×

शेतकर्‍यांनी सरकारला गाठले खिंडीत

Published On :    3 Dec 2020
साझा करें:

डिझेलचे अर्धे दर करा, कृषी कायदे मागे घ्या अशा प्रकारच्या टाकल्या अटी



नवी दिल्ली: डिझेलचे अर्थे दर करा, कृषी कायदे मागे घ्या अशाप्रकारच्या शेतकर्‍यांनी अटी ठेवत केंद्र सरकारला खिंडीत गाठले आहे. शेतकर्‍यांच्या या आंदोलनापुढे सरकारला काय करावे असे सुचेनासे झाले आहे. कारण शेतकरी मागे हटायला तयार नाही.


दरम्यान, कृषी कायदे रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शेतकरी संघटनांनी बुधवारी केली. आंदोलन देशव्यापी आणि आणखी तीव्र करण्याचा इशाराही संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिल्ली-हरयाणाच्या सिंघू सीमेवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, गुरूवारी शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चा पार पडली. यावेळी शेतकर्‍यांकडून लिखित स्वरूपात आपल्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. तसंच यावर सरकारकडूनही लिखित आश्वासन त्यांनी मागितलं आहे.


तिन्ही कृषी कायदे त्वरित मागे घेण्यात यावेत,  शेतकर्‍यांसाठी एमएसपीला कायदेशीर मान्यता देण्यात यावी, एमएसपी लागू करण्यासाठी स्वामीनाथन फॉर्म्युला लागू करण्यात यावा, एनसीआर विभागात वायू प्रदुषण कायद्यातील बदल मागे घेण्यात यावे, शेतीसाठी लागणार्‍या डिझेलच्या दरात ५० टक्क्यांची कपात करण्यात यावी, देशभरात शेतकरी नेते, कवी, वकिल आणि अन्य कार्यकर्त्यांवर जे खटले आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.


आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये तीन टप्प्यात चर्चा झाली आहे. यापूर्वी १ डिसेंबर रोजी शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा झाली होती. परंतु त्यातून कोणताही तोडगा निघाला नव्हता. आता शेतकर्‍यांनी सरकारकडे लिखित स्वरूपात मागण्या मान्य करण्यास सांगितले आहे. तसंच आजच्या बैठकीतून तोडगा न निघाल्यास आंदोलन अजून आक्रमक होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
पुन्हा एकदा ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर येण्याचा एनडीए
दीड वर्षे स्थगिती नको, कृषी कायदे रद्दच करा
सिव्हिल सर्जनसह ६ जण निलंबित
फेसबुक डाटा चोरी : ‘केम्ब्रिज ऍनालिटिका’ विरोधात सीबीआय
देशाच्या सुरक्षेविषयीची गुप्त माहिती देणारा कसा काय पत
१ टक्का व्यक्तींकडे देशाची ७३ टक्के संपत्ती
टाइम्स नाऊ व रिपब्लिक वृत्तवाहिन्यांना उच्च न्यायालयान
बळाचा वापर केल्यास २६ जानेवारीला त्सुनामी येईल
अर्णव गोस्वामींच्या विरोधात भाजपचे ‘तांडव’ कधी?
शेतकरी आंदोलनाचा धसका
‘जय श्रीराम’चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड
मराठा आरक्षणाबाबत गोंधळात गोंधळ
आतापर्यंत १०० हून अधिक शेतकर्‍यांच्या सरकारकडून हत्या
बंजारा समाजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणार्‍या लेखक भालचं
प्रबोधनकार ठाकरे भट-भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुना
थकबाकी न भरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणार
मोदी व योगी यांच्याविरोधात पोस्ट, कायद्याच्या विद्यार्
इतके दिवस शेतकर्‍यांचे आंदोलन समाजासाठी चांगले नाही
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आंदोलनाचा मुद
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper