×

पीएम किसान योजनेत तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही घोटाळा

Published On :    26 Sep 2020
साझा करें:

हजारो अपात्र व्यक्तींनी घेतला लाभ



मुंबई: प्रधान किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ पासून देशात लागू करण्यात आली. पण आता तामिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्रातही या योजनतेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. अपात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतल्याचे राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी मान्य केले आहे.


अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याचे आमच्या समोर आले आहे. हे खरं आहे की एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक व्यक्ती, इन्कमटॅक्स भरणार्‍या व्यक्ती तसंच ज्यांच्या नावावर जमीन नाही अशा व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतला आहे, जो कायदेशीर अपराध आहे. अशा व्यक्तींना शोधून त्यांच्याकडून दिलेले गेलेले पैसै परत मिळवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्यातरी अशा व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा मानस नाही, धीरजकुमार यांनी सांगितले.


याच वर्षी ऑगस्टमध्ये तामिळनाडूत या योजनेत जवळपास १०० कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. तामिळनाडूनतल्या कडलोर, कल्लाकुरूची, वेल्लोर, सालेम, त्रिची तसंच थिरूवरून जिल्ह्यांत हजारो अपात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ देत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसै जमा केले असल्याचे लक्षात आले. या घोटाळ्यानंतर केंद्र सरकारने सगळ्याच राज्यांना पीएम किसान योजनेच्या खातेदारांची चौकशी करण्यास तसंच कोणी अपात्र असतील तर त्यांची खाती रद्द करायला सांगितले.


११ सप्टेंबर २०२० ला कृषी आयुक्तांनी राज्यातल्या सगळे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच नोडल ऑफिसर यांना पत्राव्दारे कळवलं की आपल्या जिल्ह्यात खातेदारांची पडताळणी करून अपात्र व्यक्ती आढळल्यास लगेच कार्यवाही करा आणि तसा अहवाल सादर करा.

याच पत्रात लिहिले होते की, १ जून २०२० पर्यंत राज्यात १०१.१५ लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली होती तर १० सप्टेंबर २०२० पर्यंत १०९.९३ लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली होती. याचाच अर्थ राज्यात गेल्या तीन महिन्यात जवळपास ८.७८ लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे हे शेतकरी मार्गदर्शक सुचनांप्रमाणे लाभास पात्र किंवा अपात्र ठरल्यास त्या प्रमाणे कारवाई करावी.


आता केंद्र सरकारने राज्यातल्या सगळ्या लाभार्थ्यांपैकी कोणत्याही ५ टक्के गावांची तसेच लाभार्थ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही गाव-लाभार्थी कोण असतील याची यादी केंद्र सरकारने प्रशासनाला दिली आहे, आणि ही पडताळणी पुढच्या ६० दिवसात प्रशासनाला करायाची आहे.


कृषी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातल्या ६ लाख ६ हजार ७९५ लाभार्थ्यांची पडताळणी केली असता त्यातले १७ हजार ६७२ अपात्र ठरले आहेत. कृषी खात्याने अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व गावातील लाभार्थ्यांची पडताळणी केली होती. याच धर्तीवर आता राज्यातल्या सर्व जिल्हाधिकार्‍यांना आपल्या जिल्ह्यातल्या १०० टक्के लाभार्थ्यांची चौकशी करण्यासाठी पत्र लिहिले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर
इंटरनेटच्या जाळ्यात अडकले अवघे विश्‍व
देशातील लोक बेरोजगारी, गरीबी, उपासमारीने त्रस्त प्रधानम
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
मराठा आरक्षण; तातडीने घटनापीठ स्थापन करा
कल्याणमध्ये १ नोव्हेंबरला यु.टी.डोंगरे यांच्या आदरांजल
मोदींच्या कार्यकाळात विद्यापीठांच्या ११ कुलगुरूंना दा
जगभरात कोविडमधील १५ टक्के मृत्यू वायू प्रदूषणासंबंधित
बिहार निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी मु
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper