×

तृतीयपंथी म्हणून जगणे हा त्या व्यक्तीचा मूलभूत हक्क

Published On :    14 Jun 2018
साझा करें:

केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय



आर्नाकुलम : जन्मजात आपल्या शरिराचे जे लिंग आहे त्या लिंगाची व्यक्ती आपण नाही, असे ज्यांना मनातून वाटते त्यांना तृतीयपंथी अशा लैंगिक ओळखीनुसार जगण्याचा मूलभूत हक्क आहे, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.


असे व्यक्ती वयस्क असल्यास त्या व्यक्तींनी जन्मजात लिंगाचा स्वीकार करून कुटुंबातच राहावे, असे बंधन पालक त्या व्यक्तीवर करू शकत नाही. स्वत:ला तृतीयपंथी मानणारे व्यक्ती हीच ओळख घेऊन कोठेही हिंडू-फिरू शकतात. किंवा स्वमर्जीने तृतीयपंथींच्या समाजात सामील होऊन त्यांच्यासोबत राहू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे.


तृतीयपंथींना स्वतंत्र लैंगिक ओळख बहाल करणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत केरळ उच्च न्यायालयाने म्हटले की, तृतीयपंथी पुरुष किंवा स्त्री नसले तरी तेही एक व्यक्ती असतात. भारतीय राज्यघटनेने दिलेले सर्व मूलभूत अधिकार त्यांनाही आहेत. जगण्याच्या मूलभूत हक्कात आपले जीवन आपल्याला हवे तसे जगण्याचा अधिकारही यात आहे. 


त्यामुळे स्वत:ला जी लैंगिक ओळख मनापासून जाणवते त्यानुसार वागणे-बोलणे, पोषाख आणि चालीरीतींतून जाहीरपणे अभिव्यक्त करणे, हा अशा व्यक्तींचा मूलभूत अधिकार आहे. सरकार किंवा इतर कोणीही हा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही, अथवा त्यात ढवळाढवळ करू शकत नाही. 


ऍबी जेम्स नावाच्या एका वयस्क व्यक्तीच्या आईने दाखल केलेली ‘हेबियस कॉर्पस्’ ही याचिका फेटाळताना न्या.व्ही.चितंबरेश व न्या.के.पी.ज्योतिंद्रनाथ यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. ऍबी जेम्स स्वत:ला तृतीयपंथी मानतो. 


त्याने ‘अरुंधती’ असे मुलीचे नाव धारण केले असून, घरातून पळून जाऊन गेल्या काही दिवसांपासून तृतीयपंथींच्या वस्तीत राहात आहे. त्याला हजर करून कुटुंबाच्या स्वाधीन करावे, अशी आईने विनंती केली होती.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोदी सरकारने सीबीआयची विश्‍वासार्हता संपविली
मुद्रा योजनेचे कर्ज न मिळाल्याने बेरोजगार युवकाची आत्म
भारत छोडो ब्राम्हणांनाही सांगावे लागेल
अयोध्येतील ‘त्या’ जागेवर गौतम बुद्धांचे विहार बांधा-भा
२०१९ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची खूर्ची जाणार-श
हिंमत असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदला
सरकारची तानाशाही चालणार नाही चंद्रशेखर आझाद उर्फ रावण य
दुष्काळी भागात पंतप्रधानांचा ‘उज्ज्वला’ गॅस चहापुरताच!
सहा महिन्यांत १३४० बालकांचा मृत्यू
वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या-प्रकाश आंबे
मराठा आरक्षणामुळे नोकर्‍या मिळतील असे समजणे चुकीचे
कार्यक्रम आयोजकाच्या घरावर दगडफेक
पोलीस प्रशासनाच्या आडून आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज
उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मोदींविरोधी लाट
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्या देशभरात जेलभरो
वैद्यकीय महाविद्यालयांतील औषधांचाही साठा संपला!
राम मंदिरासाठी कायदा अशक्य-मोहन भागवत
भारतातील ९२ टक्के महिलांचे वेतन १० हजारांहून कमी
केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्या
साध्वी प्रज्ञा, पुरोहित विरुद्ध ‘यूएपीए’खाली चालणार खट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper