×

संविधान मानणारे जागृत आहेत काय ? (भाग -१)

Published On :    26 Nov 2020
साझा करें:

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जिवंतपणी जेवढा संघर्ष केला नसेल तेवढा संघर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नांवाला आजही देशात करावा लागत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान गौरव दिन भव्य स्वरुपात देशभर साजरा होत असतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जिवंतपणी जेवढा संघर्ष केला नसेल तेवढा संघर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नांवाला आजही देशात करावा लागत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान गौरव दिन भव्य स्वरुपात देशभर साजरा होत असतो. फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा मानणारे आणि जाणणारे लोक, समाज मोठा उत्सव साजरा करणारे आहेत. काही संस्था संघटना एकत्र येऊन भव्य गौरव यात्रा, रॅली काढत असतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेला एक प्रश्न विचारला होता. मुठभर लोकांकडे अमाप धन संपती आहे, तर असंख्य जनता दारिद्ˆयाच्या खोल खाईत जगत आहेत.


२२ मार्चला कोरोना संकट टाळण्यासाठी लॉक डाऊन जाहीर झाला आणि देशात हाहाकार माजला. असंघटीत कष्टकरी कामगार मजूर सैरावैरा मिळेल त्या रस्त्याने गांवाकडे निघाला. २०२० ला संविधान ७१  वर्षाचे होत आहे. पण विषमता कमी होण्या ऐवजी अफाट वाढली आहे हे लॉक डाऊनने दाखवून दिले. लोकशाहीच्या चौकटीत राहून सनदशीर मार्गाने त्याला संपुर्ण देश लबाडी, फसवणूक झाल्याचे मान्य करते. न्यायलयात सुध्दा हीच लबाडी,फसवणूक..! देशाचा राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल मनुस्मृतीनुसार वागत आहेत. राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या व राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या पाया पडतो. कोणत्या नियमानुसार? मनुस्मृती की संविधान? राष्ट्रपती व राज्यपालांनी संविधानातील कलमांचे कदाचित थेट उल्लंघन केले नसेल, पण त्यांनी डॉ.आंबेडकरांना अभिप्रेत संविधानिक नीतिमत्तेचा ( Constitutional Morality ) खून मात्र नक्की केला आहे. महाराष्ट्र राज्यात रात्री राष्ट्रपती राजवट मागे घेतली. अंधारात जमवाजमव केली नि जवळपास अंधारात सरकारला शपथ दिली. ज्याची महाराष्ट्राच्या जनतेला जराही कल्पना नव्हती. हे सगळं राज्यपालांनी केले. हा सरळ सरळ संविधानिक नीतिमत्तेचा खून राज्यपालांनी केला. ज्या संविधानाचे गोडवे आम्ही गातो त्याची दररोज एक एक पान नष्ट करण्याचे काम आरएसएस प्रणित केंद्र व राज्ये सरकारे करीत आहेत. संविधान मानणारे त्यावर टीका टिपणी करीत आहेत. त्यामुळे संविधान मानणारे खरेचं जागृत आहेत काय हा प्रश्न निर्माण होतो. संविधान न मानणार्‍यानी साम, दम, भेद, नीती वापरून निवडणुका जिंकल्या. ज्या बहुजनाची संख्या ८५ टक्के आहे. ते मात्र कुठेच संविधानानुसार वागत नाही.त्यातील व्यक्तिगत मतभेद, स्वार्थ कमी होतांना दिसत नाही. सर्व शिक्षण, जुगाड जमावण्याची कला, तडजोड करण्याचे विशेष कला, कौशल्य असतांना बहुजन समाजातील लोक स्वतःला वंचित समजतात.म्हणजेच ८५ टक्के माणसांचा सांगाडा व संविधानाचा सांगाडा दिसत आहे. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘माझ्या मतानुसार लोकशाही यशस्वी होण्यासाठी ‘संविधानिक नीतितत्त्वां’ चे पालन करणे ही चौथी शर्थ आहे. आपल्या संविधानात ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या संविधानाचा एक सांगाडा मात्र आहेत हे आपण विसरूनच जातो. संविधानिक नीतीतत्वांमुळेच संविधानाला जिवंतपणा प्राप्त झालेला आहे. हाच लोकशाहीचा गाभा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे भाषण -  संसदीय लोकशाही यशस्वी करण्यासाठीच्या आवश्यक शर्ती  २२ डिसेंबर १९५२ , पुणे जिल्हा न्यायालय,पुणे.


सकल मराठा क्रांती मोर्चा, एक मराठा लाख मराठा. कोपर्डी बलात्कार करणार्‍यांना जाहीर फाशी द्या!. याघटनेला राष्ट्रीय मुद्धा बनवून मराठा समाज आरक्षणासाठी लाखो लोकांचा मोर्चा प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरून मुकसंघ शक्ती दाखवित होते. त्यांचा परिणाम राज्य व केंद्र सरकारवर काडीचाही झाला नाही असे आम्ही समजत होतो. पण इतर सर्व समाजासमोर आव्हान निर्माण झाले. सर्व समाजातील सुशिक्षित,अशिक्षित अज्ञानी,अडाणी लोकांसमोर मात्र हे का होऊ शकत नाही. हा मोठा प्रश्न पडला आहे. यामागे कोणती प्रचंड शक्ती आहे की जे लाखो करोडो लोकांनी मोर्चे काढल्यावर न घाबरता, दखल पण घेत नाही. तर ते आहे या देशाचे संविधान! ज्यांना संविधान मान्य नाही ते ही मोर्चे काढतात. ज्यांना संविधान माहित आहे ते पण मोर्चे काढत आहेत. तेच संविधान किती वर्षाचे झाले हे माहित नाही. ज्यांनी कधीच संविधान वाचले नाही, त्यानुसार कधी आचरण केले नाही.ते लोक ही संविधान समर्थन मोर्चे काढत आहेत. काही हुकूमशहा संविधाना नुसार पाचशे, हजारच्या नोट बंद करण्याचे धाडस देशात प्रथमच केल्याचे सांगत आहेत. त्यांना ही संविधान किती वर्षाचे झाले हेच त्यांना माहित नाही, असे म्हणल्यास चूक ठरणार नाही.


एखाद्या घरात बाळाचा जन्म झाला की सर्वांनाच खूप आनंद होतो मग दररोज त्याचे गोडगोड कौतुक होते, घरातील मोठी माणसं त्याला आईबाबा,काका, मामा, आबा-आजी,नाना-नानी असे शिकवितात. मग ते बाळ दिवसा दिवसाने मोठे होते आणि शिकते. त्यावर आपल्या धर्माचे संस्कार होतात. शाळेत गेल्यावर त्याला भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत, सर्वांशी मी बंधुभावाने वागेल असे शिकविले जाते. शाळेतून बाहेर पडल्यावर त्याला देशातील जाती धर्म त्याचे रिती-रिवाज याचे ही शिक्षण आपोआप मिळते. तोच मग भारताचा जबाबदार नागरिक होतो. हाच इतिहास भारतीय संविधान बनविताना बाबासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवला होता. संविधान लिहताना त्यांनी अनुभवलेले सर्व दररोजचे अपमानास्पद,तिरस्काराचे जीवन पाहिले होते. म्हणुन त्यांनी पिण्याचे पाणी,चूल पेटविण्यासाठी लागणारे सरपण, शिक्षण घेताना वर्गातील वागणूक याचा सर्व सविस्तर आढावा भारतीय संविधानात लिहून बाबासाहेबानी भारतीय नागरिकांना दिला आहे. घटनाकारांनी संविधानात कोणत्याही जातीला, धर्माला, प्रांताला,प्राधान्य दिले नाही. कोणाचाही राग मनात ठेऊन संविधानात येऊ दिला नाही. पण भारतीय नागरिकांनी सत्तर वर्षात हे संविधान वाचले नाही. भारतीय नागरिकांनी सोडा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणार्‍या त्यांच्या अनुयायांनी तरी वाचले असेल असे वाटत नाही. जर वाचले असते तर आज तो समाज जेवढा विभागला गेला आहे तेवढा विभागला गेला नसता.२६ नोव्हेंबर १९४९ जन्मलेले ते संविधान बाळ आज ७१ वर्षाचे झाले. त्याची सर्व ठिकाणी योग्य तो मानसन्मान देऊन त्याची पूजा अर्चा झाली पाहिजे म्हणून राज्यांना केंद्र सरकारला आदेश काढावा लागला. त्याचा किती परिणाम भारतीय नागरिकावर होतो. लाखो करोडो लोकांचे मोर्चे पाहिल्यावर जाणवते.
भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० साली अंमलात आलेले असली तरी भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of १९३५) वर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश प्रधानमंत्री क्लेमेंट अटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापने विषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढयातील  नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी स्वरुपात काम केले होते.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २५ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान समितीची स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून फक्त कागदावर साजरा केला जातो. संविधान दिनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि भारतीय संविधान ठेवून त्यांची शाळा कॉलेज, शासकीय, प्रशासकीय कार्यालयात गेल्या ५८ वर्ष म्हणजे २००८ पर्यत साजरा केला जात नव्हता.२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन,२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्ट तथाकथित स्वतंत्र दिन हे फक्त सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा घालण्यासाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा दिवस असी ८५ टक्के भारतीयांच्या मनावर बिंबवण्याचे काम वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारी अलिखित यंत्रणा काम करते. हा धोका डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच ओळखला होता. म्हणूनच बाबासाहेबांनी संविधान सभेतील शेवटचे भाषणात ठामपणे सांगितले होते. भारत हा विषमतावादी मनुस्मृतीचे समर्थन करणार्‍या लोकांचा देश होता. तो सहजासहजी भारतीय संविधान स्वीकारणारा नाही.माझ्या मते,संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्या शिवाय राहणार नाहीत. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग, जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे.राजकीय नेतेच जर मनुस्मृती समर्थक असतील तर ते राज्यघटना, संविधानाची अंमलबजावणी होऊ देणार नाहीत. भारतात केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल, असे आत्मविश्‍वासाने बाबासाहेबनी शेवटच्या भाषणात सांगितले होते.


बाबासाहेब पुढे असे सांगतात दुसरी महत्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणार्‍या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्‍वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील. संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही. इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो, किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये.

सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
टीआरपी घोटाळा, पार्थो दासगुप्ताने डिलीट केले एक हजार स्क
आंदोलनकर्त्यांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फड
लोकशाहीत अराजकतेला स्थान नाही म्हणणार्‍या आरएसएसने दे
लोकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार
शेतकर्‍यांना भडकवणारा दीप सिद्धू भाजपचा कार्यकर्ता
काही समाजकंटकांनी घुसखोरी केल्याने आंदोलन हिंसक बनले
१ फेब्रुवारीला बजेट सत्रादरम्यान संसदेच्या दिशेने कूच
दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा म्हणणार्‍या की राम मंदिरा
प्रजासत्ताक राज्यात प्रजेची सत्ता आहे का?
कृषी कायदे येण्याआधीच अदानींना कवडीमोल किमतीने गोदामवा
टीआरपी घोटाळ्याचा मुख्य आरोपी अर्णव गोस्वामी
१ फेब्रुवारीला शेतकर्‍यांचा पायी मोर्चा थेट संसदेवर धड
शेतकरी हिताची ग्वाही देणार्‍या राष्ट्रपती कोविंद यांनी
अजेंडा आधारित पत्रकारितेचा अतिरेक
शेतकरी आंदोलनाला हिंसक बनवले शासक वर्गाने?
भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा
बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी प्रधानमंत्र्यां
सीएए-एनआरसीचा उल्लेख टाळत अमित शहांकडून नागरिकांना गों
शेतकर्‍यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper