×

कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचा आसूड कडाडला!

Published On :    26 Nov 2020
साझा करें:

हरयाणा बॉर्डरवर पोलीस-शेतकर्‍यांमध्ये धुमश्‍चक्री



नवी दिल्ली: कृषी कायद्यांच्या विरोधासह इतर मागण्यांसाठी पंजाब-हरयाणातील शेतकर्‍यांचा आसूड कडाडला असून केंद्र सरकारच्या निषेधार्थ महामोर्चा काढला आहे. दिल्लीकडे निघालेल्या या मोर्चाला हरयाणामध्ये अंबाला-पटियाला बोर्डवर अडवण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस आणि शेतकर्‍यांमध्ये प्रचंड धुमश्‍चक्री उडाली आहे. सीमेवरच अडवल्यामुळे संतप्त मोर्चकर्‍यांनी पोलिसांच्या दिशेने कूच करत बॅरिकेड्स फेकून दिल्या. त्यामुळे शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे अंबाला-पटियाला सीमेवर प्रचंड तणावाचे वातावरण आहे.


कृषी कायदा रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी पंजाब-हरयाणातील शेतकर्‍यांनी हल्लाबोल मोर्चा काढला आहे. शेतकर्‍यांचा हा मोर्चा दिल्लीत येणार असल्याने दिल्लीच्या सर्व सीमांवर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला असून शेतकर्‍यांना सीमेवरच अडवले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा संताप अनावर झाला आहे. दिल्लीच्या दिशेने निघालेल्या या शेतकर्‍यांच्या मोर्चाला पोलिसांनी अंबाला-पटियाला सीमेवर अडवून धरले. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी बॅरिकेड्स तोडून दिल्लीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. संतप्त शेतकर्‍यांनी या बॅरिकेड्स बाजूच्याच नदीत फेकून दिल्या. त्यामुळे मोर्चेकर्‍यांवर वॉटर टँकरद्वारे पाणी फेकत पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. मात्र, तरीही शेतकरी ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी आरएएफच्या पथकाला सीमेवर पाचारण केलं असून या पथकाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना पांगवण्याचा प्रयत्न केला जात आहे.


शेतकर्‍यांच्या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर हरयाणाच्या पलवल बॉर्डवरही १५०० पोलीस तैनात करण्यात आले आहे. पोलिसांसह महिला पोलीसही यावेळी तैनात आहेत. पलवल येथून बल्लभगड, फरिदाबादहून दिल्लीकडे जाणार्‍या प्रत्येक कारची तपासणी केली जात आहे. पंजाब आणि हरियाणातून येणार्‍या या शेतकर्‍यांच्या मोर्चावर दिल्ली-हरयाणा बॉर्डरवर सुरक्षा दलाचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत. तसेच या मोर्चेकर्‍यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. तर हरयाणात करनाल येथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्ना केला आहे.


शेतकर्‍यांचा ठिय्या, हायवे बंद

शेतकर्‍यांचा आसूड कडाडल्याने केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच पोलिसांचा हा महामोर्चा दिल्लीत धडकू नये म्हणून त्यांना सीमेवरच अडकवून ठेवले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनीही सीमेवरील हायवेवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. दिल्लीहून जम्मूकडे जाणार्‍या महामार्गाला करनाल येथे बंद करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. शेतकर्‍यांचा मोर्चा आणि कोरोनाची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर आज दुपारी दोन वाजेपर्यंत दिल्ली ते गुरुग्राम आणि नोएडापर्यंत मेट्रो सर्व्हिस बंद राहणार आहे. या शिवाय काही मार्गांवरही मेट्रो बंद करण्यात आली आहे.


राष्ट्रपतींनी दिली होती विधेयकाला मंजुरी

दरम्यानन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषीविषयक तीन विधेयकांना मंजुरी दिली होती. राष्ट्रपतींनी विधेयकांना मंजुरी दिल्याने त्यांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकांना राष्ट्रपतींनी २४ सप्टेंबरला मंजुरी दिल्याचे राजपत्रात म्हटले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी ३ विधेयके मंजूर केली गेली होती. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक अशी तीन विधेयके केंद्राने लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करुन घेतली होती. या विधेयकांना मंजुरी देऊ नये अशी विनंती शेतकर्‍यांनी राष्ट्रपतींना केली होती.

पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, या राज्यांतील शेतकर्‍यांसह देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी कृषी विधेयंका विरुद्ध आंदोलन पुकराले होते. २५ सप्टेंबरला शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीने देशव्यापी आंदोलन पुकारले होते. कृषी विधेयकांमुळे बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली होती.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
टीआरपी घोटाळा, पार्थो दासगुप्ताने डिलीट केले एक हजार स्क
आंदोलनकर्त्यांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फड
लोकशाहीत अराजकतेला स्थान नाही म्हणणार्‍या आरएसएसने दे
लोकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार
शेतकर्‍यांना भडकवणारा दीप सिद्धू भाजपचा कार्यकर्ता
काही समाजकंटकांनी घुसखोरी केल्याने आंदोलन हिंसक बनले
१ फेब्रुवारीला बजेट सत्रादरम्यान संसदेच्या दिशेने कूच
दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा म्हणणार्‍या की राम मंदिरा
प्रजासत्ताक राज्यात प्रजेची सत्ता आहे का?
कृषी कायदे येण्याआधीच अदानींना कवडीमोल किमतीने गोदामवा
टीआरपी घोटाळ्याचा मुख्य आरोपी अर्णव गोस्वामी
१ फेब्रुवारीला शेतकर्‍यांचा पायी मोर्चा थेट संसदेवर धड
शेतकरी हिताची ग्वाही देणार्‍या राष्ट्रपती कोविंद यांनी
अजेंडा आधारित पत्रकारितेचा अतिरेक
शेतकरी आंदोलनाला हिंसक बनवले शासक वर्गाने?
भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा
बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी प्रधानमंत्र्यां
सीएए-एनआरसीचा उल्लेख टाळत अमित शहांकडून नागरिकांना गों
शेतकर्‍यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper