×

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तविलेले लोकशाही समोरील धोके

Published On :    26 Nov 2020
साझा करें:

सन १९४५ मध्ये दुसरे जागतिक महायुद्ध संपले, त्यामध्ये इंग्लंडची बरीच पिछेहाट झाली. तसेच तेथे काही राजकीय घडामोडी होऊन हूजूर पक्षाची सत्ता जाऊन मजूर पक्ष सत्तेवर आला. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला मोठ्या प्रमाणात प्राधान्य प्राप्त झाले.सन १९४५ मध्ये दुसरे जागतिक महायुद्ध संपले, त्यामध्ये इंग्लंडची बरीच पिछेहाट झाली. तसेच तेथे काही राजकीय घडामोडी होऊन हूजूर पक्षाची सत्ता जाऊन मजूर पक्ष सत्तेवर आला. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला मोठ्या प्रमाणात प्राधान्य प्राप्त झाले.  म्हणूनच कॅबिनेट मिशनने १६ मार्च १९४६ रोजी सत्ता हस्तांतरणाची घोषणा केली. देशाचा राज्य कारभार कसा चालावा? यासाठी संविधानाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रांतीय विधानमंडळाच्या निर्वाचीत सदस्याद्वारे संविधान सभेच्या  सदस्यांचे निर्वाचन करण्यात आले. मुंबई विधानमंडळावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्वाचित होऊ शकले नाही. परंतु त्यांच्या राष्ट्रव्यापी आंदोलनामुळे ते बंगाल  प्रांतांमधून महाप्राण जोगेन्द्रनाथ मंडल व इतर अनुसूचित जातीच्या सात सदस्यांच्या पाठिंब्यामुळे निर्वाचित होऊ शकले. अन्यथा त्यांच्यासाठी संविधान सभेच्या दारं-खिडक्या आणि तावदाने सुद्धा बंद करून, त्यांची नाकेबंदी करण्यात आली होती.


दि. १३ डिसेंबर १९४६ ला पंडित नेहरूंनी संविधानाच्या ध्येय उद्दिष्टांचा ठराव मांडला व कामकाज स्थगित केले. पुढील कामकाजाच्या दिवशी म्हणजे १६ डिसेंबर १९४६ ला बॅ. एम. आर. जयकर यांनी त्यावर स्थगनप्रस्ताव मांडून जोपर्यंत मुस्लिम लीग व संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी अप्रत्यक्ष टाकलेला बहिष्कार मागे घेऊन ते संविधान सभेच्या कामकाजात सहभागी होत नाहीत, तोपर्यंत काम  स्थगित ठेवावे अशी मागणी केली. त्यानंतर १७ डिसेंबर १९४६ ला पंडित नेहरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अचानकपणे स्थगन प्रस्तावावर आपले विचार मांडण्यासाठी आमंत्रित केले. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना त्यांना आमंत्रित केल्यामुळे त्यांच्यासह संपूर्ण सभागृह आश्चर्यचकित झाले. परंतु विरोधकांच्या मनात काहीही असले तरीही आणि बोलण्याची कोणतीही तयारी  नसून दहा मिनिटे वेळ निर्धारित असताना त्यांनी संधीचं सोनं केलं. स्थगन प्रस्तावावर आपले विचार मांडताना त्यांनी मानवजातीला हितावह राष्ट्रभक्ती दर्शवणारे विद्वत्ताप्रचुर विचार सभागृहासमोर मांडून उपस्थितांना तोंडात बोटं घालण्यास भाग पाडले.


सुरुवातीला सभागृहातील काहींना वाटत होते की, डॉ. आंबेडकर यांची मोठ्या प्रमाणात फसगत झाली आहे. त्यांनी जर स्थगन प्रस्तावाचे समर्थन केले तर  पंडित नेहरू व सभागृहामध्ये स्पष्ट बहुमत असणार्‍या कॉंग्रेस पक्षासोबत कदाचित तो पंगा असेल? आणि नाहीतर ती मानवता विरोधी व पळपुटी भूमिका सिद्ध होवून साम्यवादी व समाजवादी सदस्य त्यांना धिक्कारतील. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थगन प्रस्तावाचे स्पष्ट समर्थन करून आपले  सडेतोड व तेजस्वी विचार मांडले. त्यांच्या विचारांमध्ये देशप्रेम ओतप्रोत भरलेले  असून त्यामध्ये अखंड भारताचे स्वप्न होते. ध्येय उद्दिष्टांच्या स्थगन प्रस्तावामुळे हिंदू-मुस्लीम युद्ध होईल ज्यामुळे देश  रसातळाला जाऊन मानवजातीचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. पुढे पंडित नेहरूंना महान समाजवादी नेते संबोधून त्यांनी या ध्येय उद्दिष्टांच्या ठरावाच्या माध्यमातून आपली घोर निराशाच केली आहे असे ते म्हणतात. कारण त्यामध्ये शेती व उद्योगांचे राष्ट्रीयीकरण सुद्धा अपेक्षित होते. पुढे ते ब्रिटिश विचारवंत बर्क यांचा दाखला  देताना म्हणतात, सत्ता देणे सोपे परंतु शहाणपण देणे महाकठीण कर्म आहे, म्हणून संविधान सभेला प्राप्त अधिकारांचा वापर सुज्ञपणे करून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन एकात्मतेच्या मार्गाने जाऊ या यात शंका नसावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थगन प्रस्तावावरील भाषण व विविध समित्यांवरील कार्यामुळे त्यांच्या संविधानिक कार्यकाळाला वेगळीच कलाटणी मिळाली. भारत-पाक विभाजनामुळे त्यांचे रद्द झालेले संविधान सभेवरील सदस्यत्व मुंबई प्रांतांमधून त्यांना पुन्हा बहाल करण्यात आले. प्रथम त्यांची मसुदा समितीवर व नंतर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.


मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपले सारे कौशल्य, बुद्धिमत्ता, शारीरिक व मानसिक कष्ट पणाला लावून जगातील सर्वोत्तम घटनेची निर्मिती केली. सोबतच राष्ट्रध्वज व चिन्हांकित प्रतीकांची सर्वसमावेशक निवड केली त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या शेवटच्या अध्यक्षीय भाषणात म्हणतात की,  या खुर्चीत बसून संविधान सभेच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करत आलो आहे. संविधान सभेच्या मसुदा समितीवरील सभासदांनी किती उत्साहाने, चिकाटीने नि निष्ठेने कार्य पार पाडले याची खरी जाणीव अन्य कोणा पेक्षाही मला अधिक आहे. विशेषत: त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. मसुदा समितीवर व तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो निर्णय आपण घेतला त्याच्याइतका अचूक निर्णय दुसरा कोणताही घेतला नाही.


एकेकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी दारं, खिडक्या व तावदाने यासह संपूर्ण नाकेबंदी करणारे सरदार वल्लभभाई पटेल यांना एक आंबेडकर विरोधक जेव्हा म्हणतो की, ते तर कॉंग्रेस व गांधीचे विरोधक आहेत. मग त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती कशासाठी? त्यावर सरदार पटेल म्हणतात की, तुम्हाला घटना निर्मितीबद्दल काय कळते. आम्हाला या कामासाठी डॉ. आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सापडणे शक्य नव्हते. आम्ही सर्व श्रेष्ठ व्यक्तींची निवड केली आहे. डॉ. टी. टी. कृष्णामचारी तर म्हणतात की, मसुदा समितीच्या सदस्यांपैकी कोणीही डॉ आंबेडकरांना सहकार्य केले नाही. त्यामुळे तो संपूर्ण भार त्यांना एकट्यालाच पेलावा लागला. आणखी संविधान निर्मितीचा इतिहास तपासला असता नाझिरुद्धिन अहमद वगळता संविधान सभेच्या प्रत्येक सदस्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व संविधानाचा गौरवच केल्याचे दिसून येते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात ८५ हजार पुस्तकांचे वाचन  व ३७० देशांच्या राज्य घटनांचा अभ्यास करून ही अतिउत्तम, अप्रतिम कलाकृती, म्हणजेच संविधानाची निर्मिती केली. त्यांच्याबद्दल आज काही लोकांच्या जातीवादी कोत्या मानसिकतेचे बीभत्स दर्शन घडते. ज्यांनी कधी संविधानाला स्पर्श केला नाही. ज्यांना अनुच्छेदाचा मराठीतही अर्थ कळत नाही. तेही संविधान बदलण्याची भाषा बोलतात. याबद्दलचे सर्व धोके स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या २५ नोव्हेंबर १९४९  रोजी केलेल्या पंचावन्न मिनिटांच्या संविधानसभेतील शेवटच्या भाषणामध्ये बोलून दाखवले होते. त्यामध्ये सर्वप्रथम ते संविधान निर्मितीच्या निमित्ताने झालेल्या काहींच्या टीकेला उत्तर देतात. नंतर उत्कृष्टतेबद्दल झालेल्या गौरवासंदर्भात बोलताना म्हणतात की, ‘सविधान चांगले किंवा वाईट सिद्ध  होणे हे सर्वस्वी राबवणार्‍या हातावर अवलंबून असते.’ पुढे ते साम्यवादी व समाजवादी सदस्यांना अपेक्षित विनामोबदला खाजगी संपत्तीचे राष्ट्रीयीकरण व अमर्याद मूलभूत अधिकार का नको, याचे उत्तर देवुन, संविधानामध्ये संशोधनाची प्रक्रिया का गरजेची आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये. त्याच्यावर एवढाही विश्वास ठेवू नये, जेणेकरून तो लोकांच्या संस्था उध्वस्त करेल. कृतज्ञता व्यक्त करण्या संबंधी डॅनियल ओ कॅनॉट या आयरिश देशभक्तांचा दाखला देतात. तो म्हणतो, स्त्रीने शीलाचा, माणसाने स्वाभिमानाचा व राष्ट्राने आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू नये. शेवटी ते इशाराही द्यायला विसरत नाही की, ‘आम्ही लवकरच राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे. अन्यथा देशात विषमतेचे चटके भोगणारे लोक, महत्प्रयासाने उभा केलेला हा लोकशाहीचा डोलारा उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.


आज देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही संदर्भात वर्तवलेली परिस्थिती तंतोतंत उद्भवलेली दिसून येते. विषमतेची दरी मोठ्याप्रमाणात रुंदावत आहे देशातील एक टक्का लोकांकडे देशाची ७१ टक्के संपत्ती संग्रहित झाली आहे. काही व्यक्तींवर अमर्याद विश्‍वास टाकून त्यांना सर्व  अधिकार बहाल केल्यागत भासत आहे. त्यामुळे शेती, उद्योग व खाजगी संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करण्याऐवजी, शासकीय व सार्वजनिक संपत्ती खासगी लोकांच्या घशात घातली जात आहे. शिक्षण, शेती,शेतकरी, कामगार, कष्टकरी, कर्मचारी, विद्यार्थी, मागास घटक यांना देशोधडीला लावणारे संविधान विरोधी कायदे भराभर पास होत आहेत. स्त्रियांवरील  अन्याय अत्याचार वाढत असून, माणसापेक्षा  पशुपक्ष्यांचे महत्व वाढताना दिसत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात सविधान संपून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित होईल. त्यामुळे पुन्हा नवीन गुलामीचे स्वागत करणे भाग पडेल !....

          भीमराव परघरमोल
          मो.९६०४०५६१०४

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
टीआरपी घोटाळा, पार्थो दासगुप्ताने डिलीट केले एक हजार स्क
आंदोलनकर्त्यांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फड
लोकशाहीत अराजकतेला स्थान नाही म्हणणार्‍या आरएसएसने दे
लोकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार
शेतकर्‍यांना भडकवणारा दीप सिद्धू भाजपचा कार्यकर्ता
काही समाजकंटकांनी घुसखोरी केल्याने आंदोलन हिंसक बनले
१ फेब्रुवारीला बजेट सत्रादरम्यान संसदेच्या दिशेने कूच
दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा म्हणणार्‍या की राम मंदिरा
प्रजासत्ताक राज्यात प्रजेची सत्ता आहे का?
कृषी कायदे येण्याआधीच अदानींना कवडीमोल किमतीने गोदामवा
टीआरपी घोटाळ्याचा मुख्य आरोपी अर्णव गोस्वामी
१ फेब्रुवारीला शेतकर्‍यांचा पायी मोर्चा थेट संसदेवर धड
शेतकरी हिताची ग्वाही देणार्‍या राष्ट्रपती कोविंद यांनी
अजेंडा आधारित पत्रकारितेचा अतिरेक
शेतकरी आंदोलनाला हिंसक बनवले शासक वर्गाने?
भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा
बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी प्रधानमंत्र्यां
सीएए-एनआरसीचा उल्लेख टाळत अमित शहांकडून नागरिकांना गों
शेतकर्‍यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper