×

राजस्थानात गुर्जर समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक

Published On :    18 Oct 2020
साझा करें:

गेहलोत सरकारला १ नोव्हेंबरचा अल्टिमेटम



जयपूर: आरक्षणाच्या मुद्यावरुन राजस्थानमध्ये गुर्जर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १ नोव्हेंबरपासून राज्यात मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराच गुर्जर समाजाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारला दिला आहे. शनिवारी भरतपूर येथेगुर्जर समाजाची महापंचायत पार पडली. गुर्जर नेता किराडी सिंह बैंसला यांनी ही महापंचायत बोलावली होती. २०११ ते २०१९ पर्यंत सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी या महापंचायतीत करण्यात आली.


भरतपूर येथे पार पडलेल्या महापंचायतीनंतर किराडी सिंह बैंसला यांचे पूत्र विजय बैंसला यांनी गेहलोत सरकारला राजस्थान बंदचा इशाराही दिला आहे. सध्या कुठे पीक काढणी सुरु आहे, तर कुठे पेरणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे आम्ही सरकारला १ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. पण सरकारने नोव्हेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर राजस्थान बंद करु असा इशाराच विजय बैंसला यांनी दिला आहे.
 MBC  अंतर्गत आरक्षण देण्यात यावे, राज्यात सध्या ज्या १५ प्रकारच्या भरती सुरु आहेत, त्यात ५ टक्के आरक्षण मिळावे, गुर्जर समाजाच्या मागच्या आंदोलनात ज्यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी, देवनारायण योजना गुर्जर समाजाला लागू करावी अशा गुर्जर समाजाच्या मागण्या आहेत.

गुर्जर आंदोलन आणि आंदोलकांचे बळी!
२००६ मध्ये समितीच्या स्थापनेनंतर गुर्जर समाज काही काळ शांत झाला. पण २००७ मध्ये पुन्हा आंदोलन पुकारण्यात आले.तेव्हा पीपलखेडा पाटोली येथे राज्यमार्गावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात २८ जणांचा मृत्यू झाला होता. तर २३ मार्ज २००८ मध्ये भरतपूरच्या बयाना येथे गुर्जर समाजाच्या आंदोलकांनी रेल्वे पटरी उखडून टाकली. त्यावेळी पोलिस गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आंदोलकांनी दौसा जिल्ह्याच्या सिकंदरा येथे रास्तारोको केला. त्यावेळी २३ आंदोलकांचा मृत्यू झाला होता. हा आकडा २००८ अखेरपर्यंत ७२ पर्यंत जाऊन पोहोचला होता.
एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या मागणीनुसार उद्धव ठाकरे सरकारने MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता राजस्थानमध्येही गुर्जर समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशावेळी राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार या आंदोलनाला कसे हाताळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गुन्हेगारीचा ठपका असलेल्या लोकप्रतिनिधींना पाठीशी घाल
आरएसएस फॅसिस्ट संघटना,भारतासाठी धोकादायक
रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्
आता खाप पंचायतींचेही ‘चलो दिल्ली’
पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकापेक्षाही कमी मजुरी भारतात
१४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश
देशातील शाळा चार जानेवारीपासून सुरू करा
रामायण-महाभारत-मनुस्मृति-भगवद्गीता ब्राम्हणो के संगठित
शेतकर्‍यांचा बाणेदारपणा, सरकारचं जेवण नाकारलं
ईव्हीएम नसल्यानेच हे शक्य झाले
आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांमध्ये फूट पाडण्याचे केंद्राच
स्थानिकांचा विरोध डावलत केंद्राकडून वाढवण बंदरासाठी नि
लाकडाच्या धुराने भारतीयांची फुफ्फुसे खराब
पेट्रोल- डिझेलचे दर २५ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर
विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब
भारतात विकल्या जाणार्‍या भेसळयुक्त मधाने लोकांच्या जीव
शेतकर्‍यांनी सरकारला गाठले खिंडीत
मोदी-शहांच्या गुजरातेत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दैनंदिन
हरियाणाच्या खट्टर सरकारला शेतकरी आंदोलनाची झळ
१९ डिसेंबरला सर्व आरोपींना मुंबईतील एनआयए कोर्टापुढे ह
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper