×

शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस

Published On :    22 Sep 2020
साझा करें:

निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्‍नचिन्ह



मुंबई: संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जबरदस्त खडाजंगी सुरू असतानाच, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. ही नोटीस, गेल्या निवडणुकांत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांसंदर्भात आहे.


याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एनसीपी नेत्या सुप्रिया सुळे यांनाही आयकर विभाग नोटीस धाडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंगळवारी शरद पवार यांना विचारले असता, ‘आपल्यावर प्रेम असल्याने आनंद आहे. पहिल्यांदाच मला नोटीस आली, सुप्रिया यांना येणार असल्याचे समजते. चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा आनंद आहे’, असे पवार म्हणाले.


मला सोमवारी नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून ही नोटीस आली आहे. त्याचे उत्तर आपण लवकरच देऊ. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांसंदर्भात ही नोटीस आहे,’ असेही शरद पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या भाजपा आणि राज्य सरकार यांच्यात तणावाचे वातावरण आहे. अशातच आयकर विभागाचे नोटीस प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाकडून या नोटिशीत निवडणूक काळात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची माहिती मागवली आहे.



गोपीनाथ मुंडे, न्या. लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची राळ उडवताच आयकर विभागाला धरले हाताशी?

गोपीनाथ मुंडे, न्या. लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची महाविकास आघाडी सरकारने राळ उडवून दिली होती. या प्रकरणांची चौकशी झाली तर सार्‍याच कुलंगड्या बाहेर येतील याची भीती असल्याने केंद्र सरकारने आयकर विभागाला हाताशी धरून पवार, ठाकरे व सुळे यांना नोटीस पाठवली नाही ना अशी शंका घेतली जात आहे. जेणेकरून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
मराठा आरक्षण; तातडीने घटनापीठ स्थापन करा
कल्याणमध्ये १ नोव्हेंबरला यु.टी.डोंगरे यांच्या आदरांजल
मोदींच्या कार्यकाळात विद्यापीठांच्या ११ कुलगुरूंना दा
जगभरात कोविडमधील १५ टक्के मृत्यू वायू प्रदूषणासंबंधित
बिहार निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी मु
निलंबन कारवाई मागे घेण्याच्या प्रयत्नांना योगी सरकारकड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालनियुक्त १२ जागां
आरोग्य सेतूच्या निर्मितीबाबत केंद्र सरकारच अंधारात
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper