×

भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world

Published On :    25 Sep 2020
साझा करें:

बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे फटकारे



पुणे: मूलनिवासी वृत्तसंस्था

भारतीय लोकशाही म्हणजे Largest democracy in the world असा ढोल बडवला जातो. परंतु भारतीय लोकशाही Largest democracy in the world नसून Largest नौटंकी in the world आहे  अशा शब्दात बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी फटकारे ओढले. प्रा.विलास खरात लिखीत ‘सावधान तेर अर्थात प्राचीन आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र तगर नगरामधील बुध्द स्तूप भाजपा सरकार नष्ट करत आहे’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते पुण्यातील बामसेफ भवन येथे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्यभिषेक, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोेधक समाज व पुणे करारावर मार्गदर्शन केले.


मेश्राम म्हणाले, महाराष्ट्र हे ऐतिहासिक राज्य आहे. बुध्दकालीन व मौर्यकालीन वारस नष्ट करण्याचे करण्याचे योजनाबध्द पध्दतीने षड्यंत्र सुरू आहे. भारतीय पुरातत्व विभागाचा कायदा असूनही ऐतिहासिक वारसा नष्ट केला जात आहे. भोन, तगर, पवनी, कोल्हापूर, अकोला येथील स्तूप नष्ट केले जात आहेत. आरएसएस त्याच्यावर कब्जा करू पाहत आहे. हे समजून घ्यावे लागणार आहे. २४ सप्टेंबरला फार मोठ्या घटना घडल्या आहेत. याच दिवशी २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्यभिषेक शाक्त पध्दतीने केला. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. २४ सप्टेंबर १९३२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मोहनदास गांधी यांच्यात पुणे करार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्राम्हणीकरणामुळे मूलनिवासी बहुजन समाजाचेही ब्राम्हणीकरण असा आम्ही विषय चालवला होता. आम्ही सतत याचा का प्रचार व प्रसार करत आहोत. तर एखाद्या दगडावर पाण्याची सतत धार टाकली तर त्या दगडाला छेद देते. निरंतर  तसे झाले तर छेद देता येतो. कारण प्रतिप्रबोधन ब्राम्हणांनी केले. लोकांचा त्यांनी ब्रेन वॉश केला. त्यामुळे चुकीच्या धारणेचा स्तर मेंदूवर जमा झाला आहे.  हा कचरा साफ करायचा असेल तर सतत चांगल्या विचारांचा प्रचार व प्रसार करायला हवा. प्रतिक्रांतीनंतर ब्राम्हणांनी मनुस्मृती लिहली. शिक्षण व लिहायला बंदी लादली. केवळ ब्राम्हणांनी शिकायचे असा त्यांचा दंडक होता. ब्राम्हण खोटे बोलत आहेत हे लोकांच्या लक्षात का येत नाही तर शिक्षणावर बंदी लादली होती म्हणून. त्यामुळे बुध्दीचा विकास थांबला. बुध्दीचा विकास थांबल्याने विवेक बुध्दीही विकसित झाली नाही. बुध्दी म्हणजे आपल्याकडे असलेली माहिती आहे. तर विवेकबुध्दी म्हणजे काय खोटं आणि काय खरं याची फरक ओळखण्याची क्षमता होय. विवेक बुध्दीचा विकास झाला नाही तर काय खोटं आणि काय खरं हे ओळखता येणार नाही. ब्राम्हणांनी चुकीचे सांगितले तेच आम्ही ग्राह्य मानले. कारण आमच्यात विवेक बुध्दीचा विकास झाला नाही. त्यांनी एकांगी प्रचार केला. त्याचा हा परिणाम आहे.


छत्रपती शिवाजी महाराज हे ‘गो ब्राम्हण प्रतिपालक’ होतेे असा अपप्रचार ब्राम्हणांनी केला. म्हणजे शिवाजी महाराज हे गाय व ब्राम्हणांचे रक्षण करणारे होते असे सांगितले. असा प्रचार त्यांनी का केला तर शिवाजी महाराज व संभाजी महाराजांना आम्ही मारले आहे कळू नये म्हणून. मराठा लोकांना हे कळले तर ते आमचे तुकडे-तुकडे करतील ही भीती असल्याने मराठ्यांना रोखण्यासाठी असा प्रचार करण्यात आला. कारण मराठा लोक शिवाजी महाराजांना मानतात. म्हणजेच मराठ्यांनी ब्राम्हणांचे रक्षण करावे असा प्रोपोगंडा करण्यात आला. गायीची हत्या कोण करतो तर मुसलमान. तुम्ही मुसलमानांना मारले पाहिजे असा त्यातून ध्वनित अर्थ निघतो.  मराठा लोकांना भडकावल्याशिवाय ब्राम्हणांचा उद्देश पुरा होत नाही. ब्राम्हणांचा उद्देश पुरा करण्यासाठी तशी मानसिकता बनवणे हेच ब्राम्हणीकरण होय. शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचे रक्षण केले असाही ब्राम्हणांनी चुकीचा प्रचार केला. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला पुण्यातील ब्राम्हणांनी विरोध केला. शिवाजी महाराज कोण होते तर कुणबी..! कुणबी हे वर्ण धर्मानुसार शुद्र आहेत. शुद्राला राजा बनण्याचा अधिकार नाही. राज्यभिषेक होणार नाही असे ब्राम्हणांनी सांगितले. रामदास स्वामी गुरू होते तर शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक त्यांनी स्वत:नी का केला नाही? पुण्यातील ब्राम्हणांना ते सांगू शकले असते. राज्यभिषेक करण्यासाठी वाराणसीहून गागा भट यांना लाच देऊन आणावे लागले असे मेश्राम यांनी सांगितले.

महाराष्ट्राची स्थापना नाग लोकांनी केली आहे. महाराष्ट्रात नागपंचमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा बहुजनांचा सण आहे. ब्राम्हण कधीच नागपंचमी साजरी करीत नाही. शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक वर्णव्यवस्थेनुसार निर्धारित करण्यात आला होता. त्यावेळी तथाकथित हिंदू धर्म नव्हता. वर्णधर्म म्हणजे ब्राम्हण धर्म आहे. सर्वश्रेष्ठ ब्राम्हण असल्याचे दाखवले गेले आहे. म्हणजे त्यावेळी हिंदू धर्मच नव्हता तर हिंदू धर्माचे रक्षण करण्याचा प्रश्‍न येतोच कुठे? असा सवाल करतानाच ब्राम्हणीकरण करून व्यवस्था मजबूत करणे हेच त्यामागे षड्यंत्र होते असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


महाराष्ट्रात १.५ ते २ टक्के ब्राम्हण आहेत. गागा भटने डाव्या पायाच्या अंगठ्याने राज्यभिषेक केला. त्यावेळी शिवाजी महाराजांनी ते सहन कसे केले? असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. कारण ब्राम्हणाशिवाय राजा बनता येत नाही असे मनुस्मृतीत लिहले आहे. एकवेळ राजा तर बनू दे. राजा बनल्यानंतर सर्वांना सजा करण्याचा अधिकार होता. ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा राखितो असे म्हणत शिवाजी महाराजांनी कृष्णा कुलकर्णीचे दोन तुकडे केले होते. राज्यभिषेक करताना शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात होता, त्याचा धसका घेत अखेर राजमाता जिजाऊ यांचे देहावसान झाले. म्हणून शिवाजी महाराजांनी दुसरा राज्यभिषेक शाक्त पध्दतीने निश्‍चलपुरी गोसावी यांच्या हस्ते केला. तुळजा भवानीला ते कुलदेवता मानत होते. शहाजी राजांनी भगवा झेंडा शिवाजी महाराजांच्या हातात दिला. आपल्या लेटरहेडवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहायचे, ‘जय भवानी, जय जोहार’. योध्दार शब्दापासून जोहार शब्द बनला. ते मार्शल लोक होते. भगवा हा शब्द पाली भाषेतील आहे. भगवा म्हणजे सारा जीवन समर्पित कामासाठी लावणे होय. चिवर हे भगवा, केशरी रंगाचे होते. परंतु आरएसएसने भगव्या रंगाला बदनाम केले अशी टीका मेश्राम यांनी केली.


सत्यशोधक समाजाबाबत मार्गदर्शन करताना मेश्राम म्हणाले, स्वातंत्र्याचे आंदोलन झाले ते बहुजनांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन नव्हते तर ब्राम्हणांच्या स्वातंत्र्याचे होते. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या कॉंग्रेसने हे आंदोलन चालवले. त्या आंदोलनात राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले सहभागी झाले नाहीत. कॉंग्रेस हे भटांचे संघटन आहे अशा शब्दात फुले यांनी टीका केली होती. १८५७ ला विद्रोह झाला त्यावेळी हे भट पांड्यांचे बंड आहे असेही त्यांनी सांगितले होते. फुलेंनी आखलेली रेषा छत्रपती शाहू महाराजांनी काटेकोर पाळली. माझ्यासारख्या राजाबरोबर जो तुम्ही व्यवहार करत आहात तो व्यवहार बघून माझ्या लोकांशी तुम्ही कसे वागाल या कल्पनेने अंगावर काटा येतो. त्यामुळे मी तुमच्या आंदोलनात सहभागी होणार नाही असे शाहू महाराजांनी सांगितले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाही लाला लजपतराय हे भेटले व म्हणाले, तुम्ही स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे. परंतु बाबासाहेबांनी जोतीराव फुले यांच्याकडून प्रेरणा घेतली होती म्हणून ते कॉंग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी एक विदेशी इंग्रज भारतातून गेले आणि जवाहरलाल नेहरू यांच्या हातात ट्रान्सफर ऑफपॉवर दिली. या दिवशी मूलनिवासी बहुजन स्वातंत्र्य झाला नाही. तर ब्राम्हण स्वातंत्र्य झाला. बाबासाहेबांनी संविधानात १४ वर्षाच्या मुलांपासून ६० वर्षापर्यंत शिक्षणाचा मौलिक अधिकार लागू केला. परंतु शिक्षण काही दिले गेले नाही. कॉंग्रेसचे कपिल सिब्बल मनुष्यबळ विकासमंत्री असताना शिक्षणाचा कायदा पास केला. परंतु बजेटमध्ये तरतूद केली नाही. आज देशाचे ३० लाख कोटींचे बजेट आहे. तरीही शासन कर्त्या ब्राम्हणांनी १०१ लाख कोटी कर्ज घेतले. एवढे पैसे कुठे गेले? त्यांच्या लोकांवर खर्च केले. विकास योजनांचा त्यांच्यासाठी फायदा करण्यात आला. आज संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, मीडियावर ब्राम्हणांचे निरंकुश वर्चस्व आहे. म्हणजे कॉंग्रेसचे आंदोलन हे ब्राम्हणांच्या स्वातंत्र्यांचे आंदोलन होते हे सिध्द झाले आहे. फुले, शाहू महाराजांच्या मार्गावर बाबासाहेब चालले नसते तर संविधान आले नसते. आम्ही बघून घेऊ असे कॉंग्रेसचे म्हणणे होते. परंतु इंग्रजांनी भारत सोडून जाण्याअगोदर संविधान बनवा असा आग्रह बाबासाहेब व बॅ.अली जीना यांनी धरल्याने संविधानाची निर्मिती झाली. संविधान नसते तर मनुस्मृती लागू केली असती असे मेश्राम यांनी सांगितले.


१७ ऑगस्ट १९३२ रोजी कम्युनल अवॉर्ड घोषित झाला. त्यात स्वतंत्र मतदारसंघही मंजूर झाला होता. आम्ही अस्पृश्य लोक ब्राम्हणांचे गुलाम आहोत. ब्राम्हणांपासून आम्हांला वेगळे करा अशी मागणी बाबासाहेबांनी लावून धरली होती. स्वतंत्र मतदारसंघामुळे अस्पृश्यांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळाला होता. ब्राम्हणांना तो अधिकार नव्हता. अस्पृश्य आपल्या भविष्याचा निर्णय स्वत: घेऊ शकत होते. ते स्वत: निर्धारित करणार होते. आम्ही गुलामांचे गुलाम आहोत. इंग्रज गेल्यानंतर ब्राम्हण स्वातंत्र्य होतील हे बाबासाहेबांना माहित होते. आपले गुरू फुले यांनी दाखवलेल्या मार्गावर बाबासाहेब चालत राहिले. फुलेंच्या मार्गावरून चालल्यास कल्याण होईल हे बाबासाहेबांना चांगलेच माहित होते. अंधारातून प्रकाशाकडे जो घेऊन जातो तो गुरू असतो. मी स्वातंत्र्य झालो नाही परंतु अस्पृश्य मात्र स्वातंत्र्य झाले ही भीती गांधींना सलायला लागली. बाबासाहेबांनी स्वाभीमानी व आत्मनिर्भर आंदोलन निर्माण केले होते. परंतु पुणे करारामुळे सेटबॅक कसा मिळाला याचे दाखले मेश्राम यांनी दिले. परिणामी धैर्य गळून पडले. बाबासाहेबांचे आत्मनिर्भर आंदोलन नष्ट झाले. नेतृत्वविहीनता निर्माण झाली. दलालांची फौज निर्माण झाली. गर्दीला जशी हाकू तशी ती वागते. विद्रोह व संघर्ष संपला. अर्थहीन लोकशाही निर्माण झाली. लोकशाही बहुसंख्य लोकांनी राज्य करायला हवे. परंतु भारतात ३.५ टक्के ब्राम्हण बहुसंख्य लोकांवर राज्य करत आहेत. संयुक्त मतदारसंघामुळे हे झाले. संयुक्त मतदारसंघ हा एसी, एसटीसाठी लागू होता. परंतु त्यांनतर ओबीसी व मुसलमानांवर पार्टी लेव्हलवर पुणे कराराचा सिध्दांत लागू करण्यात आला. भारतीय लोकशाही म्हणजे Largest democracy in the world  असा ढोल बडवला जातो. परंतु भारतीय लोकशाही Largest democracy in the world  नसून Largest नौटंकी in the world आहे. लोकांना मागास ठेवण्यात आले. उपासमारी निर्माण करून भूकबळीची समस्या वाढवण्यात आली. अशा अनेक समस्या शासक वर्गाने पुणे कराराच्या माध्यमातून निर्माण केल्या असे मेश्राम यांनी सांगितले.


१४ ऑक् टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी धर्मांतर केले. बुध्दीस्ट लोकांचे घृणा अभियान चालवण्यात आले. तेच घृणा अभियान आज मुस्लीमांविरोधात चालवण्यात येत आहे. आज मुसलमान राजकीय पक्षांमध्ये अस्पृश्य झाले आहेत. यावेळी एनडीटीव्हीचे रवीशकुमार यांच्यावरही मेश्राम यांनी तोफ डागली. हिंदू-मुसलमानांचा विषय चघळणे एवढेच रवीशकुमार यांचे काम आहे. बुध्दीस्ट लोकांशी जसा व्यवहार केला गेला त्याची माहिती मुसलमानांनी घेतली पाहिजे. धर्मांतर होऊन ६४ वर्षे लोटली आहेत. नव्या पिढीला देशातील सारी विरासत आमची आहे हे माहित आहे. केवळ बुध्दीस्ट लोकांची विरासत नाही. तर ती सर्वांची विरासत आहे. नाग लोकांचे ६ हजार जातीत तुकडे ब्राम्हणांनी केले. का तुकडे केले तर नाग लोक लढवय्ये आहेत. राजस्थानातील राजपूत लोकही नाग लोक आहेत. भीमा-कोरेगावला ५०० नाग लोकांनी ब्राम्हणांचा कसा बंदोबस्त केला हा इतिहास सर्वांनाच माहित आहे. बुध्द स्तूप, विहार केवळ धर्मांतरित बौध्दांची विरासत आहे असे म्हणणे चुकीचे आहे. वेगवेगळे झाल्यास सत्यानाश होईल. ही विरासत ६ हजार जातींची आहे. म्हणून सर्व लोकांनी त्याचे रक्षण केले पाहिजे. डीएनएने प्रुव्ह केले आहे की, ब्राम्हण सोडून आपण सारे एकच आहोत. त्यासाठी एकच उद्देश, एकच विचारधारा आणि एकच कार्यक्रम आखला पाहिजे. त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्यासाठी देशव्यापी आंदोलन निर्माण केले पाहिजे असे शेवटी मेश्राम यांनी आवाहन केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर
इंटरनेटच्या जाळ्यात अडकले अवघे विश्‍व
देशातील लोक बेरोजगारी, गरीबी, उपासमारीने त्रस्त प्रधानम
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
मराठा आरक्षण; तातडीने घटनापीठ स्थापन करा
कल्याणमध्ये १ नोव्हेंबरला यु.टी.डोंगरे यांच्या आदरांजल
मोदींच्या कार्यकाळात विद्यापीठांच्या ११ कुलगुरूंना दा
जगभरात कोविडमधील १५ टक्के मृत्यू वायू प्रदूषणासंबंधित
बिहार निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी मु
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper