×

आपला देश संविधानानुसार चालला आहे का?

Published On :    26 Nov 2020
साझा करें:

खरोखर सर्व भारतीयांना अर्ंतमुख होऊन विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे हा प्रश्‍न जवळपास सर्वांच्याच मनात येणं साहजिक आहे. तमाम देशवासियांनी हा विचार केला पाहिजे. खरे पाहता राज्यकर्त्यांकडून संविधानाची अपेक्षित आणि आवश्यक अशी अंमलबजावणीच होताना दिसत नाही.



खरोखर सर्व भारतीयांना अर्ंतमुख होऊन विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे हा प्रश्‍न जवळपास सर्वांच्याच मनात येणं साहजिक आहे. तमाम देशवासियांनी हा विचार केला पाहिजे. खरे पाहता राज्यकर्त्यांकडून संविधानाची अपेक्षित आणि आवश्यक अशी अंमलबजावणीच होताना दिसत नाही.


तथाकथित स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सव्वादोन वर्षानंतर म्हणजे २६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारत आपल्या स्वत:च्या संविधानाची अंमलबजावणी करून एक प्रजासत्ताक राष्ट्र अशी ओळख घेऊन जगाच्या नकाशावर झळकला असला तरी, हे जगातील सर्वश्रेष्ठ आदर्शवत संविधान स्विकारुन पारीत करण्यात आला तो दिवस होता २६ नोव्हेंबर १९४९. आज सत्तरहुन अधिक वर्षांचा कालावधी लोटला आहे. सभोवताली नजर टाकली असता सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून खर्‍या अर्थाने प्रजेची सत्ता आली का असा प्रश्‍न कुणीही स्वत:ला विचारुन पहावे. यांचे उत्तर नाही असेच मिळेल. राज्यकर्ते आपला घसा खरडून इथल्या लोकशाहीचे कितीही गुणगान गात असले तरी आजपर्यंतच्या जवळजवळ सर्वच सत्ताधार्‍यांनी संविधानाला किनार करून बर्‍याच खेळी केल्या आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मंत्रीपदाची आणि गुप्ततेची शपथ घेताना संविधानप्रती निष्ठा राखण्याची सगळेजणच प्रतिज्ञा करतात पण प्रत्यक्ष कृतीत काय ?


खरं तर भारताने प्रजासत्ताक गणतंत्र पद्धतीचा स्वीकार केलेला असल्यामुळे भारताचा राज्य कारभार विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्म-जाती,रूढी परंपरा आदींचा सन्मान राखत विविधतेमधून एकता टिकवून ठेवणारी जी आदर्शवत राज्यघटना लिहून राष्ट्राला अर्पण केली आहे त्यानुसारच चालायला हवा. आज जगातील सर्वोत्तम राज्यघटनेनुसार देश चालत आहे अशी कितीही हाकाटी राज्यकर्त्यांकडून पिटली जात असली तरी, आज सत्तर वर्षांचा काळ उलटून गेला तरी सामान्य माणसाला साधे मूलभूत गरजाही पुरेशा मिळत नसतील तर राज्यकर्त्यांचा दावा फोल ठरत नाही का? मग भारताच्या जनतेची आणि भारतीय संविधानाची अशी फसवणूक केलेल्या या सर्व राज्यकर्त्यांना आम्ही भारताचे लोक जाब विचारायला नको का ?आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या देशाची एकंदरीत संस्कृती, विशिष्ट वर्गाची अमर्याद सत्ता गाजवून विषमता पसरवून इतरांची पिळवणूक करण्याची अभिलाषा, अनुभव आदींचे धोके ओळखून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सावध आणि दूरदर्शी पणाने आपल्या संविधानात आपल्या देशाचे नाव सरळ सरळ ‘भारत’ आणि इंग्रजीत INDI­A असे स्पष्ट लिहीलेलं असताना आज हिंदू आणि हिंदुत्वाचे उदात्तीकरण करण्यासाठी जाणूनबुजून आपल्या देशातील एका ब्राम्हणवादी विचार सरणीचे पुरस्कर्ते आणि त्यांच्या विचार, सिद्धांतानुसार चालणारे राजकारणी आपल्या देशाचा मूळ गाभा सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्ष राष्ट्र असे असूनही आपल्या देशाचा उल्लेख ‘हिंदुस्थान’ असा करत असतील तर बेकायदेशीरपणे देशाच्या नावाचा चुकीचा उल्लेख करणा-यांना देशद्रोही ठरवून त्यांना शिक्षा केली पाहिजे.


जर अशी व्यक्ती राजकीय असेल तर त्या़ंना राजकारणातून बहिष्कृत केले पाहिजे. या देशातील तमाम अल्पसंख्य, विशेषतः मुस्लीम,जैन, बौद्ध, शीख, पारसी या मूलनिवासी बहुजन समाजाने, अनु.जाती-अनु.जमाती पिडीत मागासवर्गीय, आदिवासी आदींनीही आपल्या देशाचा उल्लेख ‘हिंदुस्थान’ असे करून आपल्याच देशात स्वत:ला परके लेखू नये. इथे राहणारे सर्व हिंदू आहेत म्हणून हे हिंदूंचे स्थान अर्थात हिंदुस्थान असा जावईशोध लावणारे संघ प्रमुख मोहन भागवतांच्या अपप्रचाराला पुष्टी देण्याचे पातक कुणी ही करु नये. कारण आपण सर्व भारतीय संविधानाला प्रमाण मानणारे ‘भारत’ या विशाल खंडप्राय देशाचे विज्ञाननिष्ठ नागरिक आहत. हे सदैव ध्यानी ठेवावे. यापुढे आपल्या ‘भारत’ देशाला हिंदुस्थान म्हणणे हा एक दंडनीय अपराध ठरवला पाहिजे.

विठ्ठलराव वठारे
९३२५४९९०४६

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
टीआरपी घोटाळा, पार्थो दासगुप्ताने डिलीट केले एक हजार स्क
आंदोलनकर्त्यांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फड
लोकशाहीत अराजकतेला स्थान नाही म्हणणार्‍या आरएसएसने दे
लोकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार
शेतकर्‍यांना भडकवणारा दीप सिद्धू भाजपचा कार्यकर्ता
काही समाजकंटकांनी घुसखोरी केल्याने आंदोलन हिंसक बनले
१ फेब्रुवारीला बजेट सत्रादरम्यान संसदेच्या दिशेने कूच
दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा म्हणणार्‍या की राम मंदिरा
प्रजासत्ताक राज्यात प्रजेची सत्ता आहे का?
कृषी कायदे येण्याआधीच अदानींना कवडीमोल किमतीने गोदामवा
टीआरपी घोटाळ्याचा मुख्य आरोपी अर्णव गोस्वामी
१ फेब्रुवारीला शेतकर्‍यांचा पायी मोर्चा थेट संसदेवर धड
शेतकरी हिताची ग्वाही देणार्‍या राष्ट्रपती कोविंद यांनी
अजेंडा आधारित पत्रकारितेचा अतिरेक
शेतकरी आंदोलनाला हिंसक बनवले शासक वर्गाने?
भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा
बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी प्रधानमंत्र्यां
सीएए-एनआरसीचा उल्लेख टाळत अमित शहांकडून नागरिकांना गों
शेतकर्‍यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper