×

राजस्थानमधील शाळांचे होणार धार्मिकीकरण

Published On :    14 Jun 2018
साझा करें:

साधु संतांचे प्रवचन ठेवण्याचा निर्णय, मुलांच्या नैतिकतेसाठी निर्णय घेतल्याचे सरकारचे स्पष्टीकरण



राजस्थान : राजस्थानमधील शाळांचे धार्मिकीकरण होत असून साधु संतांचे प्रवचन ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुलांच्या नैतिकतेसाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था कुठल्या दिशेने नेली जात आहे या विचारानेच डोके भणभणायला लागते. 


या संबंधिचा आदेश राजस्थानच्या शिक्षण विभागाने काढला आहे. पुढील सत्रात शाळेच्या तिसर्‍या शनिवारी संतांचे प्रवचन होईल. बालसभाच्या नावावरुन कार्यक्रम घेतला जाईल. प्रत्येक शनिवारी अर्धातास हा कार्यक्रम होईल. 


याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी महापुरुषांचा जीवन परिचय सांगितला जाईल. दुसर्‍या शनिवारी प्रेरणादायी कथा, तिसर्‍या शनिवारी संतांचे प्रवचन घेण्यात येणार आहे.


केवळ हा निर्णय सरकारी शाळांनाच लागू नसून सीबीएसएसी मान्यता प्राप्त व आवासी शाळा, गैर सरकारी शाळा, विशेष प्रशिक्षण कँप, शिक्षण-प्रशिक्षण शाळा यांनाही लागू होईल. या कार्यक्रमाच्या माध्यमांतून मुलांना नैतिकेचे धडे दिले जातील. त्यासाठीच हा कार्यक्रम सुरु करण्यात आल्याचे राजस्थानच्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. 


महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महाकाव्य आणि त्या संबंधित प्रश्‍नोत्तरे परीक्षेचे आयोजन होईल. त्या शिवाय समजा पुढील महिन्यात पाचवा शनिवार आल्यास त्या दिवशी मुलांनी नाटक करायचे आहे. यामध्ये देशभक्तीचे गाणेही होईल. 


दरम्यान, राजस्थान माध्यमिक शिक्षण बोर्डाचे निर्देशक नथमल डिडेल यांनी सांगितले की, विधानसभा क्षेत्रातील लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी केली होती. त्यामुळे या मागणीचा विचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 


या निर्णयाबाबत विरोधी पक्ष कॉंग्रेसने सरकारला घेरले आहे. सरकारने असा तुघलकी निर्णय घेऊ नये. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. 


शिक्षणमंत्री वासुदेव यांनी परशूराम जयंतीच्या झालेल्या कार्यक्रमात अजमेर लोकांशी संबोधित करताना ते म्हणाले, पुढील शैक्षणिक क्षेत्रात परशूरामाच्या अध्यायावर पाठ्यक्रम असेल. 


याबाबत नथमल डिडेल म्हणाले, या कार्यक्रमाचा कुठल्याही धर्माशी घेणे-देणे नाही. कार्यक्रमात येणारे संत हिंदू-मुस्लीम-ईसाई येऊ शकतात. जे सन्मानित आहेत ज्यांना लोकांची आस्था आहे ते विद्यार्थ्यांच्या जीवनात नैतिकता आणण्यासाठी धडे घेतील.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोदी सरकारने सीबीआयची विश्‍वासार्हता संपविली
मुद्रा योजनेचे कर्ज न मिळाल्याने बेरोजगार युवकाची आत्म
भारत छोडो ब्राम्हणांनाही सांगावे लागेल
अयोध्येतील ‘त्या’ जागेवर गौतम बुद्धांचे विहार बांधा-भा
२०१९ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची खूर्ची जाणार-श
हिंमत असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदला
सरकारची तानाशाही चालणार नाही चंद्रशेखर आझाद उर्फ रावण य
दुष्काळी भागात पंतप्रधानांचा ‘उज्ज्वला’ गॅस चहापुरताच!
सहा महिन्यांत १३४० बालकांचा मृत्यू
वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या-प्रकाश आंबे
मराठा आरक्षणामुळे नोकर्‍या मिळतील असे समजणे चुकीचे
कार्यक्रम आयोजकाच्या घरावर दगडफेक
पोलीस प्रशासनाच्या आडून आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज
उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मोदींविरोधी लाट
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्या देशभरात जेलभरो
वैद्यकीय महाविद्यालयांतील औषधांचाही साठा संपला!
राम मंदिरासाठी कायदा अशक्य-मोहन भागवत
भारतातील ९२ टक्के महिलांचे वेतन १० हजारांहून कमी
केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्या
साध्वी प्रज्ञा, पुरोहित विरुद्ध ‘यूएपीए’खाली चालणार खट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper