×

६४ टक्के बालकांना बालकामगार कायद्याची माहितीच नाही

Published On :    12 Jun 2018
साझा करें:

अल्पवयीन बालकांना कुठल्याही कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तरीही अनेक ठिकाणी बालकामगारांना कामावर ठेवले जाते.पुणे : अल्पवयीन बालकांना कुठल्याही कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तरीही अनेक ठिकाणी बालकामगारांना कामावर ठेवले जाते. मात्र, पुण्यातील १३ ते १७ या वयोगटातील ६४ टक्के बालकांना बालकामगार कायदा अस्तित्वात आहे, याबाबतची कुठलीही माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे .


जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त बालहक्क कृती गट (आर्क) यांच्या वतीने पुणे शहरातील येरवडा, विश्रांतवाडी, औंध, बिबवेवाडी व इतर वस्त्यांमधील मुलांसह बाल कामगार विषयावर चर्चा करून एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये बालकांसाठी असलेल्या अनेक बाबींची त्यांना माहिती नसल्याचे आढळून आले.

 

बालसंरक्षण हक्क म्हणजे काय हे सांगता येईल का. असा प्रश्‍न विचारला असता केवळ ३७ टक्के बालकांना बालसंरक्षण कायद्याबाबत माहिती होती़. ६३ टक्के बालकांना स्वत:च्या संरक्षणासंबंधी कायदेशीर तरतुदीबाबत माहितीच नसल्याचे दिसून आले. 


७१ टक्के बालकांनी बालमजूर किंवा मजुरी करताना पाहिले असल्याचे सांगितले तर ८४ टक्के मुलांनी बालमजुरी अयोग्य असल्याचे सांगितले़.१२ टक्के बालकांना बालमजुरी योग्य असल्याचे वाटते़ 

 

बालकामगार कायद्याबाबत माहिती आहे का? असे विचारले असता ६४ टक्के बालकांना  बालमजुरी कायदा अस्तित्वात असल्याची माहिती नाही. केवळ २२ टक्के मुलांना बालमजुरी कायद्याबाबत माहिती होती तर १४ टक्के बालके काहीच सांगू शकले नाहीत़  एकूण ७८ टक्के बालकांमध्ये बालहक्क कायद्याबाबत जागृती करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. 

 

आर्कतर्फे करण्यात आलेले हे सर्वेक्षण कामगार उपायुक्तांना मंगळवारी सर्व बालकांसह जाऊन देण्यात येणार असल्याचे आर्कचे समन्वयक सुशांत सोनोने यांनी सांगितले़ यामध्ये न्यू व्हिजन, आयएससी, होप, केक़े़पीक़े़पी., निर्माण, स्वाधार आणि आयडेंटी फौंडेशन यांनी सहभाग घेतला होता़  त्यात १३ ते १७ वयोगटातील १७१ मुलांनी भाग घेतला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सागरी किनारा मार्गामुळे तीन हजार मच्छीमारांवर संकट
संसदेत यंदा २७ मुस्लिम खासदार
राजकीय पक्षांच्या नावात धार्मिक जातीवाचक शब्द नको
ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवड
भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय, शत्रुघ्न सिन्हांना संशय
भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय
या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमक
भारत बंदचे आंदोलन पेटले
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper