रिपोर्टमध्ये आता आसाममधील नागरिकांना नागरिकत्व सिध्द करण्यासाठी १९५१ पूर्वीची कायगदपत्रे लागतील असे म्हटले आहे.


आसाम अकॉर्ड क्लॉज ६ काय आहे?

१९८५ च्या आसाम अकॉर्डच्या माध्यमातून २४ मार्च १९७१ ला नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप (एनआरसी)ची कटऑफ तारीख ठेवण्यात आली होती. म्हणजे या तारखेपूर्वी राहणारे लोक आसामधील नागरिक असल्याचे मानले गेले आहे. परंतु अकॉर्डमध्ये हे सांगण्यात आलेले नाही की कोण लोक एनआरसीमध्ये सुरक्षित आहेत. आसाम अकॉर्ड ६ च्या माध्यमातून आसामी लोकांची सांस्कृतिक, सामाजिक, भाषेची ओळख सुरक्षित व संरक्षित केली जाईल. संविधानिक प्रशासकीय सुरक्षादेखील दिली जाईल असे म्हटले आहे.


सीएए राज्यव्यापी विरोधानंतर सरकारकडून समिती गठीत

नागरिकता संशोेधन कायदा (सीएए) लागू करण्यासंदर्भात घोषणा झाल्यानंतर गेल्या वर्षी आसाममध्ये विरोध प्रदर्शन सुरू झाले होते. दुसर्‍या देशातील अन्यायग्रस्त हिंदू, इसाई, शिख, बौध्द, जैन यांना भारताचा नागरिकत्व देण्याचे कायद्यात तरतूद करण्यात आले. त्यामुळे आसाममधील नागरिकांना धोका वाढला व त्यांनी विरोध प्रदर्शनाला सुरूवात केली. त्याचवेळी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसामची स्थानिक संस्कृती सुरक्षित करणारा क्लॉज-६ लवकरात लवकर लागू करण्याचे संकेत दिले होते. दरम्यान या रिपोर्टमध्ये आसामी लोकांना अनेक प्रकारच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. खासकरून आसामी नागरिकांना लोकसभेत ८०-१०० टक्के भागिदारी मिळणार आहे.  विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण लागू करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्याचबरोबर सरकारी आणि खासगी क्षेत्रातील भरतीत ७०-१०० टक्के आरक्षण लागू करण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे.



१९५१ पूर्वीची कागदपत्रे कुठून देणार?

केंद्र सरकारने जन्म-मृत्यू नोंद कायदा १९६९ मध्ये केला. परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली १९७२-७३ च्या दरम्यान. त्यामुळे सरकारकडे कागदपत्रे आहेत १९७३ च्या पुढे. मग लोकांची जन्म-मृत्यूची नोंदच १९७३ च्या पुढे झाल्याने ते १९५१ पूर्वीचा जन्माचा दाखला अथवा कागदपत्रे कसे काय देणार? त्यातच सरकारी कागदपत्रांची काय अवस्था असते हे सांगण्याची गरज नाही. कारण मतदार ओळखपत्रावर बापाचं नाव आईचा फोटो आणि आईचे नाव असले तर बापाचं फोटो अशी परिस्थिती असते. तेच ओळखपत्र बदलण्यासाठी अनेक वर्षे लोटली जातात. लोकांकडून आधीच कागदपत्रे मागून त्यांना नागरिकत्वापासून वंचित ठेवण्याचा डाव तर आखला गेला नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
भारतात घोटाळे, अफरातफर, करचोरीमधून दोन लाख कोटींचा भ्रष्
सरकारी बँकांमध्ये १९ हजार ९६४ कोटींच्या फसवणुकीची २ हजा
डॉ. कफील खान यांनी योगी सरकारला खेचले संयुक्त राष्ट्र सं
सोलापुरात ‘एक मराठा...लाख मराठा’चा जयघोष
राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणारे आठ खासदार
राज्यात अतिवृष्टीमुळे १ लाख ६२ हजार ४७७ हेक्टर क्षेत्र ब
गेल्या १० वर्षात गटार आणि टाक्यांची सफाई करताना ६३१ लोका
बीएसएनएलने एससी, एसटीची पदोन्नती रोखली
मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करा
सरकार झोपा काढतेय, वादळग्रस्तांना सोडले वार्‍यावर
कामगारांना काढणे आता सोपे, संप करणेही मुश्कील
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प
मुंबईतील १८ ठिकाणी ठिय्या आंदोलन
मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीची तक
केंद्रातील भाजपा सरकारने देशाला नेले दिवाळखोरीकडे
भाजप सत्तेत आल्यापासून सर्वोच्च न्यायालयाचे अध:पतन!
सुविधांच्या नावाखाली रेल्वेने प्रवाशांचा खिसा कापला
युती केली हेच चुकले, नाहीतर १५० जागा जिंकल्या असत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper