×

सरकारी बँकावर नियंत्रणासाठी शासनान आणखी अधिकार द्यावे’

Published On :    13 Jun 2018
साझा करें:

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची संसदिय समितीपुढे मागणी



नवी दिल्ली : बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआयला अधिक स्वायत्तता व अधिकार हवेत, अशी मागणी आरबीआयचेे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी मंगळवारी संसदीय समितीपुढे केली. सरकारी बँकांवर आपले फारसे नियंत्रण नसल्याची कबुलीही पटेल यांनी दिली.


सरकारी बँकांमध्ये बुडीत आणि थकीत कर्जांचा प्रश्‍न फारच तीव्र होत असल्याने याबाबत आरबीआयची काय भूमिक आहे तसेच बँकांमधील घोटाळे, भ्रष्टाचार, पैशाची टंचाई अशा प्रश्‍नांवर रिझर्व्ह बँक काय करते, याची उत्तरे देण्यासाठी ऊर्जित पटेल यांना वित्त विभागाच्या संसदीय समितीपुढे हजर करण्यात आले. 


त्यांनी सरकारी बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला आणखी अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी या समितिपुढे सतत केली. मात्र सध्या असलेल्या अधिकारात आपण शक्य ती कारवाई करीत आहोत, असेही पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.


नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेची कसी काय फसवणूक करू शकला? रिझर्व्ह बँकेने पंजाब नॅशनल बँकेचे हिशेब तपासले नव्हते काय? असे प्रश्‍न उपस्थित केल्यावर पटेल म्हणाले, की देशातील प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेतील हिशेब एवढ्या खोलवर जाऊन तपासणे शक्य नसते.  बँकिंग क्षेत्रातील तोट्याची चर्चा संसदीय समितीपुढे झाली.
 

संसदीय समितीचे अध्यक्ष वीरप्पा मोईली यांनी पटेल यांना देशातीलील नगदीच्या टंचाईबाबत व काही ठिकाणी एटीएम बंद असल्याबद्दल विचारले असता पटेल यांनी परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे सांगितले. बँकांमधील घोटाळ्यांकडे आपण गांभीर्याने लक्ष देत आहोत. सर्व बँकांना याबाबत कडक सूचना दिलेल्या आहेत, असेही पटेल यांनी मोईली यांना सांगितले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य
लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली?
शरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार
एससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही
भगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही !
११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत
टीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड
संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी
मराठवाड्यावर गडद दुष्काळछाया !
भाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू
योजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका
पुणे ‘एटीएस’चा सातार्‍यात छापा
भरत कुरणे, वाघमारेसह सर्व संशयितांना‘कोका’
धनगर आरक्षणासाठी चक्का जाम
भोजन पुरविणार्‍या पुरवठादारांचे पैसे देऊ नका
धनगर समाजाचा आरक्षणासाठी रास्ता रोको
एकत्र निवडणुकांसाठी भाजपची आक्रमक भूमिका
सनातन संस्था, भिडेंना राजाश्रय
...तर भारतीयांचे आयुर्मान चार वर्षांनी वाढेल
२०१९ मध्ये ईव्हीएम मशीन फोडणारच
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper