×

आइस्क्रीम बनवणार्‍या कंपनीने ९ बँकांना घातला १ हजार ४०० कोटींचा गंडा

Published On :    22 Sep 2020
साझा करें:

आणखी एक बँक घोटाळा उघडकीस



नवी दिल्ली: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सोमवारी दिल्लीतील क्वालिटी लिमिडेट या दुग्धव्यवसायाशी संबंधित कंपनीच्या आठ ठिकाण्यांवर छापे मारले. क्वालिटी वॉल्स आईस्क्रीम्ससाठी ओळखल्या जाणार्‍या या कंपनीतील दिल्लीच्या मुख्य कार्यालयाबरोबरच एकूण आठ ठिकाणी छापे मारण्यात आले. या कंपनीने नऊ बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. या बँकांची कंपनीने १ हजार ४०० कोटींची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याच्या संक्षयावरुन हे छापे टाकण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. या प्रकरणामध्ये सीबीआयने क्वालिटी लिमिटेड कंपनी आणि कंपनीचे संचालक संजय डिंग्रा, सिद्धार्थ गुप्ता, अरुण श्रीवास्तव यांच्याबरोबर अन्य काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


आमच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये बँक ऑफ इंडियाबरोबरच या कंपनीने कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्षमी बँक आणि सिंडिकेट बँकेला एकत्रितपणे १ हजार ४०० कोटी ६२ लाखांचा (अंदाजे) गंडा घातला आहे, असं सीबीआयचे प्रवक्ते आर. के. गौर यांनी सांगितलं.


बँक फंडांसंदर्भातील व्यवहार, संबंधित पक्षांशी निगडीत फसवणुकीचे व्यवहार, बनावट कागदपत्रे-पावत्या, खात्यांची खोटी माहिती, कंपनीच्या नावाने संपत्ती दाखवणे अशा वेगवेगळ्या मार्गाने कंपनीने ही फसवणूक केल्याचे गौर यांनी म्हटले आहे. 


सोमवारी आठ ठिकाणी छापे टाकून सीबीआयने कागदपत्रं जप्त केली आहेत. छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये दिल्ली, सहारणपूर, बुंदेशहर (उत्तर प्रदेश), अजमेर (राजस्थान,) पवाल (हरयाणा) या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी असणारी कंपनीची कार्यालये आणि इतर ठिकाणांवर सीबीआयच्या अधिकार्‍यांनी छापे टाकले. यावेळी महत्वाची कागदपत्रे आणि इतर दस्तावेज अधिकार्‍यांनी ताब्यात घेतला असून संचालकांबरोबरच कंपनीशी संबंधित इतर अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
मराठा आरक्षण; तातडीने घटनापीठ स्थापन करा
कल्याणमध्ये १ नोव्हेंबरला यु.टी.डोंगरे यांच्या आदरांजल
मोदींच्या कार्यकाळात विद्यापीठांच्या ११ कुलगुरूंना दा
जगभरात कोविडमधील १५ टक्के मृत्यू वायू प्रदूषणासंबंधित
बिहार निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी मु
निलंबन कारवाई मागे घेण्याच्या प्रयत्नांना योगी सरकारकड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालनियुक्त १२ जागां
आरोग्य सेतूच्या निर्मितीबाबत केंद्र सरकारच अंधारात
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper