डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाची ३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना लिहून जगातील संसदीय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले. राज्यघटनेने सर्वांना मुलभूत हक्क,अधिकार दिले. तसेच त्यात कर्तव्य सुद्धा नमूद केले. याबरोबरच डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल देवून सरकारच्या जबाबदार्यांची तरतूद केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाची ३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना लिहून जगातील संसदीय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले. राज्यघटनेने सर्वांना मुलभूत हक्क,अधिकार दिले. तसेच त्यात कर्तव्य सुद्धा नमूद केले. याबरोबरच डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल देवून सरकारच्या जबाबदार्यांची तरतूद केली. राज्यघटनेमुळे सामाजिक व भौगोलिकदृष्ट्या भिन्न असलेल्या देशाला एक केले. भारताच्या प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार दिला. प्रौढ मताचा (२१ वर्षांवरील) प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून जगातील प्रथमच हा नाविन्यपूर्ण प्रयोग केला. त्यांनी भारतात प्रथम अर्थशास्त्राचा पाया रचला. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया रचला. संविधान लिहून बाबासाहेबांनी स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार दिला. स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार दिला. अन्यथा देशातील महिला आजही चूल आणि मुल सांभाळत बसल्या असत्या. स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिले. त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले. हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा दिला. नोकरी करणार्या स्त्रियांसाठी गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद केली. जगात अशी तरतूद करणारे भारत हे पहिले राष्ट्र आहे.
स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच (पुरुषांसारखाच) समान अधिकार मिळवून दिला.पुरुषांना एकपत्नित्व अधिकार दिला व दुसरी पत्नी असेल तर पत्नीला पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार मिळवून दिला. नियोजन आयोगाची स्थापना करुन, पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली. बाबासाहेबांनी एवढेच नव्हे तर भारतात प्रथम जलनिती तयार केली व नद्या जोडणी प्रकल्प आखला पण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे या देशात काही भागात पूरसदृश परिस्थिती व काही भागात पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत आहेत.भाकरा नांगल, दामोदर धरण, सोनाकुंड, हिराकूंड धरण प्रकल्पाचे उदगाते डॉ.बाबासाहेब आंबेडकरच होत. ‘कोसी नदीवर धरण बांधा त्यामुळे बिहारमध्ये कधीच पूर येणार नाही’ हे सुद्धा त्यांनीच सांगितले होतेे. भारतात प्रथम परिवार नियोजनाचा नारा दिला. भारतात बालमजुरीवर रोख लावला. कोलंबीया विद्यापीठात असताना ३ वर्षात २९ अभ्यासक्रम (११ इतिहास, ६ समाजशास्त्र, ५ तत्त्वज्ञान, ४ मानववंशशास्त्र, ३ राजकारणाचे) करणारा पहिला आणि शेवटचा व्यक्ती. म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर होय !
मजुरांना १२ तास काम करावे लागायचे, त्यासाठी ८ तास ड्युटी व आठवड्यातून एक सुट्टी कायदा केला. ८ तासापेक्षा जास्त काम केल्यास, कामाचा मोबदला (ओवरटाईम) प्रावधान लागू केले. ‘खोत बिल’ आणून सावकारी आणि वेठबिगारीचा अंत केला. भारताला उच्च-नीच जातीवादातून मुक्त केले. नाहीतर चर्मकाराच्या मुलांनी चर्मकारी, लोहाराने लोहारकी, सोनाराने सोनारकी, मराठ्याने शेती, ब्राम्हणाने शिक्षण घ्यावे व पुजारी बनावे, असे करावे लागे. पण, बाबासाहेबांच्या योगदानाने आज कोणत्याही जातितील मुले डॉक्टर, इंजीनियर, वकील, आयएएस, आयपीएस मोठे अधिकारी होवू शकतात. याचा विचार बहुजनांनी करावा. देशातील ८० टक्के जनतेला जिला आजपर्यंत क्षुद्र, अस्पृश्य म्हणून सर्व अधिकारांपासून हिणवण्यात आले, अत्याचार सहन करावे लागत होते, त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समान अधिकार मिळवून दिले व मानवमुक्तीचा आदर्श रचला. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान बाबासाहेबांचेच होते. मुंबई हि फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि ती मिळवून देण्यासाठी मी माझ्या अंतापर्यंत लढेन अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती. मजुरमंत्री असतांना विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना त्यांनीच आणली. उर्जानिर्मिती व्यवस्थापनासाठी ‘सेन्ट्रल टेक्निकल पावर बोर्डची स्थापना केली.देशात प्रथमच पाटबंधारे आणि सिंचन आयोगाची स्थापना केली. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी नैसर्गिक संसाधन व कोळसा आयोगाची स्थापना केली. शेती, उद्योग-कारखाने यांच्या विकासासाठी रिकन्स्ट्रक्शन कमिटी कौन्सिलची स्थापना केली. बिहार, मध्यप्रदेशाचे विकास व्हावे यासाठी विभाजन करावे अशी सूचना मांडली. आज ४५ वर्षांनंतर छत्तीसगढ आणि झारखंड राज्य निर्माण झाले.
शिक्षक भारताच्या मणक्याचा कणा आहे त्याला योग्य वेतन द्यावे यासाठी योगदान. स्त्रीभ्रूण हत्या विरोध, गर्भपात करू नये यासाठी जनजागृती केली. देशाला उपराजधानीची गरज आहे हे सांगणारे प्रथम व्यक्ती बाबासाहेब होते. देशात कोळसा ऊर्जेपेक्षा सौर ऊर्जेपासून चालणारे जल विद्युत प्रकल्प उभे करावेत हे सांगणारे प्रथम व्यक्ती जे अजूनही झालेले नाही. ‘मी कायदेमंत्री बनण्यापेक्षा मी कृषिमंत्री होऊन शेतकर्यांना न्याय मिळवून देईन व देशात शेतीचा विकास करून शेतकर्यांचे राज्य प्रस्थापित करेन’ असे विधान करणारे सुद्धा बाबासाहेबच...! बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलाने आत्महत्या केली, त्या वेळेस भविष्यात कोणी आत्महत्या करू नये म्हणून भावपूर्ण लेख लिहून त्याला आदरांजली दिली व कायदा मजबूत केला. तीन लष्कर प्रमुख कधीच एकत्र येवून देशविरोधी कृत्य करून नये हे सांगून तशी मांडणी केली. एकमात्र भारतीय ज्यांना ब्रिटीशांकडून गोलमेज परिषदेला येण्याचे विशेष निमंत्रण दिले जायचे. एकमात्र असे व पहिले भारतीय नेता ज्यांनी स्त्रिया, ओबीसी व एसटी प्रवर्गासाठी असलेले बिल पास न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेब देशातील पहिले उच्चशिक्षित अर्थशास्त्री आहेत. ते एक चांगले वायोलिन वादक, शिल्पकार व चित्रकार सुद्धा होते. त्यांचे एकूण ९ भाषांवर प्रभुत्व होते. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, पारसी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, व पाली. त्यांनी पाली भाषेवर इतके प्रभुत्व मिळविले की पाली व्याकरण व शब्दकोशाची सुद्धा निर्मिती केली.
त्यांनी संसदेत मांडलेली महत्वाची विधेयके : महार वतन बिल, हिंदू कोड बिल, जनप्रतिनिधी बिल, खोत बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, रोजगार विनिमय सेवा, पेंशन बिल, भविष्य निर्वाह निधी (पी एफ) बिल इ. मराठी ही राजभाषा व्हावी यासाठी संसदेत मत मांडले...! पाण्यासाठी आंदोलन करणारे (महाड सत्याग्रह) जगात पहिले व्यक्ती...! लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात जास्त पुस्तके वाचणारे पहिले व शेवटचे व्यक्ती....! लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी.एस.सी. पदवी मिळवणारे प्रथम भारतीय...! लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आठ वर्षांचा अभ्यासक्रम ३ वर्षात करणारे जगातील प्रथम व शेवटचे व्यक्ती, ते सुद्धा भारतीय...! देशात भविष्य निर्वाह निधी कायदा आणून कामगारांच्या हक्काचे संरक्षण केले. देशातील जनतेला वैयक्तिक आयुर्विमा घेण्यासाठी आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यासाठी कार्य केले. देशात इम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची निर्मिती केली व सर्व समाजातील बेरोजगारांना नोकरीचे दरवाजे खुले केले.
अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी एक कुशल पत्रकार म्हणून मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत व जनता पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले. ‘बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापना करून जातींअंताची चळवळ सुरु केली. दुसर्या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. अल्पसंख्यांका विरोधात कॉंग्रेसच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध केला. बहुजनांसाठी मोहनदास गांधी यांच्याशी वैचारिक संघर्ष करून पुणे करार केला. बहुजनांच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी कॉंग्रेस पक्षाशी संघर्ष केला. राज्यघटना बनविण्यापूर्वी, १९३४ साली घटनात्मक दुरुस्ती करता निर्माण करण्यात आलेल्या पार्लमेंटरी कमिटीचे सन्माननीय सदस्य झाले. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धती, विषमता व अन्याय-अत्याचाराला कंटाळून १९३५ साली येवला येथे भरलेल्या परिषदेमध्ये ‘मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी क्रांतीकारी घोषणा केली. हिंदूंसाठी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. UNTOUCHABILITY हा शब्द बाबासाहेबांच्या लिखाणातून इंग्रजी भाषेत घेण्यात आला. भारताचे पहिले कायदेमंत्री होण्याचा बहुमान मिळाला. त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा, ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, दि बॉम्बे म्यूनिसिपल लेबर युनियन, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकोनॉमिक्स ची स्थापना, सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ ची स्थापना, बुद्ध धम्माच्या प्रचार- प्रसारासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना, भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी ‘अशोक चक्र’ असण्याला संसदेत मान्यता मिळवून दिली.भारताला राष्ट्रीय चिन्ह अशोक चिन्ह मिळवून दिले जे बुद्ध धम्मचक्र आहे. बुद्ध धम्माचे प्रतिक निळ्या रंगाला राष्ट्रीय रंग, धम्माचे प्रतिक कमळ फुलाला राष्ट्रीय फुल, बोधिवृक्ष (पिंपळ) राष्ट्रीयवृक्ष राष्ट्रीय प्रतीके मिळवून दिली. ‘सत्यमेव जयते’ सम्राट अशोक कालीन ब्रीदवाक्य भारताचे ब्रीदवाक्य म्हणून पुनरुज्जीवित केले. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष म्हणून त्याच्या सन्मानाच्या निरंतरतेसाठी कायदा बनविला. भारत देशाला तिरंगा व त्याच्या मधोमध अशोकचक्र अशी अनोखी भेट दिली.
त्यांना मिळालेल्या उपाध्या (सन्मान) : भारतरत्न (भारत सरकार), ज्ञानाचे प्रतीक(symbol of knowledge) अमेरीका, द ग्रेटेस्ट मँन इन द वर्ल्ड (कोलंबिया विद्यापीठ), द युनिवर्स मेकर (ऑक्सफर्ड विद्यापीठ), द ग्रेटेस्ट इंडियन (CNN IBN History वृत्त वाहिनी) इ. असे बरेच सन्मान मिळाले. एकमात्र भारतीय ज्यांनी पुस्तकांसाठी एक घर बनवले. विश्वातील एकमात्र व्यक्ती ज्यांच्याकडे ५०,००० पेक्षा जास्त पुस्तके- ग्रंथ संच आहेत. महापुरुष इतिहास घडवतात पण हे असे आहेत की ज्यांनी ५००० वर्षांचा विषमतावादी, रूढी परंपरांनी वेढलेला इतिहास बदलला. पाकिस्तान मध्ये एका भारतीयाची जयंती साजरी होते ती व्यक्ती म्हणजे बाबासाहेब..! बाबासाहेब एक महान अर्थशास्त्री, समाजशास्त्री, विधिज्ञ, राज्यघटनाकार, आधुनिक भारताचे जनक, इतिहासाचे गाढे अभ्यासक व स्वतः घडविणारे सुद्धा, मानववंशशास्त्र अभ्यासक, पाली साहित्याचे महान अभ्यासक, बौद्ध साहित्याचे महान अभ्यासक बोधिसत्व, महान तत्त्ववेत्ते, निष्णात राजकारणी, दीन-बहुजन-महिला-मजूर यांचे उद्धारक, विज्ञानवादी शोधाचे समर्थक, संस्कृत व हिंदू तसेच इतर सर्व प्रचलित धर्मांचे गाढे अभ्यासक होते. बहुजन मुक्तीसाठी धर्मांतर: १९५६ ला नागपूर येथे लाखोच्या समवेत बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. भारतात महान सर्वोत्तम श्रेष्ठ असणार्या बुद्ध धम्माला पुनरुज्जित केले. समाज संरक्षणासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली .वरील सर्व मुद्यांव्यतीरीक्त बरीच मोठी यादी आहे पण, वेळेचे व जागेचे भान ठेवून इतकेच लिहित आहे. आधुनिक भारत देशाचा निर्माता (NATION BUILDER) हे एकच... ! ते म्हणजे विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर !
माया दामोदर
८८८८६७४२६१
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.