×

‘नीट’मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक शेवटून दुसरा

Published On :    18 Oct 2020
साझा करें:

छत्तीसगड, दिल्ली या छोट्या राज्यांनी महाराष्ट्राला टाकले मागेपुणे : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात महाराष्ट्राचा क्रमांक देशात शेवटून दुसरा लागला. शेजारचे छोटेसे छत्तीसगड राज्य देशात अव्वल आले आहे. यंदा नीटचा कट ऑफ गेल्या वर्षाच्या तुलनेत १३ गुणांनी वाढला आहे.


देशभरातील सर्व राज्यांपेक्षा नीट परीक्षा देणार्‍या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा राज्यात नोंदणी केलेल्या २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ७९ हजार ९७४ विद्यार्थी पात्र ठरले असून राज्याचा निकाल ४०.९५ टक्के लागला आहे. देशात नागालँडचा निकाल सर्वात कमी ४०.५० टक्के लागला असून त्यापेक्षा महाराष्ट्राचा निकाल किंचित बरा आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र नीट परीक्षेत शेवटून चौथ्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी निकालात महाराष्ट्राच्या खाली असलेल्या मेघालय व मिझोराम राज्यांनीदेखील यंदा महाराष्ट्राला मागे टाकले आहे.


प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक हरीश बुटले म्हणाले, नीट परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का घसरत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरणकर्ते, संस्थांचालक, शिक्षक-पालक, विद्यार्थी अशा सर्वांनाच हा निकाल गांभीर्याने घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय राज्याचा ‘नीट’ टक्का वाढणार नाहीे.


छोट्या राज्यांनी घेतली निकालात आघाडी -

यंदा निकालात छत्तीसगड व दिल्ली अव्वल दोन क्रमांकावर असून छत्तीसगडचा निकाल ७५.६४ टक्के तर दिल्लीचा निकाल ७५.४९ टक्के लागला आहे, तर हरियाणाचा निकाल ७२ टक्के लागला. तसेच केरळसारख्या लहान राज्याचा निकाल ६३.९४ टक्के असून कर्नाटकचा निकाल ६१.५६ टक्के आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांनी थोपटले दंड
गडचिंचले हत्याकांड, ५३ जणांना जामीन
ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता?
..पण द्वेष करणारे, दंगेखोर, तिरंग्याला विरोध करणारे कपटी स
बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनाला तन, मन, धनाने सहकार्य कर
गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला भीषण आग; पाच रुग्णांचा हो
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तविलेले लोकशाही समोरील धो
महिलांचा सन्मान आणि भारताचे संविधान
भारतीय संविधानाची प्रास्तविका समजली तरी जीवनाचं सार्थक
आधुनिक भारताचे निर्माते : विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेड
आपला देश संविधानानुसार चालला आहे का?
संविधान मानणारे जागृत आहेत काय ? (भाग -१)
संविधान मानणारे जागृत आहेत का? (भाग-२)
मीडिया ट्रायल न घेण्याचे रिपब्लिक टीव्हीला आदेश द्या
शासकीय अधिकार्‍यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत मालमत्तेची मा
नागरिकांच्या मालमत्तेवर सरकार कायमस्वरूपी कब्जा शकत ना
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचा आसूड कडाडला!
ईव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका