×

४० टक्के शेतकरी पीक विमा मदतीपासून वंचित

Published On :    13 Jun 2018
साझा करें:

पेरणीची वेळ येऊन ठेपली असताना बँकेत वारंवार चकरा मारूनही शेतकर्‍यांना अद्याप पीककर्ज मिळालेले नाही.



यवतमाळ: पेरणीची वेळ येऊन ठेपली असताना बँकेत वारंवार चकरा मारूनही शेतकर्‍यांना अद्याप पीककर्ज मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी पीकविम्याच्या पैशाची प्रतीक्षा करत होता. 


मात्र, जाहीर करण्यात आलेल्या पात्र शेतकर्‍यांच्या यादीत अनेक शेतकर्‍यांना डावलण्यात आल्याने आता पेरण्या कशा कराव्यात, असा गंभीर प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४० टक्के शेतकरी पीकविमा मदतीपासून वंचित राहिले आहेत.


मागीलवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार शेतकर्‍यांनी पीकविमा काढला होता. यापैकी १ लाख १८ हजार शेतकर्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळणार असून ४६ हजार शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. 


यावर्षी सुरुवातीला अपुरा पाऊस, नंतर बोंडअळीने उद्धवस्त झालेले कापसाचे पीक, यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टीने डबघाईस आला. यामुळेच जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली.
 


शासनाने जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पीक आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी आल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला. त्यामुळे यंदा पिकविम्याची रक्कम मिळेलच अशी आशा शेतकर्‍यांना होती. 


यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख १८ हजार शेतकर्‍यांना १२२ कोटी १६ लाख १३ हजार रुपये मंजूर झाले असून, यामध्ये  सर्वात जास्त ७२ हजार शेतकर्‍यांची संख्या यवतमाळ जिल्हा बँकेची असून या शेतकर्‍यांना ७० कोटींचा लाभ मिळणार आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य
लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली?
शरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार
एससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही
भगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही !
११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत
टीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड
संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी
मराठवाड्यावर गडद दुष्काळछाया !
भाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू
योजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका
पुणे ‘एटीएस’चा सातार्‍यात छापा
भरत कुरणे, वाघमारेसह सर्व संशयितांना‘कोका’
धनगर आरक्षणासाठी चक्का जाम
भोजन पुरविणार्‍या पुरवठादारांचे पैसे देऊ नका
धनगर समाजाचा आरक्षणासाठी रास्ता रोको
एकत्र निवडणुकांसाठी भाजपची आक्रमक भूमिका
सनातन संस्था, भिडेंना राजाश्रय
...तर भारतीयांचे आयुर्मान चार वर्षांनी वाढेल
२०१९ मध्ये ईव्हीएम मशीन फोडणारच
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper