×

रेल्वेतील ११ हजारपेक्षा अधिक पदे समाप्त करणार

Published On :    13 Jun 2018
साझा करें:

प्रादेशिक महाप्रबंधकांना रेल्वे बोर्डाने लिहले पत्र



नवी दिल्ली: रेल्वेचे खाजगीकरण केले जाणार नाही असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले असले तरी रेल्वेतील ११ हजार ४० पदे समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे पत्र देशातील प्रादेशिक महाप्रबंधकांना रेल्वे बोर्डाने पाठवले आहे. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी कितीही फेकामफेक केली तरी रेल्वेचे खाजगीकरणाच्यादृष्टीने हे पाऊल असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


रेल्वे बोर्डाने वित्तवर्ष २०१८-१९ या वर्षात विविध प्रादेशिक विभागातील ११ हजारपेक्षा जास्त पदे समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे त्यांचे लक्ष्य आहे. त्यासंबंधी महाप्रबंधकांना पत्र पाठविण्यात आले आहे. 


अतिरिक्त जबाबदारी कमी करण्यासाठी ही पदे निर्माण करण्यात आली होती. त्यासाठी पुन्हा एकदा समीक्षा करण्यात आली.  ही पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे आता भरण्याची आवश्यकता नाही असे अकलेचे तारे रेल्वे बोर्डाने तोडले आहेत. 


गेल्यावर्षी अशा पदांची संख्या १० हजार होती. पत्राच्या अनुसार उत्तर आणि दक्षिण रेल्वेला प्रत्येकी १ हजार ५००, पूर्व रेल्वे-१ हजार १०० तर मध्य रेल्वेतील १ हजार पदे समाप्त करावीत असे सांगण्यात आले आहे. 


प्रत्येवर्षी प्रादेशिक पदांच्या कामांचे विश्‍लेषण केले जाते. त्यानंतर त्यांना आपल्या निर्धारित कामांचे लक्ष्य दिले जाते. काही प्रादेशिक विभाग लक्ष्य पूर्ण करतात. तर काहीजण करत नाहीत. त्यातून योग्य पदांचा समावेश करण्यासाठी सुरक्षा श्रेणीचे पद तयार केले जाते, त्यासाठी त्याचा वापर केला जातो. 


भारतीय रेल्वेत आजघडीला १३ लाख ४० हजार कर्मचारी काम करत आहेत. रेल्वेला येणार्‍या उत्पन्नापैकी अर्धा हिस्सा त्यांच्या पगारावर खर्च केला जातो. तर रेल्वेच्या पुर्नगठनवर विवेक देवरॉय समितीने सांगितले होते की, रेल्वे कर्मचार्‍यांच्या कामात तर्कसंगती आणायला हवी, कर्मचार्‍यांना अधिक कार्यकुशल बनवून त्यांना काम दिले जावे, जरूरत पडली तर त्यांची संख्या कमी करा, असे रेल्वेतील एका अधिकार्‍याने स्पष्ट केले

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोदी सरकारने फसवले, ‘स्वच्छ भारत’ कर बंद केल्यानंतरही ह
‘होय मी लाभार्थी’वर सरकारची १३ कोटींची उधळण, मराठीतल्या
कंत्राटी महाभरती बेरोजगारांची थट्टाच
आरक्षणासाठी मातंग समाजातर्फे मंत्रालयावर मोर्चा, सरका
शीख दंगलप्रकरणी कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठे
राज्याकडून धनगर आरक्षणाची केंद्राकडे शिफारसच नाही
राज्य निवडणूक आयोगाचे सचिवही कंत्राटी निवृत्त, आयएएस अध
राम मंदिरासाठी अध्यादेश आणल्यास न्यायालयात जाऊ
जिकडे सत्ता तिकडे कोणीही पाणी भरण्यास तयार
नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत घसरण, रघुराम राजन या
बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनाची संघ परिवाराला भरली धडक
‘रामाच्या दासा’चे फिरले डोके, आठवलेंची चापलूसगिरी सुरू
महाराष्ट्रात अंगणवाडी घोटाळा; विद्यार्थी ६१ लाख, बोगस ८
‘मनुस्मृती’ जाळणे समानतेसाठी महत्त्वाचे, माजी उपमुख्य
ब्राम्हणवाद्यांकडून लव्ह जिहादला फोडणी, अलवरमध्ये हिंस
ब्राम्हणवाद्यांचे लाड पुरवण्यासाठी कुंभमेळ्याला ८०० व
राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयालाही मोदी सरकारने गंडव
गोवारींचे अन्नत्याग आंदोलन सुरू, आरक्षण देण्याची मागणी
मध्यप्रदेशमध्ये ३९ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, असोसि
मोदी सरकारला अखेरची घरघर, धनंजय मुंडे यांची टीका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper