×

युती केली हेच चुकले, नाहीतर १५० जागा जिंकल्या असत्या

Published On :    19 Sep 2020
साझा करें:

देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा बकबक



मुंबई:  गतवर्षी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करायला नको होती. परंतु युती केली हेच चुकले आहे. नाहीतर भारतीय जनता पक्षाने १५० पेक्षाही जास्त जागा जिंकल्या असत्या अशी बकबक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.


 नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्चुअल रॅलीत ते बोलत होते. भाजपने नरेंद्र मोदींना प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना २७२ जागा मिळतील, २०१९ मध्ये ३०० पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील असे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांनी सांगितले होते. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढल्यास १५० पेक्षा जास्त किंवा युती करून लढल्यास २०० पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील, असा अंदाज भाऊ तोरसेकर यांनी वर्तवला होता. परंतु आपण युतीला पसंती दिली. युती केली नसती तर आपण राज्यात १५० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या. युती केली हीच चूक झाली अशी फडणवीस यांनी बकबक करत स्वत:चे हसे करून घेतले.


आता आपण २०१९ च्या राज्य विधानसभेचे पक्षीय बलाबल पाहू

भाजपा-१०५, शिवसेना-५६, राष्ट्रवादी कॉंग्रेस-५४, राष्ट्रीय कॉंग्रेस-४४ या अशा प्रमुख राजकीय पक्षांना अशा प्रकारे जागा मिळाल्या आहेत. काय खरंच भाजपा-१०५ जागांवर पोहचली असती याचे उत्तर नाही. कारण राज्यात भाजपा विरोधी वातावण होते, तरीही त्यांना एवढ्या जागा कशा मिळाल्या याचेही कोडे आहे. ते कोडे म्हणजे ईव्हीएम घोटाळा.


राज्य विधानसभा निवडणूकपूर्व कालखंडात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम घोटाळ्याविरोधात वक्तव्य केले होेते. गुजरातमध्ये घड्याळाचे बटण दाबल्यानंतर कमळाला जात होते अशी त्यांनी टीप्पणी केली. त्यातच राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीन मध्ये घोळ होतो हे सांगायला सुरवात केली. दिल्लीला जावून राज ठाकरे निवडणूक आयोगाला भेटले. परंतु निवडणूक आयोग प्रतिसाद देत नसल्याचे सांगत जर मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिस कशाला करायची असा सवाल त्यांनी केला होता. याच काळात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सभागृहात ईव्हीएम मशीनवर प्रश्‍नचिन्ह उभा केला होता. तर शिवसेना- भाजपा युती २२० जागा जिंकणार असा दावा फडणवीस करत होते.‘मी पुन्हा येईन’ असा धोशा त्यांनी लावला होता.


दरम्यान महाराष्ट्रात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने पुण्यामध्ये २७ जुलैला राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य विषय ईव्हीएम मशीन होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते. एकदंरीतच हा कार्यक्रम केवळ कार्यक्रम नव्हता तर महाआघाडी उभा करण्याचा पहिला प्रयत्न होता. या कार्यक्रमाला शरद पवार येणार होते याचा मोठा संदेश महाराष्ट्रात गेला होता. भाजपा ईव्हीएम मशीन मध्ये घोळ घालणार याचा पर्दाफाश होणार होता. परंतु पवार आले नाहीत. यातच आणखी एक ट्वीस्ट पुढे आला. अवघ्या चार पाच दिवसात राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना सोडून सर्व पक्षांनी मुंबई पक्षविरहीत  ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव या बॅनरखाली पत्रकार परिषद घेतली. सर्वांनी ईव्हीएम मशीन विरोधात सूर आळवला. आंदोलनाची घोषणाही करण्यात आली होती.


दरम्यान,कॉंग्रेस पक्षाने २००४ व २००९ ला गडबड केल्याचे पुरावे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी वेळोवेळी सार्वजनिक केले होते. त्याच काळात ईडीच्या माध्यमातून राज ठाकरेची चौकशीचा फार्स झाला. आक्रमक असणारे राज ठाकरे ईडी प्रकरणानंतर कोमात गेले ते कायमचे.  निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीनवर बोलणारी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉंग्रेस निवडणुकीत ईव्हीएम मशीनवर एक शब्दही काढत नव्हती. तर जनतेने भाजपाला हरविण्यासाठी निवडणूक हातात घेतली. याच काळात महाराष्ट्रातून बहुजन क्रांती मोर्चाची परीवर्तन यात्रा वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. ईव्हीएम मशीनच्या धोकाबाजीचा मोठ्या प्रमाणात भंडाफोड या परिवर्तन यात्रेने केला. बहुजन मुक्ती पार्टीने आपल्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा ईव्हीएम मशीन बनवला आणि महाराष्ट्राचे जनमानस ईव्हीएम मशीन विरोधी बनविले.


 वारंवार २२० ते २४० जागा जिंकण्याचा प्रपोगंडा करुन महाराष्ट्राचे जनमानस (माइंंड सेट) तयार करण्याचे काम मिडीयातून चालले होते. महाराष्ट्रचे जनमानस, भाजपा सेनेविरोधात असताना एवढे एक्झीट पोल आलेले पाहाताच जनतेने समाजमाध्यमावर या एक्झीट पोलचा कडाडून विरोध केला. जनतेने हा निकाल ईव्हीएम मशीनने फिक्स केल्याचा पवित्रा घेतला. लोकांनी भाजपा तसेच ब्राम्हण, ईव्हीएम मशीनला समाजमाध्यमांवर झोडपून काढायला सुरुवात केली. या सगळ्या प्रक्रीयेत कॉंग्रेस काही बोलत नव्हती. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत ते सारे खोटे आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस यांना बॅलसिंग जागा वाटून ईव्हीएम घोटाळ्याची चर्चा थांबवण्यात आली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
मराठा आरक्षण; तातडीने घटनापीठ स्थापन करा
कल्याणमध्ये १ नोव्हेंबरला यु.टी.डोंगरे यांच्या आदरांजल
मोदींच्या कार्यकाळात विद्यापीठांच्या ११ कुलगुरूंना दा
जगभरात कोविडमधील १५ टक्के मृत्यू वायू प्रदूषणासंबंधित
बिहार निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी मु
निलंबन कारवाई मागे घेण्याच्या प्रयत्नांना योगी सरकारकड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालनियुक्त १२ जागां
आरोग्य सेतूच्या निर्मितीबाबत केंद्र सरकारच अंधारात
...तर मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देई
फेसबुकच्या भारतातील वादग्रस्त पब्लिक पॉलिसी प्रमुख अंख
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper