×

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रक्रियेतून स्त्री सशक्तीकरण

Published On :    22 Sep 2020
साझा करें:

पिता रक्षति कौमार्य,पति रक्षति योवने, पुत्र रक्षति वार्धक्य, न स्त्री स्वातंत्र्यम अहरती. या मनू वचनाला स्त्रीने कधीच मागे टाकले आहे. स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा कोणीच विचार करत नव्हते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार केला. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवण्यास हातभार लावला.पिता रक्षति कौमार्य,पति रक्षति योवने, पुत्र रक्षति वार्धक्य, न स्त्री स्वातंत्र्यम अहरती.    
  या मनू वचनाला स्त्रीने कधीच मागे टाकले आहे. स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा कोणीच विचार करत नव्हते. सर्वप्रथम  राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार केला. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवण्यास हातभार लावला. विश्‍वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा पुढे नेला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांच्या संघटनेवर खूप विश्‍वास होता. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्‍वास ठेवणारा मी माणूस आहे. त्यांना जर विश्‍वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय काय करू शकतात हे मी जाणतो. सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सिद्ध करून देईन. एवढा प्रचंड विश्‍वास स्त्रियांच्या कर्तृत्वावर  त्यांना  होता. म्हणूनच त्यांनी संविधान आणि हिंदू कोड बिल याद्वारे स्त्रियांचे सशक्तीकरण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांबद्दल किती आदर होता त्यांच्याप्रती सन्मान होता. त्यांनी संविधान सभेच्या अखेरच्या भाषणात पुढील वाक्य म्हटले होते.  No man can be greatful at the cost of his honour, no woman can be greatful at the cost of her chastity and no nation can be greatful at the cost of Its liberty. यावरून आपल्या लक्षात येईल की, राष्ट्राची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून असते.


 स्त्रियांबद्दल आत्यंतिक आदर त्यांच्या मनात होता. एवढेच नाही तर आपल्या पत्नी रमाबाई बद्दल त्यांना अत्यंत प्रेम व आदर होता.त्यांनी आपला ग्रंथ, पाकिस्तान आर द पार्टिशन ऑफ इंडिया हा ग्रंथ १९४० साली  प्रकाशित झाला होता. आपला हा ग्रंथ त्यांनी रमाबाईंना समर्पित केला. Inscribed to memroy of Ramu. आपल्या पत्नी बद्दल एवढी कृतज्ञता कोणी दाखवत असेल का? जेवढी बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवली. आपल्या अनुयायांना त्यांनी ताकीद केली होती की, कोणत्याही सभेला येताना, प्रत्येकाने आपल्या पत्नीला सोबत घेऊन यावे. म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांचे अनुयायी आपल्या पत्नीला सोबत घेऊन सभेला जात असत. एकदा त्यांच्या सभेला पन्नास हजार पुरुष होते.तर स्त्रियांची संख्या २५ हजार होती. स्त्रिया पुरुषांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतात असा विश्‍वास बाबासाहेबांनी स्त्रियांवर दाखवला.


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी काम करण्याअगोदर स्त्रियांची स्थिती धर्मशास्त्र आणि मनुस्मृतीने कमी दर्जाची लेखली होती.  ब्राम्हणी धर्माने तर स्त्रियांना दुय्यम नाहीतर अगदी खालचा दर्जा दिला आहे. शूद्र व स्त्रिया एकसारख्याच आहेत. स्त्रियांना अवर्ण ठरवण्यात आले आहे. ब्राम्हणी धर्मातील वेदाने खरा भेद केला आहे. अथर्ववेद,ऋग्वेद या वेदात पुत्रप्राप्तीसाठी वेगवेगळे विधी सांगितले आहेत. सर्व विधी पुत्रप्राप्तीसाठी आहेत. ‘अष्टपुत्र सौभाग्यवती भव’  हा आशीर्वाद म्हणजे तुला दहा दहा पुत्र व्हावेत. पण एकही मुलगी व्हावी असा आशीर्वाद दिलेला नाही, यज्ञवाल्यकल्य स्मृतिमध्ये म्हटले आहे. स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी उपभोग्य आहे. कन्येला पुत्र झाला नाही तर तिच्या घरी भोजन करू नये, असे निर्णयसिंधु सांगते. मुलगी ही कष्टकारक असते तर मुलगा हा सर्वोच्च स्वर्गातील प्रकाश होय. (ऐतरेयब्राम्हण) वरील उदाहरण यासाठी दिले आहे. ब्राम्हणी धर्मामध्ये स्त्रियांचा दर्जा दुय्यम स्वरूपाचा आहे. स्त्रिया गुलामीत जीवन जगत आहेत. स्त्रियांनी गुलामगिरी झुगारून द्यावी, यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना पुढील उपदेश केला होता. नागपूर येथील २० जुलै १९४२ च्या सभेत बाबासाहेब स्त्रियांना सांगतात की, स्त्रियांनी जबाबदारीने वागावे. आपल्या मुलींना सर्व सुविधा द्याव्यात. मुलामुलींना खूप शिकवा त्यांना महत्वाकांक्षी बनवा, योग्य वयात त्यांची लग्न करा. लग्नाची घाई करू नका. लग्न एक जोखीम आहे. लग्नानंतर मुलींचे आपल्या पतीबरोबर मैत्रिणी प्रमाणे वागावे. लग्न करणार्‍यांनी जास्त मुलं जन्माला घालू नये. कुटुंब नियोजनाविषयी बाबासाहेब विचार मांडतात. त्यांच्या विचाराचे तंतोतंत पालन झाले असते तर लोकसंख्येचा विस्फोट झाला नसता. लग्न झालेल्या स्त्रियांनी आपल्या पतीच्या कार्यात मदत करावी. सहकार्य करावे. परंतु पती जर गुलामासारखी वागणूक देत असेल तर, पतीची गुलामगिरी झुगारून द्यावी, सन्मानाने जीवन जगावे. आपल्याला कमीपणा येईल असा पोशाख करू नका वेळा,तोडे,फुल्या,मासोळ्या,जोडवी हे चांदीचे अवजड व बोजड दागिने घालू नका. नाकाला भोक पाडून नाकात भली मोठी नथ अडकविणे हे बरे दिसत नाही. एवढ्या छान व सौम्य शब्दात डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांशी संवाद साधतात.


वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रियांना बाबासाहेब उपदेश करतात. हा मानवजातीला बट्टा लावणारा व्यवसाय करू नये. समाजाला बट्टा लावणार्‍या धंद्यापासून मुक्त व्हा त्यांना नाईलाजाने करावा लागणार्‍या या व्यवसायाचा धिक्कार करून बाबासाहेब त्यांना स्वाभिमानाने जगण्याचे आवाहन करतात.  बाबासाहेबांचा हा उद्देश सर्व स्त्रिया ऐकत. त्यादृष्टीने स्वतःमध्ये बदल करून घेतात. त्या काळामध्ये मनुस्मृतीने स्त्रियांना पशु पेक्षा हिन दर्जाची वागणूक दिली.
महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात,
मांग महार निंदा ठावी नाही व्यथा!!                          
जाळा मनू ग्रंथा अग्नीमध्ये!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु मानत. २५ डिसेंबर १९२७ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. १९२७ साल महात्मा फुले यांचे जन्मशताब्दी वर्ष होय. मनुस्मृतीचे दहन ही एक क्रांतिकारक घटना आहे. मनुस्मृतीच्या दहना बरोबर स्त्रियांचे दुय्यमत्व जळाले. मनुस्मृती जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केले. संविधानात वेगवेगळे कायदे करून खर्‍या अर्थाने बाबासाहेबांनी स्त्रियांना सशक्त केले. स्त्री कोणत्याही धर्माची असो बाबासाहेब आंबेडकर तिच्याकडे मानवी दृष्टिकोनातून पाहतात. ज्या ठिकाणी स्त्रियांना कमी लेखले गेले. त्या त्या ठिकाणी त्यांनी स्त्रियांना  कायदे करून प्रतिष्ठा मिळवून दिली. आपल्या भाषणातून स्त्रियांना संघर्ष करण्यास प्रेरित करतात.


 संविधानाद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कलम-१२ पासून कलम-१९ पर्यंत स्त्रियांना पुरुषाबरोबर सर्व अधिकार बहाल केले. कलम-१३ मनुस्मृतीला अवैध ठरविले. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली होती. त्या चालीरीती परंपरा अवैध ठरविण्यात आल्या. कलम-१३ नुसार आज जर स्त्रियांना एखाद्या मंदिरात प्रवेश नाकारला जात असेल तर स्त्रियांनी त्याविरुद्ध बंड केला पाहिजे. विषमता नाकारणारे हे कलम आहे. ज्या ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश आहे. त्या सर्व ठिकाणी स्त्रियांनाही प्रवेश असलाच पाहिजे. हा समानतेचा लढा आहे. याची स्त्रियांना जाणीव करून दिली. कलम-१४ सर्व स्त्री-पुरुष समान आहेत. लिंगभेद नाकारण्यात आला. खूप पूर्वीपासून जे अधिकार पुरुषांनाच होते, स्त्रियांना नव्हते हे सर्व अधिकार देण्यात आले. कलम-१४ अन्वये स्त्री-पुरुष समान आहेत. एक प्रकारे पुरुषाच्या पुरुषसत्ताकतेला लगाम बसवण्याचे कार्य त्यांनी केले. कलम-१५ भेदभाव नष्ट करण्यात आला. जात,वंश, धर्म, स्त्री-पुरुष विषमता निर्माण करणारे सर्व भेदभाव नष्ट करण्यात आले. कायद्यासमोर सर्व समान आहेत. कलम-१६ नोकरीत आरक्षण देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना सक्षम बनवले. आज वेगवेगळ्या खात्यात खाजगीकरण सुरू आहे. खाजगीकरण झाल्यावर स्त्रियांची काय परिस्थिती होईल याची कल्पना न केलेली बरी.


कलम-१९ भाषण स्वातंत्र्य स्त्री असो वा पुरूष असो भाषण करण्याचे स्वातंत्र्य दिले. आपले विचार अभिव्यक्त करण्यासाठी लिखाणाचे स्वातंत्र्यही आपल्याला दिलेले आहे. यालाच आपण अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणतो. कलम-२५ धर्मस्वातंत्र्य भारतात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे धर्म उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. स्त्री असो वा पुरूष असो त्याला जो धर्म स्वीकारायचा असेल तो धर्म स्वीकारू शकतो. अशाप्रकारे संविधानामध्ये वेगवेगळ्या कलमान्वये स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी आंबेडकरांनी हातभार लावला. स्वातंत्र्यानंतर प्रौढ मताधिकार देण्यात आला. स्त्रियांनाही मताचा अधिकार बहाल केला. अमेरिकेसारख्या विकसित देशात महिलांना दोनशे वर्षे लढा देऊन मताचा अधिकार मिळाला. तो अधिकार कसलाही लढा न देता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना दिला. एवढेच नाही तर राजकारणामध्ये आरक्षण देण्यात आले. आज प्रधानमंत्री, राष्ट्रपती स्त्रिया होताहेत, याचं श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. खर्‍या अर्थाने स्त्रियांना सामाजिक,आर्थिक,राजकीय अधिकार देऊन त्यंना सक्षम बनवण्यासाठी हिंदू कोड बिल संसदेत २४ फेब्रुवारी १९४९ रोजी मांडले. हिंदू कोड बिलासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ४ वर्ष,६ महिने, २६ दिवस काम केले. हिंदू कोड बिल ९ भागात १३९ कलम आणि ७ परिशिष्टात विभागलेले होते. त्यात प्रामुख्याने मुलाप्रमाणे मुलीला संपत्तीत समान वाटा, पोटगीचा अधिकार,घटस्फोटाचा अधिकार,दत्तक विधान सुधारणा इत्यादी कायदे होते. मूळ हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांसाठी २० कायदे होते.परंतु संपूर्ण हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे त्यातील फक्त चारच कायदे झाले. उच्चवर्णीय ब्राम्हणांनी हिंदू कोड बिलाला विरोध केला.


हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा त्यांनी लिहिले होते. हिंदू कोड बिलाचा खून करण्यात आला. तसेच हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे मला आज एवढे दुःख होत आहे की,जेवढे दुःख मला माझी मुले मेली तेव्हा ही झाले नव्हते. तेवढे दुःख हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे होत आहे. मी एक पुरुष असूनही ज्या स्त्रियांसाठी मी लढलो त्या स्त्रियांनी या बिलाला पाठिंबा तर दिलाच नाही.परंतु पुरुषांचे ऐकून हिंदू कोड बिल मागे घेण्यास सांगितले.स्त्रियांनी थोडी ताकत दाखवली असती तर स्त्रियांचे जीवन आज आहे त्यापेक्षा अजून सशक्त झाले असते.  स्त्रियांना नोकरीत आरक्षण देऊन आत्मनिर्भर बनवणारे, स्त्री-पुरुष विषमता नष्ट करणारे,समान काम समान वेतन हा कायदा करणारे, स्त्रियांना भरपगारी प्रसूती रजा देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरच आहेत. स्त्रियांवर डोंगराएवढे उपकार आंबेडकरांनी केले आहेत.
 

मनिषा अनंता अंतरकर (जाधव )
७८२२८२८७०८

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
मराठा आरक्षण; तातडीने घटनापीठ स्थापन करा
कल्याणमध्ये १ नोव्हेंबरला यु.टी.डोंगरे यांच्या आदरांजल
मोदींच्या कार्यकाळात विद्यापीठांच्या ११ कुलगुरूंना दा
जगभरात कोविडमधील १५ टक्के मृत्यू वायू प्रदूषणासंबंधित
बिहार निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी मु
निलंबन कारवाई मागे घेण्याच्या प्रयत्नांना योगी सरकारकड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालनियुक्त १२ जागां
आरोग्य सेतूच्या निर्मितीबाबत केंद्र सरकारच अंधारात
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper