×

भारतात विकल्या जाणार्‍या भेसळयुक्त मधाने लोकांच्या जीवाशी खेळ

Published On :    3 Dec 2020
साझा करें:

डाबर, पतंजली, बैद्यनाथ, झंडूच्या मधात मोठ्या प्रमाणात साखरेची भेसळ, सीएसई तपासणीत २२ पैकी फक्त ५ ब्रँड पास



नवी दिल्ली:  देशातील अनेक बड्या कंपन्या ग्राहकांना भेसळयुक्त मध विकत आहेत. विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) नुकत्याच केलेल्या चौकशीत हे उघड झाले आहे. बहुतेक ब्रांड्स त्यांच्या मधात साखर भेसळ करतात. सीएसईने १३ मोठ्या ब्रॅण्डचे मध तपासले आहेत. या कंपन्यांमध्ये मधात ७७ टक्के भेसळ आढळली. मधातील एकूण २२ नमुने तपासण्यात आले. त्यातील केवळ पाचच तपासात पास झाले. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा डाव आखण्यात आला आहे.


डाबर, पतंजली, बैद्यनाथ, झंदू, हितकारी आणि एपीएस हिमालय यासारख्या कंपन्यांमधील मध न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनान्स (एनएमआर) चाचणीत शुद्धता मोजण्यात अयशस्वी ठरली. मात्र डाबर आणि पतंजली यांनी या तपासणीवर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहेत. या दोन्ही कंपन्यांचे म्हणणे आहे की या तपासणीचा हेतू आमच्या ब्रँडची प्रतिमा खराब करणे आणि ते प्रायोजित असल्याचे दिसते. आम्ही भारतात नैसर्गिकरित्या मिळविलेले मध गोळा करतो आणि विकतो.


कंपन्यांनी असे म्हटले आहे की त्यांनी त्यांच्या मधातील खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएएआय) च्या नियमांचे आणि मानकांची पूर्ण काळजी घेतली आहे. डाबरच्या प्रवक्त्याने सांगितले की आमचे मध १०० टक्के शुद्ध आहे आणि ते जर्मनीमध्ये एनएमआर चाचणीत उत्तीर्ण झाले. आम्ही एफएसएसएसएआयच्या २२ मानके पूर्ण करतो. नुकतेच समोर आलेले अहवाल प्रायोजित असल्यासारखे दिसत आहे. त्याच वेळी पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण म्हणाले, आम्ही १०० टक्के नैसर्गिक मध बनवतो. भारतातील नैसर्गिक मध बनवण्याच्या उद्योगाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. त्याचबरोबर झंडू ब्रँडची मालकी असणारी इमामी कंपनीचे म्हणणे आहे की आम्ही एफएसएसएआयच्या सर्व मानकांचे पालन करते.


एफएसएसएआयने गेल्या वर्षी आयातदार आणि राज्य अन्न आयुक्तांना सांगितले होते की देशात गोल्डन सिरप, इनवर्ट शुगर सिरप आणि राईस सिरप भेसळीसाठी वापरले जात आहे.  चिनमधील कंपन्या फ्रुक्टोजच्या रूपात ही सिरप पाठवतात.


सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी म्हटले आहे की, २००३ आणि २००६ च्या तपासणी दरम्यान शीतपेयांमध्ये भेसळ सापडली. त्यामध्येही मधात साखरेचे भेसळ मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते.  ही भेसळ आपल्या आरोग्यास यापुढे हानी पोचवणार आहे. ते म्हणाले की, १३ मोठ्या ब्रँडची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी १० एनएमआर चाचणीत अयशस्वी झाले. यापैकी १० मधील ३  भारतीय मानकांच्या अनुरूप नव्हते. एनएमआर चाचणी १ ऑगस्टपासून भारतातून निर्यात करण्यात येणार्‍या मधासाठी अनिवार्य करण्यात आली होती, तर टीएमआर चाचणी ऑक्टोबर २०१९ मध्येच गुणवत्ता मापदंडावरून काढून टाकण्यात आली होती.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
पुन्हा एकदा ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर येण्याचा एनडीए
दीड वर्षे स्थगिती नको, कृषी कायदे रद्दच करा
सिव्हिल सर्जनसह ६ जण निलंबित
फेसबुक डाटा चोरी : ‘केम्ब्रिज ऍनालिटिका’ विरोधात सीबीआय
देशाच्या सुरक्षेविषयीची गुप्त माहिती देणारा कसा काय पत
आउटर रिंग रोडवरच शेतकर्‍यांची ट्रॅक्टर रॅली
एसईबीसी वगळून इतर निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरका
१ टक्का व्यक्तींकडे देशाची ७३ टक्के संपत्ती
टाइम्स नाऊ व रिपब्लिक वृत्तवाहिन्यांना उच्च न्यायालयान
बळाचा वापर केल्यास २६ जानेवारीला त्सुनामी येईल
अर्णव गोस्वामींच्या विरोधात भाजपचे ‘तांडव’ कधी?
शेतकरी आंदोलनाचा धसका
‘जय श्रीराम’चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड
मराठा आरक्षणाबाबत गोंधळात गोंधळ
आतापर्यंत १०० हून अधिक शेतकर्‍यांच्या सरकारकडून हत्या
बंजारा समाजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणार्‍या लेखक भालचं
प्रबोधनकार ठाकरे भट-भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुना
थकबाकी न भरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणार
मोदी व योगी यांच्याविरोधात पोस्ट, कायद्याच्या विद्यार्
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper