×

रेटिंग एजन्सीची दिशाभूल करणारी माहिती दाखवली प्रेक्षकांना

Published On :    20 Oct 2020
साझा करें:

‘बार्क’चा रिपब्लिकवर आरोप



मुंबईः आपल्या एजन्सीचे काही खासगी व गोपनीय मजकूर दिशाभूल व आणि बदनामीकारकरित्या दाखवल्याचा आरोप टीव्ही प्रेक्षकांची रेटिंग एजन्सी बार्क इंडियाने रिपब्लिक इंडिया या वृत्तवाहिनीवर केला आहे. सध्या रिपब्लिक इंडिया व अन्य दोन मराठी वाहिन्यांवर टीआरपी घोटाळा केल्याच्या प्रकरणाची पोलिस चौकशी सुरू असताना रिपब्लिक इंडियाने आपल्या रेटिंग एजन्सीची दिशाभूल करणारी माहिती प्रेक्षकांना दाखवली आहे, आम्ही पोलिसांना सर्व सहकार्य करत असताना रिपब्लिकचे असे वर्तन निराशजनक असल्याचे पत्रक बार्क इंडियाने प्रसिद्ध केले आहे.


बार्क इंडियाच्या या प्रतिक्रियेवर रिपब्लिक इंडियाचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी बार्कच्या इमेलमुळे मुंबईचे पोलिस आयुक्त खोटे बोलतात हे सिद्ध झाले असून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनी कोणत्याही घोटाळ्यात सामील नाही असा बार्कचा एक इमेल रिपब्लिकने उघड केला, त्यानंतर बार्क इंडियाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. बार्क इंडियाचे सीईओ सुनील लुल्ला व रिपब्लिक मीडिया नेटवर्क सीईओ विकास खानचंदानी यांच्यातील हा एक मेल आहे. हा इमेल १६ ऑक्टोबरला खानचंदानी यांनी बार्कला पाठवला होता. या इमेलचे उत्तर १७ ऑक्टोबरला देण्यात आले होते. या उत्तरात रिपब्लिक नेटवर्कवरचे स्वामित्व हक्क सांगणारी कंपनी एआरजी आउटलायर मीडियाच्या विरोधात कोणताही दंडात्मक कारवाई सुरू झाल्यास बार्क इंडिया या संदर्भात आपले पुरावे सादर करेल, असे म्हटले आहे. बार्क इंडियाने आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल रिपब्लिक नेटवर्कचे आभारही मानले आहेत.या मजकुरावरून रिपब्लिक इंडियाने आपण कोणतेही गैरकृत्य केले नाही, असा दावा केला आहे.


‘अर्णवच्या हजेरीबाबत समन्स जारी करा’

दरम्यान अर्णव गोस्वामी यांना टीआरपी घोटाळ्याबाबत हजर करायचे असेल तर मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात समन्स जारी करावे, असे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात ८ जणांना समन्स पाठवले आहे पण अर्णव गोस्वामी यांना पाठवलेले नाही. अर्णव यांना समन्स पाठवल्यास त्यांना न्यायालयात हजर राहावे लागेल व त्यांना पोलिस चौकशीला सहकार्य करावे लागेल असे न्यायालयाने म्हटले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांनी थोपटले दंड
गडचिंचले हत्याकांड, ५३ जणांना जामीन
ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता?
..पण द्वेष करणारे, दंगेखोर, तिरंग्याला विरोध करणारे कपटी स
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तविलेले लोकशाही समोरील धो
महिलांचा सन्मान आणि भारताचे संविधान
भारतीय संविधानाची प्रास्तविका समजली तरी जीवनाचं सार्थक
आधुनिक भारताचे निर्माते : विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेड
आपला देश संविधानानुसार चालला आहे का?
संविधान मानणारे जागृत आहेत काय ? (भाग -१)
संविधान मानणारे जागृत आहेत का? (भाग-२)
मीडिया ट्रायल न घेण्याचे रिपब्लिक टीव्हीला आदेश द्या
शासकीय अधिकार्‍यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत मालमत्तेची मा
नागरिकांच्या मालमत्तेवर सरकार कायमस्वरूपी कब्जा शकत ना
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचा आसूड कडाडला!
ईव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे क
लाचखोरीत भारत आशिया खंडात टॉपवर
शुल्क वाढ करणार्‍या खासगी शाळा राज्य सरकारलाही जुमानत न
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावर डिसेंबरपासून नियमित सुनाव
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper