×

झारखंड आणि महाराष्ट्रात चार लोकांची जमावाकडून हत्या

Published On :    14 Jun 2018
साझा करें:

परिसरात तणावपूर्ण वातावरण, गुन्हा दाखल



झारखंड/महाराष्ट्र : म्हशींची चोरी केल्याच्या संशयातून झारखंडा गोड्डा जिल्ह्यातील दोन व महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील चोर समजून दोन अशा एकूण चार लोकांची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. 


झारखंडमधील हत्या करण्यात आलेल्यांमध्ये सिराबुद्दिन अन्सारी आणि मुर्तजा असे त्यांची नावे आहेत. हे दोघे जण अनुक्रमे तलझारी आणि बांझी गावाचे रहिवाशी होते. याचा व्हिडिओ सोशल  मीडियावर व्हायरल झाला. 


त्या त्या परिसरात तणावपूर्ण वातावरण असून गावातील लोकांमध्ये राग आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. 


या प्रकरणी गोड्डाचे पोलीस अधिक्षक राजीव रंजन सिंह म्हणाले, या हत्येप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून विच्छेदनासाठी जिल्हा मुख्यालयात पाठविण्यात आले आहे. 


अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये ढुल्लू गावचे मुन्शी बेसरा यांचा समावेश आहे. मुनशी बेसरा यांच्या म्हशी चोरुन नेल्याच्या पार्श्‍वभूमीवर ढुल्लू गावातील सर्व आदिवासी एकत्र आले आणि त्या दोघांचा पाठलाग केला. 


एवढ्या मोठ्या जमावाने सिराबुद्दिन अन्सारी व मूर्तजा यांच्यावर हल्ला केला. त्या दोघांना रक्तबंबाळ केले. मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याने त्या दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. त्याचबरोबर या दोघांना अर्धमेल्या अवस्थेत काठीवर लटकविण्यात आले आणि जोराजोरात काठीने मारहाण करण्यात आली. 


अशीच घटना महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात झाली आहे. वैजापूर तालुक्यातील चंदगावमधील ८ जूनला हा प्रकार घडला. चोर असल्याच्या संशयावरुन दोन लोकांना जमावाने ठेचून मारले. त्यामध्ये ७ जण अन्य लोक जखमीही झाले. 


जवळजवळ १ हजार ५०० लोकांनी काठीने या दोघांवर हल्ला केला. लोकांनी एका शेताजवळ या दोघांना पकडले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ज्यावेळी पोलीस तेथे पोहोचले त्यावेळी त्या दोघांना लोकांकडून बेदम मारहाण करण्यात येत होती. 


भरत सोनवणे आणि शिवाजी शिंदे असे हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु अद्यापही कुणाला अटक करण्यात आलेली नाही. 


औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक आरती सिंह म्हणाल्या, या प्रकरणी पोलीस अधिकार्‍यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. तर व्हॉटस्ऍप आणि अन्य सोशल मीडियाच्या साईवर बनावट मॅसेज पाठविणार्‍यांना लगामा लावला जात आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चंद्रपूर जिल्ह्यात थातूरमातूर उपचार केल्याने गर्भवती म
‘गोध्रा दंगल घडविणार्‍या मोदींच्या काळात संविधान धोक्य
पनामा पेपर्समध्ये एअरटेल मालकाचा मुलगा आणि पीव्हीआर सि
कॅशलेसबाबत भारत शेवटच्या स्थानावर
माल्याविरोधात आणखी एक आरोपपत्र
जीएसटीच्या कक्षेत आणूनही पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ना
सुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी युनेस्कोने केला निषे
‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’ प्रवेशात किमान गुणांचा अवरोध
मोदी-शहा जोडगोळीकडून नवीन राजकीय जुमल्यांचा शोध सुरु
बिहारमध्ये आरटीआय कार्यकर्त्याची हत्या
उच्चवर्णीयांकडून अनुसूचित जातीवर बहिष्कार
शिवसेनेची घाणाघाती टीका, मोदींनी इंग्रजांसारखे पलायन क
न्यायपालिका आणि सीबीआयचेही केले मोदींनी राजकारण
गोंडवाना विद्यापीठाने केली शिक्षण शुल्कात वाढ
दाती महाराजावरुन आखाडा परिषदेत हंगामा
अधिकार्‍याचा अजब सल्ला, ‘पासपोर्ट पहिजे धर्मांतरण करा’!
‘त्या’ याचिकांवर ४ जुलैपासून सुनावणी
पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध
मोदींच्या विरोधात बोलायचे की नाही हा माझा प्रश्‍न
न्यायालयिन भरती स्थगित करण्यासाठी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper