×

आरटीआयला कमजोर बनवण्याच्या हालचाली

Published On :    18 Oct 2020
साझा करें:

आरटीआयअंतर्गत देशभरात ३.३३ कोटी दाखल झाल्या तक्रारी, महाराष्ट्रातून ६ लाख ३० हजार ५९६ तक्रारी दाखल, त्यानंतर कर्नाटक व तामिळनाडू



नवी दिल्ली: आरटीआयअंतर्गत देशभरात ३.३३ कोटी तक्रारी दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून ६ लाख ३० हजार ५९६ तर  कर्नाटकमधून ३ लाख ३८ हजार ९९४ व तामिळनाडूतून २ लाख ४४ हजार ६७२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. केंद्र व राज्य सरकार माहिती आयुक्तांची पदे भरत नसल्याने हा कायदा कमजोर होण्याच्या मार्गावर आहे.


गेल्या १५ वर्षात आरटी कायद्यात काय बदल होते गेले याची माहिती संकलित करण्यात आली आहे. नागरिकांसाठी हा कायदा फारच महत्वाचा आहे. मोठ्या संख्येने तक्रारी दाखल होतात. त्या तक्रारींची दखल घेण्यात येत नसल्याने काहीनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. केंद्र सरकार केवळ आम्ही पारदर्शी व भ्रष्टाचार कमी करण्यासाठी काम करत आहोत असे सांगते, परंतु ते तसे नाही, उलट पारदर्शकतेला फाटा देण्यात आला आहे. गैर सरकारी संस्था ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडियाने दिलेल्या माहितीनुसार २००५-०६ ते २०१९-२० या कालावधीत देशभरात ३.३३ कोटी आरटीआय दाखल झाले आहेत. ही देखील कमी संख्या आहे. यामध्ये उत्तर प्रदेश व तेलंगणा राज्यांची आकडेवारी नाही. काही अन्य राज्यांचीही आकडेवारी उपलब्ध नाही. 


केंद्र व राज्य विभागात वर्षभरात दाखल झालेल्या आरटीआयची माहिती माहिती आयोगाला द्यावी लागते. त्यानंतर आयोग आपल्या वार्षिक अहवालात त्याची आकडेवारी जाहीर करते. काही राज्य वार्षिक अहवाल प्रकाशित करत नाहीत. उत्तर प्रदेश व तेलंगणा या राज्यांनी अद्यापि वार्षिक आकडे जारी केलेले नाहीत. ३.३३ कोटी आरटीआयपैकी ९२ लाख ६३ हजार ८१६ आरटीआय केंद्र सरकारसाठी दाखल झाले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा नंबर आहे. गेल्या १५ वर्षात ६९ लाख ३६ हजार ५६४ आरटीआय दाखल झाले आहेत. कर्नाटक ३० लाख ५० हजार ९४७, तामिळनाडू २६ लाख ९१ हजार ३९६, केरळ २१ लाख ९२ हजार ५७१, गुजरात १३ लाख ८८ हजार २२५, राजस्थान १२ लाख १२ हजार ८२७, उत्तराखंड ९ लाख ६९ हजार ५११, छत्तीसगड ८ लाख ९६ हजार २८८, बिहार ८ लाख ८४ हजार १०२, आंध्र प्रदेश ८ लाख ४ हजार ५०९, पंजाब ७ लाख ९२ हजार ४०८, हरियाणा ६ लाख १३ हजार ४८ आरटीआय दाखल झाले आहेत.


हिमाचल प्रदेश ४ लाख ८४ हजार ३५६, ओडीशा ४ लाख ११ हजार ६२१, मध्य प्रदेश १ लाख ८४ हजार ११२, आसाम १ लाख ८२ हजार ९९४, पश्‍चिम बंगाल ९८ हजार ३२३, जम्मू-काश्मीर ७३ हजार ४५२, झारखंड ६७ हजार २२६, त्रिपुरा ४२ हजार १११, गोवा ३२ हजार २८३, नागालँड २८ हजार ६०४, अरूणाचल प्रदेश २६ हजार १५२, मेघालय १८ हजार ५२७, मिझोरम १६ हजार ११५, सिक्कीम ५ हजार १२०, मणिपूर ४ हजार ३७४ आरटीआय तक्रारी दाखल झाल्या आहेत.


ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडियाच्या अहवालानुसार १५ वर्षात माहिती आयोगात एकूण २१.८६ अपील करण्यात आले आहेत. सर्वात जास्त तामिळनाडू माहिती आयोगात ४ लाख ६१ हजार ८१२ त्यानंतर केंद्रीय माहिती आयोगाचा क्रमांक आहे. केंद्रीय माहिती आयोगाकडे ३ लाख २ हजार ८० तक्रारी आल्या आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गुन्हेगारीचा ठपका असलेल्या लोकप्रतिनिधींना पाठीशी घाल
आरएसएस फॅसिस्ट संघटना,भारतासाठी धोकादायक
रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्
आता खाप पंचायतींचेही ‘चलो दिल्ली’
पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकापेक्षाही कमी मजुरी भारतात
१४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश
देशातील शाळा चार जानेवारीपासून सुरू करा
रामायण-महाभारत-मनुस्मृति-भगवद्गीता ब्राम्हणो के संगठित
शेतकर्‍यांचा बाणेदारपणा, सरकारचं जेवण नाकारलं
ईव्हीएम नसल्यानेच हे शक्य झाले
आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांमध्ये फूट पाडण्याचे केंद्राच
स्थानिकांचा विरोध डावलत केंद्राकडून वाढवण बंदरासाठी नि
लाकडाच्या धुराने भारतीयांची फुफ्फुसे खराब
पेट्रोल- डिझेलचे दर २५ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर
विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब
भारतात विकल्या जाणार्‍या भेसळयुक्त मधाने लोकांच्या जीव
शेतकर्‍यांनी सरकारला गाठले खिंडीत
मोदी-शहांच्या गुजरातेत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दैनंदिन
हरियाणाच्या खट्टर सरकारला शेतकरी आंदोलनाची झळ
१९ डिसेंबरला सर्व आरोपींना मुंबईतील एनआयए कोर्टापुढे ह
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper