×

प्रत्येक चार लोकांमागे तीन भारतीयांना मिळत नाही पौष्टिक आहार

Published On :    19 Oct 2020
साझा करें:

इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालाने पुन्हा एकदा खळबळ



नवी दिल्ली:  २०२० च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये १०७ देशांच्या सूचीत भारत ९४ स्थानावर असून उपासमारी गंभीर असल्याचा अहवाल आला असतानाच डोळ्याची झोप उडवणारी धक्कादायक बातमी हाती आली आहे. प्रत्येक चार लोकांमागे तीन भारतीयांना पौष्टिक आहार मिळत नसल्याचा अहवाल इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


दरम्यान यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी निगराणी करण्यात येत नाही. उपासमारीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी उदासीन दृष्टीकोन, मोठ्या राज्यांचे खराब प्रदर्शन याला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. पीअर रिव्यूड पत्रिका फूड पॉलिसीमध्ये प्रकाशित ‘अफोर्डबिलीटी ऑफ न्यूट्रिशियस डायट्स इन रूरल इंडिया’ या शिर्षकांतर्गत हा अहवाल प्रसिध्द झाला आहे. अर्थशास्त्रज्ञ कल्याणी रघुनाथन आणि वरिष्ठ संशोधक एना हरफोर्थ, संशोधक डेरेक डी.हिडे यांनी हा अभ्यास करून हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 


२०११ च्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण ते ग्रामीण खाद्य मूल्य आणि मजुरीच्या आधारावर भारतात उपासमारी स्थानिक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एवढेच नाही तर २०१५-१६ मध्ये शाळेत जाण्याआधी ३८ टक्के मुलांचा विकास थांबला आहे. २१ टक्के कमजोर झाले  आहेत. त्यांच्या आई आणि मुले ऍनिमियाग्रस्त झाले आहेत. यामध्ये आश्‍चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. प्रत्येक चार लोकांमागे तीन भारतीयांना पौष्टिक आहार मिळत नसल्याचे दिसून आले आहे.


दरम्यान गतवर्षी ग्लोबल हंगर इंडेक्सच्या ११७ देशांच्या सूचीत भारत १०२ क्रमांकावर होता. भारताबरोबर शेजारील देश बांग्लादेश, म्यानमार, पाकिस्तान गंभीर श्रेणीत होते. परंतु भारत उपासमारीत त्यांच्या पुढे आहे. म्हणजे भारतात उपासमारी या देशांपेक्षा जास्त आहे. बांग्लादेश ७५, म्यानमार ७८, पाकिस्तान ८८ स्थानावर आहे. नेपाळ ७३, श्रीलंका ६४ स्थानावर असून हे देश मध्यम श्रेणीत मोडतात.  भारताच्या ग्रामीण भागात आहाराची भयावह स्थिती आहे. कमी मजुरी आणि कृषी क्षेत्राला भेडसावणार्‍या समस्या यामध्ये कारणीभूत आहेत. 


२००१-११ या कालावधीत लोकांचा आहार वाढला, त्याचबरोबर ग्रामीण भागातील मजुरीही वाढली. परंतु २०११ मध्ये पौष्टिक आहार अकुशल मजुरांच्या तुलनेत महाग होते. जवळजवळ ५०-६० टक्के पुरूष आणि ७०-८० टक्के महिला मनरेगावर मजुरी करत होते. ४५ ते ६४ टक्के ग्रामीण भारतातील लोक राष्ट्रीय खाद्य आहाराच्या दिशानिर्देशानुसार पौष्टिक आहार घेऊ शकत नाहीत. पोषणासंदर्भात नीती बनवली पाहिजे. दूध, फळ, भाजी या खाद्य पदार्थांवर लक्ष केंद्रित करायला हवे. अकुशल श्रमिकांसाठी या वस्तू उपलब्ध करून द्यायला हव्यात, असे या अहवालात संशोेधकांनी म्हटले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांनी थोपटले दंड
गडचिंचले हत्याकांड, ५३ जणांना जामीन
ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता?
..पण द्वेष करणारे, दंगेखोर, तिरंग्याला विरोध करणारे कपटी स
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तविलेले लोकशाही समोरील धो
महिलांचा सन्मान आणि भारताचे संविधान
भारतीय संविधानाची प्रास्तविका समजली तरी जीवनाचं सार्थक
आधुनिक भारताचे निर्माते : विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेड
आपला देश संविधानानुसार चालला आहे का?
संविधान मानणारे जागृत आहेत काय ? (भाग -१)
संविधान मानणारे जागृत आहेत का? (भाग-२)
मीडिया ट्रायल न घेण्याचे रिपब्लिक टीव्हीला आदेश द्या
शासकीय अधिकार्‍यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत मालमत्तेची मा
नागरिकांच्या मालमत्तेवर सरकार कायमस्वरूपी कब्जा शकत ना
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचा आसूड कडाडला!
ईव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे क
लाचखोरीत भारत आशिया खंडात टॉपवर
शुल्क वाढ करणार्‍या खासगी शाळा राज्य सरकारलाही जुमानत न
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावर डिसेंबरपासून नियमित सुनाव
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper