×

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे

Published On :    20 Feb 2021
साझा करें:

दिशा रवीच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट



अमेरिका: आंदोलक शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवणार्‍या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या अटकेवर प्रथमच भाष्य केले आहे. ग्रेटाने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणात दिशाला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. टूलकिटमध्ये बदल करून ती पुढे पाठवल्याचा आरोप दिशावर असून, सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. दिशाच्या अटकेवरून ग्रेटाने लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करत टीका केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र येऊन शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा वादातीत मानवाधिकार आहे. हे कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत अंग असायलाच हवेत,, असे ग्रेटाने ट्विट करून म्हटले आहे.


बंगळुरूतील दिशा रवी या कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी रविवारी तिच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर तिला दिल्लीतील पटियाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दिशाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, दिशाच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गने पहिल्यांदाच ट्विट केले आहे.


दिशा रवी हिच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआरच्या तपासाबाबत काही माध्यमांनी दिलेले वृत्त सनसनाटी निर्माण करणारे आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे सूचित होत आहे, असे मत व्यक्त करत दिशाची दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याआधी तिची पाच दिवस पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. ती मुदत संपल्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर केले तेव्हा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी तिची तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सरकारचे मौन शेतकरी आंदोलनासाठी धोका निर्माण करणारे
इंधन दरवाढीमागे सात वर्षात १३७ टक्क्यांच्या करवाढीचा ब
विधानसभा निवडणुकांसाठी कोरोना आड येत नाही का?
मराठी शाळांचे कोट्यवधी रुपये सरकारच्या ताब्यात
आता शिव संवादातून होणार आक्रोश मेळावा
रेल्वे भाडे न सांगता तीन पटीने वाढवले
छत्तीसगडमध्ये दहा महिन्यांत १४१ शेतकर्‍यांच्या आत्महत
जातनिहाय जनगणनेवर न्यायालयाची केंद्राला नोटीस
शेतकरी आणि कृषी बिलाशी आपला काय संबंध ही धारणा सोडा..!
शोषणकारी व्यवस्थेला म्हणावे लागेल पुन्हा चलेजाव
‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ या पुस्तकाच
केंद्राने राज्याचे २९ हजार कोटी जीएसटीचे थकवले
राज्याचा ८ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
आर्य भारताचे मूलनिवासी नाहीत, ते स्थलांतरित
भारतातील तब्बल ३७.५ कोटी बालकांच्या आरोग्य आणि शिक्षणाच
भारत उपासमारीच्या खाईत असताना अब्जाधीशांच्या श्रीमंती
जास्त वेळ काम करूनही भारतीयांना मिळते तुटपुंजी मजुरी
...तर भाजपाला मोजावी लागेल मोठी किंमत
इंधन दरवाढीचा फटका पालेभाज्यांवर
केंद्रातील भाजपा सरकारने देश काढला विक्रीला
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper