×

सिंधू सीमेवर कृषी कायद्यांच्या प्रतींची होळी

Published On :    14 Jan 2021
साझा करें:

कायदे मागे घेण्याची मागणीवर कायम, आंदोलकांची संख्या दुपटीवर करण्यासाठी रणनीती



नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली असली तरी, शेतकरी समाधानी नाहीत. बुधवारी सिंधू सीमेवर तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रतींची होळी करण्यात आली. शेतकर्‍यांनी भाजपा सरकारचा निषेध करीत, कायदे मागे घ्या आणि एमएसपी कायदा लागू करा, अशी घोषणाबाजी केली. त्याचबरोबर या आंदोलनातील सहभागींची संख्या येत्या २६ जानेवारीपर्यंत दुपटीने वाढविण्याची रणनीती आखण्यात आली आहे.


बुधवार हा आंदोलनाचा ४९ वा दिवस होता. यादरम्यान जवळपास ६० शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे.सर्वोच्च न्यायालाने या आंदोलनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, केंद्र सरकारवर दोषारोप केले असले तरी, न्यायालयाने दिलेला निर्णय हा केवळ आंदोलन संपविण्यासाठी आहे, तो शेतकर्‍यांच्या हिताचा नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी नेत्यांची झाली आहे. शेतकर्‍यांना कायद्यांची तात्पुरती स्थगिती नको असल्याने हे आंदोलन कायम राहणार आहे. 


उलट या आंदोलनातील सहभागींची संख्या येत्या २६ जानेवारीपर्यंत दुपटीने वाढविण्याचे नियोजन शेतकर्‍यांनी केले आहे. न्यायालयाने हस्तक्षेप केला असला तरीही मागे हटायचे नाही, अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चाने घेतली आहे. गणतंत्रदिनी राजपथवर परेड करण्याआधीच घोषित केल्यानुसार शेतकर्‍यांनी तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या सीमेवर दररोज तालीम सुरू आहे. राजपथावर घोडेस्वारी करण्यासाठी एक तरुण शेतकरी सुशीलकुमार हा पंजाबच्या लखेलीवाली डाल इथून गाझीपूर सीमेवर पोहोचला आहे

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘ट्रॅक्टर परेड’साठी शेतकर्‍यांनी कसली कंबर
गडचिंचले हत्याकांडप्रकरणी आणखी ८९ जणांना जामीन
...तर दिल्लीपेक्षा मोठा भडका महाराष्ट्रात उडेल
महावितरणने कापली वीज; विद्यार्थी अंधारात
पीएम केअर फंडाचा हिशोब द्या
आमदनी अठन्नी, खर्चा रूपय्या हे धोरण घातक
कोव्हॅक्सिन चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्ती
दिल्लीतील ५१ लोकांवर लसीचा प्रतिकूल परिणाम, एक गंभीर
सीबीआय अधिकारी तडजोडीसाठी आरोपी कंपन्यांकडून घेतात लाच
बेळगावमध्ये अमित शहा गो बॅकचे नारे
शेतकर्‍यांच्या पाठिंब्यासाठी मुंबईत मोर्चा
राज्य मानवी हक्क आयोगच न्यायाच्या प्रतिक्षेत
दुष्परिणाम झाल्यास नुकसान भरपाईबाबतही संभ्रम
रुग्णालयातील सुविधांसाठी निधी देण्याऐवजी भंडारा अग्नि
‘एमआयएम’ पात्र हे मुसलमानांचे तारणहार नसून भाजपचे अंगव
मुंबईत राजभवनावर संयुक्त शेतकरी कामगारांचा निघणार मोर्
शेतकर्‍यांनी केंद्र सरकारला आणले जेरीस
राहुल गांधींनी मगरीचे अश्रू वाहू नये, इंदिरा गांधींही पं
राजधानी दिल्लीत २ लाखांहून अधिक मुले शिक्षणापासून वंचि
संघिष्ट कोश्यारी यांच्या तोंडातून संस्कृत भाषा संशोधना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper