×

बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणांकडून

Published On :    25 Sep 2020
साझा करें:

बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी प्रा.विलास खरात यांचा निशाणापुणे: भारतीय पुरातत्व विभागाला हाताशी धरून बुध्द स्तूप, विहारे हा बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणांकडून सुरू आहे. याच भारतीय पुरातत्व विभागाला ब्राम्हणांनी कमजोर बनवले आहे अशा शब्दात बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी प्रा. विलास खरात यांनी शासक वर्गावर निशाणा साधला. ‘सावधान तेर अर्थात प्राचीन आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र तगर नगरामधील बुध्द स्तूप भाजपा सरकार नष्ट करत आहे’ या स्वत: लिहलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते पुण्यातील बामसेफभवन येथे बोलत होते. यावेळी त्यांनी बुध्द स्तूप, विहारे कशी नष्ट केली जात आहेत याची सखोल माहिती दिली.


प्रा. खरात म्हणाले, प्राचीन भारतात तगर अर्थात तेर या ठिकाणी मोठा व्यापार चालायचा. हे सातवाहन लोकांच्या राजधानीचे ठिकाण होते. नाग लोकांनी ही राजधानी वसवली होती. दक्षिण भारतात एक केंद्र आणि उत्तर भारतात काशी, वाराणसी अशी केंद्रे होती. काशीमध्ये कपड्यांचा व्यापार चालायचा. सोपारा या ठिकाणीही मोठा व्यापार चालत असे.  दुसर्‍या शताब्दीत तगरचा उल्लेख येतो. तेेथे ग्रीक लोकांचे नाणी भेटत असत. भारतीय पुरातत्व विभागाचे जे डायरेक्टर जनरल बनले त्यांनी वास्तविक इतिहास समोर आणलाच नाही. १९५८ मध्ये बुध्द स्तूप मिळाल्याची नोंद केली नाही. ब्रिटीशांच्या कालखंडात कनिंगहम यांनी खरा इतिहास समोर आणला. आज भारतीय पुरातत्व विभागावर ब्राम्हणांचे नियंत्रण आहे. त्यामुळे खरा इतिहास दडपला जात आहे.


तेरमध्ये एक स्तूप सापडले. त्या ठिकाणी आणखी उत्खनन केले तर प्राचीन नगर सापडू शकते. परंतु भारतीय पुरातत्व विभाग याकडे कानाडोळा करत आहे. त्रिविक्रमेश्‍वर मंदिरही आहे. मंदिराचे बांधकाम बुध्दकालीन आहे. हिनयानी परंपरेचे ते प्रतिक आहे. हिनयानी परंपरा बुध्दकालीन आहे. ब्राम्हणांनी या जागेवरही आक्रमण केले आहे. परंतु आम्ही आवाज उठवताच तेथील ब्राम्हणांचे नियंत्रण हटवले आहे.  तेथे भारतीय पुरातत्व विभागाचा फलक लावण्यात आला आहे. तेथे कुठल्याही प्रकारे सुरक्षा रक्षक नाहीत. हा विभाग आंतरराष्ट्रीय हेरिटेज म्हणून गणला जाऊ शकतो.  परंतु कॉंग्रेस-भाजपा सरकारने अस्तित्वाच्या पाऊलखुणा मिटवल्या आहेत. बुध्दांनी आंध्रप्रदेश अमरावती येथे केंद्र बनवले होते. येथेही मोठ्या शिल्डही होत्या. परंतु लॉकडाऊनदरम्यान त्या शिल्ड गायब करण्यात आल्या आहेत. पुरातत्व विभागाच्या म्युझियममध्येही त्या शिल्ड नाहीत. पुरातत्व विभागाच्या सहकार्यानेच अशाप्रकारे कारनामे केले जात आहेत. आश्‍चर्यकारक म्हणजे २० कि.मी.अंतरावर तुळजा भवानी आहे. तुळजा भवानी कोण आहे? तर तेरजा भवानी असे खरे नाव आहे. तारा देवता बुध्दीस्ट गॉड आहे. महाराष्ट्रात ओबीसी-कुणबी मराठ्यांचे कुलदैवत तुळजा भवानी आहे. जुन्नर तालुक्यात जास्त गुंफा आहे. शिवाजी महाराजांचे कुलदैवतही तुळजा भवानी आहे. त्याचे आता ब्राम्हणीकरण करण्यात आले आहे. भवानी बुध्दीस्ट गॉड आहे. शिवाजी महाराजांनी निश्‍चलपुरी गोसावी यांच्याहस्ते शाक्त पध्दतीने दुसरा राज्यभिषेक केला. ब्राम्हणांनी शाक्त परंपरेला बदनाम केले. शाक्त परंपरा बुध्दीस्ट आहे असे प्रा. खरात म्हणाले.


महाराष्ट्राची स्थापनाच नाग लोकांनी केली आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या पुस्तकात सरदेसाई यांनी मराठा लोग नाग आहेत असे म्हटले आहे. राजवाडे यांनीही ते मान्य केले आहे. ओबीसी, कुणबी, मराठ्यांमध्ये सारखीच आडनावे आहेत. भवानी नाग लोकांची प्रेरणा आहे. सम्राट अशोकांचे थेट कनेक्शन महाराष्ट्राशी आहे. ब्रिटीश कालखंडात रेकॉर्ड ठेवण्यात आले होते. परंतु भारतीय पुरातत्व विभागाने रेकॉर्ड केलेले नाहीत. तेर वाचवणे आपली जबाबदारी आहे. कारण ही आंतरराष्ट्रीय मालमत्ता आहे. ऐतिहासिक वारसा संपवण्याचे काम भारतीय पुरातत्व विभाग करत आहे. चारही दिशांनी त्यांचा धोका वाढत आहे. पुरातत्व विभाग ऐतिहासिक जपत नाही. केवळ नालासोपारा स्तूपाला केंद्राची मान्यता आहे. भारतीय पुरातत्व विभागाने २०१० मध्ये नवीन कायदा बनवला. राज्य पुरातत्व विभागाचे रक्षण केंद्रीय पुरातत्व विभाग करत नाही असाही आरोप खरात यांनी केला.

भरूच, सांची, अमरावती या ठिकाणी बुध्दीस्ट केंद्र होते. तेथे प्रशिक्षण दिले जात होते. जाणूनबुजून तेरचे उत्खनन केले नाही. बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून विदर्भातील भोन स्तूप आंदोलन चालवले त्यावेळी अकोल्यातील आम्हांला धमक्याही आल्या. जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. डेक्कन महाविद्यालयातील प्रा.देवतारे यांनी सातवाहन काळाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना वॉटर हार्वेस्टिंग सापडले. व्यापारी केंद्र नजरेत पडले. बुध्द स्तूपांचे अवशेष सापडले. धातू मिळाले. इ.स.पूर्व ६ व्या शताब्दीत तथागत बुध्द व इ.स.पूर्व ३ र्‍या शताब्दीत सम्राट अशोक निर्मित बुध्द स्तूप सापडले. त्याचा आजपर्यंत रेकॉर्ड प्रकाशित करण्यात आला नाही. एका स्तूपाच्या बाजूला असंख्य विहार असतात. याची भारतीय पुरातत्व विभागाला माहिती मिळाली. परंतु याच परिसरात धरण बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यावेळी कॉंग्रेसची सत्ता होती. या बाबी लोकांना कळल्या असत्या तर उठाव झाला असता. मात्र लोकांना त्याची भनक नाही. पाटबंधारे विभागाने जीगाव धरण प्रकल्प बांधण्याची परवानगी मिळवली. नितीन गडकरी यांनी त्यासाठी १३ हजार कोटी रूपये मंजूर केले. आम्ही भोन स्तूप बचाव आंदोलनाची घोषणा केली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवलेंना पुढे करून आम्हांला थांबवण्याचा प्रयत्न केला. कारण लोकांमधील विद्रोह कसा कमी करता येईल यासाठी ती चाल खेळण्यात आली होती. भोन मौर्यकालीन स्तूप आहे. ते वाचवणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे प्रा. खरात यांनी सांगितले.


५-६ व्या शताब्दीतील पवनी प्राचीन धरोहर आहे. तेथे जगन्नाथ पुरीसारखा मंदिरही आहे.  या ठिकाणी पाटबंधारे विभागाने जेसीबी लावून खोदाई करण्याचे काम केले. मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. बुध्द स्तूप नष्ट करण्याचे काम करण्यात आले. नागपूरमध्ये कुही तहसील आहे. तेथील अडम असित जनपद धोक्यात आले आहे. बुध्दांच्या कालखंडातील स्तूप रेतीच्या माध्यमातून बनवण्यात आले आहेत. तर सम्राट अशोक यांच्या कालखंडात स्तूप बनवण्यासाठी रेती, विटा, दगडांचा वापर करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या मध्यभागी एक मोठा शिलालेख आहे. हा शिलालेख पाली भाषेत आहे. १८८० मध्ये तेथील बर्वे नावाच्या प्रशासक पेशव्याने त्याचे ऐतिहासिक पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला. कराड एक व्यापारी केंद्र होते.  पुण्यातील जुन्नर तालुका हा हिनयानी लोकांच्या माध्यमातून बनवले आहे. येथील १४-१५ शताब्दीत ७ व्या गुंफची तोडफोड करण्यात आली आहे. तेथे चैत्यगृहदेखील आहे. तेथेच अष्टविनायक केंद्र बनवण्यात आले आहे. ब्राम्हणांनी भारतीय पुरातत्व विभागाला कमजोर बनवले आहे. त्यासाठी भारतीय पुरातत्व विभागही जबाबदार आहे अशी टीका खरात यांनी केली.


ब्रम्हदेश रंगून येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १९५४ मध्ये एक बुध्दांची प्रतिमा भेट म्हणून मिळाली होती. ही बुध्दांची प्रतिमा डॉ.आंबेडकरांनी देहूरोड या ठिकाणी बसवली होती. त्याचवेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एक स्टेटमेंट केले होते. ते स्टेटमेंट असे की, बाबासाहेबांचे अवतार कार्य आता संपले आहे. एकप्रकारे त्यांनी मारण्याची धमकी दिली होती. देहूरोडमधील संत तुकाराम महाराज बुध्दांची विचारधारा मानत होते. मी येथे का आलो आहे याचे स्पष्टीकरण देताना बाबासाहेब म्हणाले, पंढरपुराचा पांडुरंग हादेखील बुध्द आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाने आजपर्यंत या म्हणण्याला आव्हान दिलेले नाही. सम्राट अशोक यांनी ८४ हजार स्तूपांची निर्मिती केली. मी देखील बुध्द मूर्ती स्थापित केली आहे. देहूरोड येथे बाबासाहेबांच्या हस्ते स्थापित केलेल्या बुध्दमूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. त्यासाठी टेक्सास गायकवाड या आरएसएसच्या चेल्याला हाताशी धरण्यात आले आहे. नालासोपारा या ठिकाणीही दोन शिलालेख मिळाले आहेत. एलोरातील शिलालेख सम्राट अशोक यांच्या कालखंडातील आहे. तेथे आता शिवलिंग बनवण्यात आले आहे. तेथे कृष्णेश्‍वर मंदिरही आहे. ह्युत्सनत्संग यांनी लाखो स्तूप शोधून काढले. नाशिक येथील त्रिरश्मी केंद्र आहे. तेथे पांडवकालीन लेणी नाहीत तर बुध्दकालीन लेणी आहेत. ब्राम्हणांनी त्याचा खोटा प्रचार केला. आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवण्याच्या नावाखाली पनवेलमधील गुंफा हटवल्या गेल्या आहेत. कार्ला-भाजा येथेही मंदिर बनवण्यात आले आहे. म्हणजे महाराष्ट्रातील बुध्दीस्ट केंद्रे हटवण्याचे काम सुरू आहे असा आरोप खरात यांनी केला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
मराठा आरक्षण; तातडीने घटनापीठ स्थापन करा
कल्याणमध्ये १ नोव्हेंबरला यु.टी.डोंगरे यांच्या आदरांजल
मोदींच्या कार्यकाळात विद्यापीठांच्या ११ कुलगुरूंना दा
जगभरात कोविडमधील १५ टक्के मृत्यू वायू प्रदूषणासंबंधित
बिहार निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी मु
निलंबन कारवाई मागे घेण्याच्या प्रयत्नांना योगी सरकारकड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालनियुक्त १२ जागां
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper