×

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यावर आली मोलमजुरीची वेळ

Published On :    23 Sep 2020
साझा करें:

कोरोनाने बदलले जगण्याचे संदर्भ, कुटुंबाची उपासमार सहन होईना



सांगली: कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगारच हिरावला गेला असल्याने जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे घर कसे चालवावे या विंवचनेत अनेकांना ग्रासले आहे. त्यातून काहीजण आपला मार्ग काढत पोटाची गुजराण करताना दिसत आहेत. अशीच एक धक्कादायक कहाणी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेल्या युवा साहित्यिकाची आहे. या युवा साहित्यिकावर कुटुंबाला जगवण्यासाठी मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. सांगली जत तालुक्यातील निगडी बुद्रुक  नवनाथ गोरे यांची ही व्यथा आहे.


घरात दारिद्रय, कायम दुष्काळ, मुठभर जमिनीच्या तुकड्यावर वृद्ध आई, मोठा अपंग भाऊ व शिक्षण घेणार्‍या लहान भावाचे कुटुंब चालवायची जबाबदारी नवनाथवर होती. यातच त्याने कला शाखेत एमएबीएड केले. त्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. पण ना वशिला ना पाठबळ.  परंतु नवनाथने आपल्याच आयुष्यातील खडतर काटेरी वाट कागदावर उतरवली. आयुष्याची झालेली घालमेल फेसाटी या नावाने कादंबरी रुपात आली. या फेसाटीला लोकांनी डोक्यावर घेतले. फेसाटीमुळे नवनाथ गोरे साहित्यिक म्हणून समाजासमोर आला. फेसाटीला २०१८ साली साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कारही मिळाला. यानंतर फेसाटीला अनेक पुरस्कार मिळाले पण नवनाथचे आयुष्य मात्र खडतरच राहिले.


छोट्याश्या पत्र्याच्या खोलीत घरातील सामान आणि बोचके. या बोचक्यांच्या सोबतील पुरस्कारांच्या शिल्डची गर्दी झाली. वर्तमानपत्र आणि मासिकातून फेसाटीच्या कौतुकानंतर अहमदनगर जिल्ह्यातील एक सिनियर कॉलेजमध्ये तासिका तत्वावर हंगामी नोकरी मिळाली. महिन्याकाठी थोडेफार पैसे मिळू लागले असतानाच कोरोनाचे संकट आले. या संकटाने कॉलेज बंद झाल्याने पुन्हा डोळ्यासमोर गडद अंधार निर्माण झाला. लॉकडाऊन वाढल्याने कुटुंबाची होणारी उपासमार नवनाथ सहन करू शकला नाही. त्याने पेन सोडून हातात कुदळ फावडे घेतले व मोलमजुरीला सचरूवात केली.


कोरोनाच्या संकटामुळे कामही मिळणे अवघड झाले. उसनावरीवर खायला धान्य मिळेना यातच दोन दोन दिवस पाण्यावर काढायची वेळ येऊ लागली. पोटाच्या आगीपुढे अंगातील प्रतिभा घामातून वाहून  गेली. या सहा महिन्यात आज कुटुंबाला काय खाऊ घालायचे या विवंचनेत असणार्‍या नवनाथने गेल्या सहा महिन्यात पेन हातात धरून एक ओळ लिहिली नाही किंवा कोणत्या पुस्तकाचे पानही उघडून बघितले नाही. जगण्याच्या विवंचनेत या कोरोनामुळे आयुष्याची दुप्पट फेसाटी झाल्याचे उद्विग्नपणे नवनाथ सांगतो.


अंगातील उर्मी, प्रतिभा सर्वच जगण्याच्या प्रश्‍नामुळे संपून गेल्याने काही लिहिण्याची इच्छा राहिली नसल्याची निराशा त्याच्या शब्द शब्दातून बाहेर पडते. कोरोनामुळे अनेक राजांचे रंक झाले तसे सिद्धहस्त लेखकाचा मजूर झाला. सरकारने अशा प्रतिभावान लेखकांकडे लक्ष न दिल्यास युवा साहित्यिक जगण्याच्या धडपडीत लोप पावत आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
मराठा आरक्षण; तातडीने घटनापीठ स्थापन करा
कल्याणमध्ये १ नोव्हेंबरला यु.टी.डोंगरे यांच्या आदरांजल
मोदींच्या कार्यकाळात विद्यापीठांच्या ११ कुलगुरूंना दा
जगभरात कोविडमधील १५ टक्के मृत्यू वायू प्रदूषणासंबंधित
बिहार निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी मु
निलंबन कारवाई मागे घेण्याच्या प्रयत्नांना योगी सरकारकड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालनियुक्त १२ जागां
आरोग्य सेतूच्या निर्मितीबाबत केंद्र सरकारच अंधारात
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper