×

सरकारी बँकांमध्ये १९ हजार ९६४ कोटींच्या फसवणुकीची २ हजार ८६७ प्रकरणे

Published On :    21 Sep 2020
साझा करें:

माहिती अधिकारांतर्गत आरबीआयकडून खुलासा



नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये १९ हजार ९६४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची २ हजार ८६७ प्रकरणे नोंदली गेली आहेत. माहितीच्या अधिकारांतर्गत आरबीआयकडून हा खुलासा झाला आहे. आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी आरटीआय अंतर्गत आरबीआयकडे याबाबत माहिती मागवली होती.


देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वाधिक संख्येने घोटाळे झाले आहेत. त्याच वेळी मूल्यांच्या बाबतीत घोटाळ्याचा सर्वाधिक फटका बँक ऑफ इंडियाला बसला. आकडेवारीनुसार एप्रिल ते जून २०२० मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांपैकी एसबीआयमध्ये सर्वाधिक २ हजार ५० प्रकरणांच्या फसवणुकीची नोंद झाली. या प्रकरणांशी संबंधित रक्कम २ हजार ३२५.८८ कोटी रुपये आहे. मूल्यांच्या बाबतीत घोटाळ्याचा सर्वाधिक फटका बँक ऑफ इंडियाला बसला. या कालावधीत बँक ऑफ इंडियामध्ये ५ हजार १२४.८७ कोटी रुपयांच्या फसवणुकीची ४७ प्रकरणे आढळली.


हे पण वाचा: भारतात घोटाळे, अफरातफर, करचोरीमधून दोन लाख कोटींचा भ्रष्टाचार


याशिवाय कॅनरा बँकेत ३ हजार ८८५.२६ कोटी रुपयांच्या फसवणुकीची ३३ प्रकरणे, बँक ऑफ बडोदामध्ये २ हजार ८४२.९४ कोटी रुपयांच्या फसवणुकीची ६०, इंडियन ओव्हरसीज बँकेत १ हजार २०७..६५ कोटी रुपयांच्या फसवणुकीची ३७ प्रकरणे, इंडियन बँकेत १ हजार ४६९. ७९ कोटींची ४५ प्रकरणे, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १ हजार १४०.३७ कोटी रुपयांची ९ प्रकरणे समोर आली आहेत.


या कालावधीत दुसर्‍या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकमध्ये २७०. ६५ कोटी रुपयांच्या फसवणुकीची नोंद झाली. तथापि, बँकेकडे फसवणुकीच्या प्रकरणशंची संख्या २४० आहे. यूको बँकेत ८३१.३५ कोटींच्या फसवणुकीची १३० प्रकरणे, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ६५५.८४ कोटींची १४९ प्रकरणे, पंजाब अँड सिंध बँकेत १६३.३ कोटींची १८ प्रकरणे, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ४६.५२ कोटी रुपयांच्या फसवणुकीची ४९ प्रकरणे आढळली. आरबीआयने आपल्या उत्तरात म्हटले आहे की ही बँकांनी दिलेली प्राथमिक आकडेवारी आहे. यामध्ये बदल किंवा सुधारणा होेऊ शकते. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
मराठा आरक्षण; तातडीने घटनापीठ स्थापन करा
कल्याणमध्ये १ नोव्हेंबरला यु.टी.डोंगरे यांच्या आदरांजल
मोदींच्या कार्यकाळात विद्यापीठांच्या ११ कुलगुरूंना दा
जगभरात कोविडमधील १५ टक्के मृत्यू वायू प्रदूषणासंबंधित
बिहार निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी मु
निलंबन कारवाई मागे घेण्याच्या प्रयत्नांना योगी सरकारकड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालनियुक्त १२ जागां
आरोग्य सेतूच्या निर्मितीबाबत केंद्र सरकारच अंधारात
...तर मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देई
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper