×

एसईबीसी वगळून इतर निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारला विचारणा

Published On :    22 Jan 2021
साझा करें:

सरकारकडून निर्देशच आले नसल्याचे एमपीएससीच्या पत्रव्यवहारातून उघड



मुंबई: एसईबीसी आरक्षण लाभ वगळून अन्य पदे भरण्यात यावीत असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात करण्यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत कुठली कार्यवाही करावी अशी लेखी विचारणा शासनाकडे करण्यात आली होती. एमपीएससीने शासनाशी केलेल्या पत्रव्यवहारातून ही बाब समोर आली आहे.


आयोगाचे प्रधान सचिव प्रदीपकुमार सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात घटनाक्रम विषद करण्यात आला आहे. ९ सप्टेंबर २०२० रोजी एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली होती. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर, आयोगास विविध टप्प्यांवरील निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणत्या पद्धतीने पुढील कार्यवाही करावी यासाठी शासनास आयोगाकडून १६ सप्टेंबर २०२० रोजीच्या पत्रानुसार विचारणा करण्यात आली होती आणि त्याचा वेळोवेळी पाठपुरावादेखील केलेला होता. तथापि, या संदर्भात शासनाकडून कोणतेही निर्देश प्राप्त होऊ शकले नाहीत. निवड प्रक्रियेत असलेल्या अडचणी आणि निवड प्रक्रिया ही आयोगाच्या वेळापत्रकाच्या दृष्टीने वेळीच पूर्ण करण्यात यावी म्हणून योग्य निर्देश प्राप्त होण्यासाठी आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असे एमपीएससीने म्हटले आहे.


या अर्जाच्या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आणि अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) यांच्या उपस्थितीत एमपीएससीचे प्रधान सचिव प्रदीपकुमार यांनी चर्चा केली. एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना इडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने २३ डिसेंबर रोजी घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने व झालेल्या या चर्चेनुसार आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात केलेला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रदीपकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीचा फटका पालेभाज्यांवर
केंद्रातील भाजपा सरकारने देश काढला विक्रीला
गेल्या वर्षी भारतावर झाले सर्वाधिक सायबर हल्ले
तिसर्‍यांदा सिलेंडरचे दर वाढवून सर्वसामान्यांना जगू न
‘आत्मनिर्भर भारत’ची फोडणी देऊन या ‘चिनी कम’ धोरणाला राष
इंधनाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर
जमीन वाचवण्यासाठी ही लढाई
केंद्रातील आरएसएसच्या भाजपा सरकारने प्रत्येक समाजात नि
राज्यावर विक्रमी महसुली तुटीचे संकट
जितेंद्र आव्हाडांनी नाव न घेता प्रधानमंत्री नरेंद्र मो
आता संसदेला घेरणार, ४० लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणणार
आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारताना चीनच भारताचा सर्वांत मो
शेतीशी काडीमात्र संंबंध नसलेले आरएसएसचे ब्राम्हण कृषी
सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीच्या फंडात तब्बल पाच पटीन
पतंजलीच्या ‘कोरोनील’ विक्रीस परवानगी नाही
रस्त्यावरील अपघातांनी भारतात ७५ टक्के गरीब परिवार आणखी
सिलिंडरच्या भाववाढीने गरीबांचे जगणे बनले कठीण, स्वयंपा
राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा
मराठा आरक्षणाची राज्याची भूमिका केंद्राला कळवणार
नालासोपार्‍यातील एका ग्राहकाला दोन महिन्याचे वीजबिल ८०
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper