×

घटनादुरुस्ती ऐवजी ‘बदल’ हा शब्द निघाला असेल, मी खेद व्यक्त करतो

Published On :    19 Oct 2020
साझा करें:

वाद निर्माण होताच छत्रपती संभाजी राजेंना झाली उपरती



मुंबई: छत्रपती संभाजीराजेंनी गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडेही मदत मागण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी, केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल, उदा- घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरू आहे, असे संभाजीराजेंनी म्हटल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. त्यानंतर, अनेकांनी या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे. तसेच, मला घटनादुरुस्ती असे म्हणायचे होते, असेही स्पष्टीकरण देत त्यांनी खेद व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसर्‍या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या मोर्चात खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले होते. त्यावेळी आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल, त्यावेळी तलवारी काढू, असा इशारा देत आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. आता, गरज पडल्यास केंद्र सरकारच्या मुव्हमेंटने घटना बदल करण्याच्या दृष्टीने माझा अभ्यास सुरू असल्याचं संभाजीराजेंनी म्हटंल होतं. पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर पाहणीसाठी गेले असताना, पत्रकारांनी मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंना प्रश्न विचारले होते. मात्र, मला तसे म्हणायचे नव्हते, असे स्पष्टीकरण संभाजीराजे यांनी दिले आहे.

मला माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा बातम्या दिसत आहेत, मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्यासंबंधी अभ्यास करणार आहे, मला हे वाक्य बोलायचे होते. चुकून बोलण्याच्या ओघात, घटना दुरुस्ती ऐवजी बदला हा शब्द निघाला असावा, पत्रकारांनी माझी मूळ भावना समजून न घेता, चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या. त्यामुळे, लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. मराठा आरक्षणाबाबत संसदेत घटनादुरुस्ती हाही पर्याय होऊ शकतो, असे विद्वान सांगत आहेत, आणि मी त्याचा अभ्यास करुन पावले उचलणार आहे, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.
संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गुन्हेगारीचा ठपका असलेल्या लोकप्रतिनिधींना पाठीशी घाल
आरएसएस फॅसिस्ट संघटना,भारतासाठी धोकादायक
रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्
आता खाप पंचायतींचेही ‘चलो दिल्ली’
पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकापेक्षाही कमी मजुरी भारतात
१४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश
देशातील शाळा चार जानेवारीपासून सुरू करा
रामायण-महाभारत-मनुस्मृति-भगवद्गीता ब्राम्हणो के संगठित
शेतकर्‍यांचा बाणेदारपणा, सरकारचं जेवण नाकारलं
ईव्हीएम नसल्यानेच हे शक्य झाले
आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांमध्ये फूट पाडण्याचे केंद्राच
स्थानिकांचा विरोध डावलत केंद्राकडून वाढवण बंदरासाठी नि
लाकडाच्या धुराने भारतीयांची फुफ्फुसे खराब
पेट्रोल- डिझेलचे दर २५ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर
विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब
भारतात विकल्या जाणार्‍या भेसळयुक्त मधाने लोकांच्या जीव
शेतकर्‍यांनी सरकारला गाठले खिंडीत
मोदी-शहांच्या गुजरातेत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दैनंदिन
हरियाणाच्या खट्टर सरकारला शेतकरी आंदोलनाची झळ
१९ डिसेंबरला सर्व आरोपींना मुंबईतील एनआयए कोर्टापुढे ह
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper