×

पुन्हा एकदा ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर येण्याचा एनडीएचा मनसुबा

Published On :    22 Jan 2021
साझा करें:

इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्व्हेने लोकांच्या डोळ्यात धुळफेक



नवी दिल्ली: देशात महागाई, बेरोजगारी, उपासमारी, कामगार व शेतकर्‍यांच्या समस्या, अर्थव्यवस्था रसातळाला गेलीय, ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला विरोध, आरक्षणाला विरोध अशा सार्‍या समस्या सरकारच्याविरोधात असतानाही पुन्हा एकदा एनडीए सत्तेवर येणार अशाप्रकारचा सरकारधार्जिणा सर्व्हे करून इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनने लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून पुन्हा एकदा ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर येण्याचा मनसुबा एनडीएनचा असल्याचे दिसून येत आहे अशा प्रतिक्रिया लोक व्यत करताना दिसत आहेत.


कोरोना काळात करण्यात आलेल्या उपाययोजना आणि अन्य मुद्दे योग्यरित्या हाताळणार्‍या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जादू आजही कायम आहे. आता जादू काय आहे हे इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनला माहित नाही का? ही एकमेव जादू म्हणजे ईव्हीएमचा घोटाळा.  जर आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएनला बहुमत मिळण्याची शक्यता सर्व्हेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. ईव्हीएम घोटाळा करून सहज सत्ता हस्तगत करता येणार आहे हे सांगायाला सर्व्हेचीसुध्दा गरज नाही.  ३ जानेवारी ते १३ जानेवारी २०२१ दरम्यान १२ हजार २३२ जणांदरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ६७ टक्के लोकं ग्रामीण तर ३३ टक्के लोकं शहरी भागातील होती.


आता निवडणुका पार पडल्यास लोकसभेच्या ५४३ जागांपैकी प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४३ टक्के मतांसह ३२१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर केवळ भाजपाला ३७ टक्के मतांसह २९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युपीएला २७ टक्के  मतांसह ९३ जागा मिळू शकतात. यापैकी कॉंग्रेसला १९ टक्के जागांसह केवळ ५१ जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर अन्य पक्षांना ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळण्याची शक्यता आहे.


सर्व्हेक्षणानुसार आजवरच्या सर्वात आवडते प्रधानमंत्री बनण्याचा मानही नरेंद्र मोदी यांनाच मिळाला आहे. ३८ टक्के लोकांनी ते आजवरचे उत्तम प्रधानमंत्री असल्याचं म्हटलं. तर १८ टक्के लोकांनी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला पसंती दिली. ११ टक्के लोकांनी माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि ८ टक्के लोकांनी माजी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू हे आजवरचे आवडते प्रधानमंत्री असल्याचे म्हटले. हा सर्व्हे सरकारधार्जिणा बनवून लोकांना मूर्ख बनवण्याचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. याला लोकांनी बळी पडू नये. कारण एनडीएची पुन्हा सत्ता येण्याचे राज म्हणजे केवळ ईव्हीएम घोटाळा आहे. त्याशिवाय काहीच नाही. त्यामुळे बिनधास्तपणे एखाद्या टुकार कंपन्यांना हाताशी धरून सरकारधार्जिणे सर्व्हे करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा शासक वर्गाचा प्रयत्न असतो. तसाच प्रयत्न करण्यात आला आहे अशाही प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीचा फटका पालेभाज्यांवर
केंद्रातील भाजपा सरकारने देश काढला विक्रीला
गेल्या वर्षी भारतावर झाले सर्वाधिक सायबर हल्ले
तिसर्‍यांदा सिलेंडरचे दर वाढवून सर्वसामान्यांना जगू न
‘आत्मनिर्भर भारत’ची फोडणी देऊन या ‘चिनी कम’ धोरणाला राष
इंधनाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर
जमीन वाचवण्यासाठी ही लढाई
केंद्रातील आरएसएसच्या भाजपा सरकारने प्रत्येक समाजात नि
राज्यावर विक्रमी महसुली तुटीचे संकट
जितेंद्र आव्हाडांनी नाव न घेता प्रधानमंत्री नरेंद्र मो
आता संसदेला घेरणार, ४० लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणणार
आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारताना चीनच भारताचा सर्वांत मो
शेतीशी काडीमात्र संंबंध नसलेले आरएसएसचे ब्राम्हण कृषी
सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीच्या फंडात तब्बल पाच पटीन
पतंजलीच्या ‘कोरोनील’ विक्रीस परवानगी नाही
रस्त्यावरील अपघातांनी भारतात ७५ टक्के गरीब परिवार आणखी
सिलिंडरच्या भाववाढीने गरीबांचे जगणे बनले कठीण, स्वयंपा
राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा
मराठा आरक्षणाची राज्याची भूमिका केंद्राला कळवणार
नालासोपार्‍यातील एका ग्राहकाला दोन महिन्याचे वीजबिल ८०
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper