×

शेतकरी आंदोलनाला ब्रिटन, कॅनडाच्या खासदारांचे खुले समर्थन

Published On :    2 Dec 2020
साझा करें:

आंतरराष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाला समर्थन मिळाल्याने केंद्र सरकारला झटका



नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात पंजाब व हरियाणातील शेतकरी करत असलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय प्रतिसाद मिळाला आहे.  ब्रिटन आणि कॅनडाच्या खासदारांनी या आंदोलनाला खुले समर्थन केले आहे. त्यामुळे केंद्रातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारला चांगलाच झटका बसला आहे.


केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरू आहे. पंजाबमध्ये दोन महिन्यांपासून निदर्शने झाल्यानंतर शेतकरी दिल्लीला पोहचले. सरकारने किमान आधारभूत किंमतीबाबत (एमएसपी) ठाम वचन दिले पाहिजे आणि त्याचा कायद्यात समावेश करावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. बाजारातून बाहेर पडताच एमएसपीवर परिणाम होईल आणि हळूहळू शेती संपेल अशी भीती शेतकरी संघटनांना आहे. पंजाबमधील शेतकर्‍यांबरोबरच इतर राज्यांतील शेतकरीही या आंदोलनात सामील होत आहेत. या आंदोलनला ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकेतील बर्‍याच खासदारांचा पाठिंबा मिळत आहे.


ब्रिटनच्या लेबर पार्टीचे खासदार आणि रेल्वेमंत्री तनमनजीत सिंह यांनी ट्विट केले की, हे अतिशय भिन्न प्रकारचे लोक आहेत जे आपल्यावर अत्याचार करत आहेत त्यांनाही खायला घालत आहेतत. मी पंजाब आणि भारतातील इतर राज्यांतील शेतकरी, माझे मित्र आणि कुटुंबियांसमवेत शेतकर्‍यांसोबत आहोत. शेतकरी बिलाच्या आडून खासगीकरणाला विरोध करीत आहोत.


लेबर पार्टीचे खासदार जॉन मॅकडोनलने तनमनजीत सिंह यांना पाठिंबा दर्शविला आणि लिहिले आहे की, शांततेत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांविषयी अत्याचारी वृत्ती अस्वीकार्य आहे. परिणामी भारताची प्रतिमा डागाळली आहे. लेबर पार्टीच्या आणखी एक खासदार प्रीत कौर गिल यांनी ट्विट केले असून दिल्लीत धक्कादायक दृश्ये आहेत. वादग्रस्त विधेयकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पाण्याचा फवारा आणि अश्रूधुराचा वापर केला जात आहे. वादग्रस्त कायद्याच्या विरोधात शेतकर्‍यांशी वागण्याची ही पद्धत योग्य नाही.



कॅनडामध्येही भारताच्या नवीन कृषी कायद्याची चर्चा आहे. कॅनडामध्ये जगमित सिंह यांच्या नेतृत्वात न्यू डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख जगमीत सिंह यांनी ट्विट केले की, शांततेत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर भारत सरकारकडून हिंसाचार केला जात आहे. मी पंजाब आणि भारतातील शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा आहे. मी भारत सरकारला हिंसेऐवजी शांततेत वाटाघाटीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करतो. सेंट जॉन ईस्टचे खासदार जॅक हॅरिस यांनीही भारताच्या नवीन कृषी कायद्याविषयी ट्विट केले आहे. 


रोजीरोटीचे संकट असताना भारत सरकार शेतकर्‍यांवर जे अत्याचार करत आहे हे पाहून आम्हाला आश्‍चर्य वाटले. पाण्याचा फवारा आणि अश्रुधूराचा मारा करण्याऐवजी भारत सरकारने शेतकर्‍यांशी थेट संवाद साधला पाहिजे. ओंटारियोमधील विरोधी पक्षनेते एन्ड्र्यू हॉरवात यांनी  ट्विट केले की, भारतात शांततेत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांसह आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आपण उभे आहेत. सरकार समर्थित हिंसाचाराची भीती न बाळगता प्रत्येकाला हक्क व अधिकारासाठी स्वातंत्र्य असले पाहिजे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
पुन्हा एकदा ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर येण्याचा एनडीए
दीड वर्षे स्थगिती नको, कृषी कायदे रद्दच करा
सिव्हिल सर्जनसह ६ जण निलंबित
फेसबुक डाटा चोरी : ‘केम्ब्रिज ऍनालिटिका’ विरोधात सीबीआय
देशाच्या सुरक्षेविषयीची गुप्त माहिती देणारा कसा काय पत
१ टक्का व्यक्तींकडे देशाची ७३ टक्के संपत्ती
टाइम्स नाऊ व रिपब्लिक वृत्तवाहिन्यांना उच्च न्यायालयान
बळाचा वापर केल्यास २६ जानेवारीला त्सुनामी येईल
अर्णव गोस्वामींच्या विरोधात भाजपचे ‘तांडव’ कधी?
शेतकरी आंदोलनाचा धसका
‘जय श्रीराम’चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड
मराठा आरक्षणाबाबत गोंधळात गोंधळ
आतापर्यंत १०० हून अधिक शेतकर्‍यांच्या सरकारकडून हत्या
बंजारा समाजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणार्‍या लेखक भालचं
प्रबोधनकार ठाकरे भट-भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुना
थकबाकी न भरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणार
मोदी व योगी यांच्याविरोधात पोस्ट, कायद्याच्या विद्यार्
इतके दिवस शेतकर्‍यांचे आंदोलन समाजासाठी चांगले नाही
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आंदोलनाचा मुद
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper